उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढणार! शिवसेना भवन आणि शिवाई ट्रस्टविरोधात कुणी दाखल केली तक्रार?

उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढणार! शिवसेना भवन आणि शिवाई ट्रस्टविरोधात कुणी दाखल केली तक्रार?

| Updated on: Feb 20, 2023 | 7:12 PM

VIDEO | शिंदे गटाकडून शिवसेना भवनावर दावा केला जात असताना शिवसेना भवनासह शिवाई ट्रस्टविरोधात दाखल झाली तक्रार, बघा कुणी केली तक्रार?

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवनेसा पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिल्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे यांची झाल्याचेच म्हटले जात आहे. अशातच शिंदे गटाकडून शिवसेना भवनावर दावा केला जात असताना उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर येत आहे. ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या शिवसेना भवनाच्या विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे . ही तक्रार सामाजिक कार्यकर्ते योगेश देशपांडे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे. एखाद्या ट्रस्टची जागा शिवसेना भवनाला कशी दिली? असा प्रश्न त्यांनी तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे. आता योगेश देशपांडे यांनी शिवसेना भवन आणि शिवाई ट्रस्टच्या विरोधात ही तक्रार केल्यानंतर पुढे नेमकं काय होणार याकडे साऱ्याचे लक्ष लागून आहे.

Published on: Feb 20, 2023 07:12 PM