Nilesh Rane Video : ‘संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट…’, निलेश राणेंची जिव्हारी लागणारी टीका

Nilesh Rane Video : ‘संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट…’, निलेश राणेंची जिव्हारी लागणारी टीका

| Edited By: | Updated on: Feb 09, 2025 | 8:31 PM

‘ऑपरेशन टायगर’ रत्नागिरीमध्ये होत आहे की नाही याची मला कल्पना नाही. मी तिकडचा डॉक्टर नाही मी सिंधुदुर्गचा डॉक्टर आहे अशी मिश्कील टिप्पणी निलेश राणे यांनी केली आहे.

सध्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू असल्यची चर्चा आहे. याच ऑपरेशन टायगरवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी वक्तव्य केलंय. एकनाथ शिंदे यांचाच पत्ता कधी कट होईल? सांगता येत नाही, असं म्हणत शिंदेंवर जोरदार निशाणा साधला. दरम्यान, संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी संजय राऊतांवरच पलटवार केलाय. ‘संजय राऊत हे नेहमी काही नाही काही बोलत असतात. त्यांना रोज काय उत्तर द्यायचं ? संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचा पत्ता राजकारणातून कट करून टाकला आहे. हे कधी तुम्ही कधी बोलणार आहात की नाही? उद्धव ठाकरे यांना राजकीय दिवाळखोरीत टाकले. उद्धव ठाकरे यांचा वेळोवेळी काटा कोणी काढला, पवारांचा माणूस आतमधून कोण आहे हे उद्धव ठाकरे यांना एकदा कळलं तर..’. असं निलेश राणे म्हणाले. तर संजय राऊत यांच्या अशाच बोलण्यामुळे महाराष्ट्रातील लोकं आमच्याकडे वळत आहेत. संजय राऊत यांच्या तिरस्काराचा फायदा आम्हाला होतो. संजय राऊत यांनी असंच बोलत रहावं काही अडचण नाही, असा खोचक सल्लाही निलेश राणे यांनी दिला आहे. बघा नेमकं काय म्हणाले निलेश राणे?

Published on: Feb 09, 2025 04:58 PM