SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 26 September 2021

| Updated on: Sep 26, 2021 | 8:31 AM

आरबीआयच्या सुट्ट्यांची यादी राज्यनिहाय उत्सव, धार्मिक सुट्ट्या आणि सण उत्सवांच्या श्रेणींनुसार दिलेली असते. ऑक्टोबरच्या बाबतीत बहुतेक सुट्ट्या ‘निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट’ वर्गीकरणात येतात. 1 ऑक्टोबर यादीतील पहिली सुट्टी असेल, त्या दिवशी ‘बँका’ क्लोजिंग ऑफ अकाउंट्स वर्गीकरण अंतर्गत येत असल्यानं गंगटोकमधील बँकांना फक्त तेव्हा सुट्टी असते.

Follow us on

भारतीय रिझर्व्ह बँके (RBI) च्या ऑक्टोबर महिन्याच्या अधिकृत बँक सुट्ट्यांच्या यादीनुसार आगामी कॅलेंडर महिना सुट्ट्या आणि सणांनी भरलेला आहे. ज्यामुळे भारतातील अनेक शहरांमधील अनेक बँका बंद राहणार आहेत. बँका ऑक्टोबर महिन्यात सुमारे 21 दिवस बंद राहण्याची अपेक्षा आहे. आरबीआयनेच ऑक्टोबर महिन्यासाठी एकूण 14 बँक सुट्ट्या जारी केल्यात, त्यात शनिवार आणि रविवार तसेच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारसह एकूण सात दिवसांच्या सुट्टीचा समावेश आहे.

आरबीआयच्या सुट्ट्यांची यादी राज्यनिहाय उत्सव, धार्मिक सुट्ट्या आणि सण उत्सवांच्या श्रेणींनुसार दिलेली असते. ऑक्टोबरच्या बाबतीत बहुतेक सुट्ट्या ‘निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट’ वर्गीकरणात येतात. 1 ऑक्टोबर यादीतील पहिली सुट्टी असेल, त्या दिवशी ‘बँका’ क्लोजिंग ऑफ अकाउंट्स वर्गीकरण अंतर्गत येत असल्यानं गंगटोकमधील बँकांना फक्त तेव्हा सुट्टी असते.

बँक सुट्ट्यांच्या यादीत नमूद केल्याप्रमाणे पुढील सुट्टी महात्मा गांधी जयंतीला असेल आणि आरबीआयच्या आदेशानुसार ती सर्व राज्यांना लागू होणार आहे. ही अशा काही घटनांपैकी एक आहे, जेथे शनिवार आणि रविवार नसलेली सुट्टी सर्व बँकांसाठी एकसारखी असते. 15 ऑक्टोबर ही आणखी एक मोठी सुट्टी आहे, जी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. या तारखेला दुर्गा पूजा/दसरा/विजया दशमी होणार आहे आणि इम्फाळ, शिमला येथील बँका वगळता सर्व बँकांना त्या दिवशी सुट्टी असेल.