Special Report | पूरग्रस्तांसाठी सरकारकडून साडे 11 हजार कोटींचं पॅकेज!

| Updated on: Aug 03, 2021 | 9:19 PM

राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती आणि इतर दीर्घकालीन उपायांसाठी 11 हजार 500 कोटी रुपये खर्चाला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने नुकसानाबाबत सादरीकरण केलं.

Follow us on

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्त नागरिकांसाठी आज अखेर मदतनिधीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती आणि इतर दीर्घकालीन उपायांसाठी 11 हजार 500 कोटी रुपये खर्चाला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने नुकसानाबाबत सादरीकरण केलं. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. तशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. राज्यातील काही जिल्ह्यात 80 टक्के तर काही जिल्ह्यात 90 टक्के पंचनामे झाले आहेत. अद्यापही काही जिल्ह्यात पंचनामे करण्याचं काम सुरु आहे. अशावेळी राज्य सरकारनं आज पूरग्रस्तांसाठी मदतनिधीची घोषणा केली आहे. त्यात नुकसानग्रस्त कुटुंबाला सानुग्रह अनुदान देण्यासह, नुकसानाची वर्गवारी करुन मदत देण्यात येणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं.