Pune | पुण्यात स्मृती इराणींच्या कार्यक्रमस्थळी राडा

Pune | पुण्यात स्मृती इराणींच्या कार्यक्रमस्थळी राडा

| Updated on: May 16, 2022 | 9:03 PM

कार्यक्रमाला सुरुवात होताच वरच्या लॉबीत बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्यामुळे इराणी यांच्या कार्यक्रमात गोंधळ पाहायला मिळाला. घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि बालगंधर्व रंगमंदिरातून बाहेर नेण्यात आलं.

पुणे : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पार पडत आहे. त्यावेळी इराणी यांच्या कार्यक्रमात मोठा राडा (Chaos) पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात होताच जोरदार घोषणाबाजी (Sloganeering) करण्यास सुरुवात केली. या घोषणाबाजीमुळे भाजपचा कार्यक्रम काही वेळ थांबवावा लागला. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि कार्यक्रमातून बाहेर काढलं. मात्र, घोषणाबाजी केल्यानंतर आपल्याला भाजपच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनीही मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केलाय.

Published on: May 16, 2022 09:03 PM