अन् महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी धरले सुशीलकुमार शिंदे यांचे पाय

अन् महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी धरले सुशीलकुमार शिंदे यांचे पाय

| Edited By: | Updated on: Apr 25, 2023 | 9:58 AM

Solapur News : सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचे पाय धरले. याची सर्वत्र चर्चा होतेय. पाहा व्हीडिओ...

सोलापूर : राज्याचे महसूलमंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचे पाय धरले. सोलापुरात कमलाबाई पटेल नर्सिंग इन्स्टिट्यूटचं उद्घाटन झालं. यावेळी विखे पाटलांनी शिंदेंचे पाय धरल्याचं समोर आलं. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले. सोलापूर शहराजवळ असलेल्या कुंभारी येथील नर्सिंग इन्स्टिट्यूटचं उद्घाटन काल पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते झालं. राधाकृष्ण विखे पाटील हे कार्यक्रम ठिकाणी पोहोचताच सुशीलकुमार शिंदे यांनी विखे पाटील यांचं स्वागत केलं. यावेळी आदराने विखे पाटील यांनी सुशीलकुमार शिंदेंचे चरणस्पर्श करून अभिवादन केले. हे चित्र पाहून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

Published on: Apr 25, 2023 09:32 AM