Sanjay Raut : दाऊदला देखील पक्ष प्रवेश मिळेल; संजय राऊतांची फटकेबाजी

Sanjay Raut : दाऊदला देखील पक्ष प्रवेश मिळेल; संजय राऊतांची फटकेबाजी

| Updated on: Jul 19, 2025 | 11:12 AM

Sanjay Raut News : खासदार संजय राऊत यांनी भाजपने पक्षासाठी काढलेल्या जीआरवरून आज फटकेबाजी केली आहे.

उद्या जर दाऊद मुंबईत आला आणि यांच्या पक्षात प्रवेश केला तर त्याला प्रवेश देतील. इतके वर्षे हा देशात नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही. नाशिकला जसे पक्षात प्रवेश करायचा म्हणून संबंधित व्यक्तीचे गुन्हे मागे घेतले तसे दाऊद, छोटा शकील, टायगर मेमन यांच्यावरील गुन्हे मागे घेत त्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल. कारण त्यांना आमच्या सारख्या विरोधकांना संपवायचे आहे, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर लगावला आहे. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपने पक्षासाठी काढलेल्या जीआरवर त्यांनी ही टीका केली. यापुढे आमच्या पक्षात कोणत्याही गुंडाला प्रवेश मिळणार नाही. गुन्हेगाराला राजकीय संरक्षण दिलं जाणार नाही असं या जीआरमध्ये म्हंटलं आहे.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, राज्याच्या संस्कृतीचे अधःपतन सुरू आहे. त्यासाठी भाजपची धोरणं कारणीभूत आहे. भारतीय जनता पक्ष हे गुन्हेगारांचे सर्वात मोठे आश्रय स्थान झाले आहे. गुन्हा करायचा आणि त्यांच्या पक्षात जात नगरसेवक, आमदार, मंत्री व्हायचे किंवा संरक्षण घ्यायचे ही राज्याची स्थिती आहे. सत्ताधारी राज्याच्या संस्कृतीच्या कसल्या गप्पा मारत आहे? काल ते आपल्या भाषणात म्हणाले की मुंबई ही मराठी माणसाचीच आहे, तिच्यावर त्यांचाच हक्क मला प्रश्न पडला कशी हे त्यांनी महाराष्ट्राला समजून सांगावे, की हिंदी लादण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, त्यातून मुंबई मराठी माणसाची होणार आहे का? संपूर्ण मुंबई तुम्ही अदानींच्या हातात देत आहात. तिचा सातबारा गुजरातच्या उद्योजकांच्या हाती देत आहात अशाने मुंबई मराठी माणसाची राहणार आहे का? मराठी माणूस शहराबाहेर फेकला जातोय, मराठी शाळा बंद पडताय, यातून मुंबई मराठी माणसाची होणार आहे का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. मराठी माणसांना खोटं सांगू नका, असाही घणाघाती टोला यावेळी राऊतांनी लगावला.

Published on: Jul 19, 2025 11:12 AM