Suresh Dhas : कृषी खातं जेलमधला आका चालवायचा, धसांचा नाव न घेता कराडवर आरोप

Suresh Dhas : कृषी खातं जेलमधला आका चालवायचा, धसांचा नाव न घेता कराडवर आरोप

| Updated on: Jul 17, 2025 | 12:37 PM

कृषी खात्याततील कारभारावर आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले आहेत.

कृषी खात्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या खोट्या सहीचा वापर करण्यात आला असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे.  त्यांनी दावा केला की, शेतकऱ्यांच्या पिक विमा योजनेत या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले आहेत. याशिवाय, धस यांनी महादेव मुंडे हत्या प्रकरणात सध्या तुरुंगात असलेला वाल्मीक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

दरम्यान, यावेळी महादेव मुंडेंच्या हत्येच्या मुद्यावर देखील धस यांनी गंभीर आरोप केलेले बघायला मिळाले आहे. महादेव मुंडेला फक्त १२ गुंठ्यासाठी मारलं, तो गरीब माणूस होता, असे सुरेश धस यांनी म्हटले. गोट्या गिते हा सायको किलर आहे. फक्त १२ गुंठ्यासाठी त्याला मारलयं. तो गरीब माणूस होता. महादेव मुंडेंच्या प्रकरणी आता माहिती येत आहे. त्यात गोट्या गीते, राजू फड, वाल्मिक कराडचा धाकटा मुलगा या सर्वांची नावे बाळा बांगर जो आकाबरोबर असायचा त्याने मिडिया समोर हे सांगितलेले आहे. त्या ज्ञानेश्वरी ताईंना औषध प्यायची वेळ एसपी कार्यालयासमोर आली. मग त्यात त्या ताईंची काय चूक आहे, असा सवालही सुरेश धस यांनी केला.

Published on: Jul 17, 2025 12:36 PM