Thackeray Group Protest : शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पेटला, अमरावतीत मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन
Amravati News : शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर आज अमरावती येथे शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी करण्यात आलेल्या रास्ता रोकोमुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पेटला आहे. आज अमरावती येथे शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालेला बघायला मिळाला. आमरावतीच्या पंचवटी चौकात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं असून आंदोलकांनी रास्तारोको केलं आहे. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून सरकारचा निषेध केला.
राज्यातील शेतकऱ्यांना 2 वर्ष तरी कोणतीही कर्जमाफी दिली जाणार नसल्याचं महायुती सरकारने स्पष्ट केलं आहे. मात्र निवडणुकीच्यावेळी जाहीरनाम्यात सरसकट कर्जमाफीचा उल्लेख करण्यात आलेला होता. त्यामुळे आता विरोधक आणि शेतकरी आक्रमक झालेले आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
Published on: Apr 07, 2025 03:00 PM
