मंत्री उदय सामंतांच्या ताफ्यावर दगडफेक, यवतमाळच्या प्रचारसभेला जाताना काय घडलं?

| Updated on: Apr 22, 2024 | 1:00 PM

यवतमाळमधील राळेगाव येथील महायुतीच्या प्रचारसभेवेळी ही घटना घडल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, अज्ञात व्यक्तीकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर उदय सामंत यांनी व्हिडीओ ट्वीट करून यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. अशा प्रकारचा हल्ला माझ्यावर....

Follow us on

यवतमाळमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यावर काल दगडफेक करण्यात आली. उदय सामंत यांच्या कारवर अज्ञात व्यक्तीकडून ही दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीच्या घटनेमध्ये उदय सामंत यांच्या ताफ्यामधील एका कारची काच फुटली. यवतमाळमधील राळेगाव येथील महायुतीच्या प्रचारसभेवेळी ही घटना घडल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, अज्ञात व्यक्तीकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर उदय सामंत यांनी व्हिडीओ ट्वीट करून यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. वाशिम-यवतमाळ लोकसभेच्या प्रचारासाठी मी राळेगावमध्ये असताना, मी ज्या गाडीमध्ये बसणार होतो त्या गाडीवर दगड मारण्याचा प्रयत्न झाला. यामुळे गाडीची काच फुटली. ही बातमी मी प्रसारमाध्यमांमध्ये पाहिली आणि खात्री केली, तेव्हा हा प्रकार घडलेला होता. मात्र, या प्रकारात कुणालाही दुखापत झाली नाही, मी सुद्धा या गाडीत नसल्याने सुखरूप असल्याचे सामंत यांनी म्हटले तर हा अनुभव मला काही नवीन नाही कारण पुण्यामध्ये ही अशा प्रकारचा हल्ला माझ्यावर झाला होता. परंतू हा हल्ला का, कशासाठी, काय उद्देश्याने झाला, कुणी दगड मारला हे कळालेलं नाही. दक्षता म्हणून आणि पोलीस दरबारी याची नोंद असावी म्हणून या हल्ल्याची तक्रार पोलीसांकडे देण्यासाठी मी माझ्या चालकास पाठवले आहे, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.