Thackeray Brothers : मेळाव्याच्या 2 दिवसांतच राज ठाकरेंचा संभ्रम? ठाकरे बंधू एकत्र पण युतीबद्दल काय? मनात चाललंय तरी काय?
मराठी विजयोत्सव मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी यापुढे एकत्रच लढणार अशी घोषणा केली. पण मनसेचं युतीवरून ठरताना दिसत नाही. कारण उद्धव ठाकरेसोबतच्या युतीवरून काहीही बोलू नका अशा सूचना राज ठाकरेंनी नेत्यांना दिल्या.
मराठी विजयोत्सव मेळावा झाला खरा. पण राज ठाकरे आणि मनसेची भूमिका संभ्रमात टाकणारी आहे. कारण मनसे प्रमुखांनी उद्धव ठाकरेसोबतच्या युतीवर बोलायचं नाही असे आदेश नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिलेत. उद्धव ठाकरे सोबतच्या युतीबाबत कोणतेही वक्तव्य करू नये. युतीबद्दल काहीही बोलण्यापूर्वी कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी माझी परवानगी घ्यावी. त्यामुळे दोन दिवसातच असे आदेश दिल्याने राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे संभ्रम निर्माण झाला. मराठीसाठी जे जे करायचं आहे ते करू असं उद्धव ठाकरे म्हणाले तर संजय राऊतांनी आमच्याकडून पुढे केलेला हात कायम आहे असं म्हटलंय.
विशेष म्हणजे पुन्हा ट्विस्ट येताना दिसतायेत. राज ठाकरे यांनी युतीसंदर्भात बोलू नका अशा सूचना नेत्यांना दिल्या तर एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरेंच्या विरोधात बोलू नका असे आदेश नेते आणि प्रवक्त्यांना दिलेत. मेळाव्यात राज ठाकरेंचा फोकस मराठी विषयावरच होता. तर उद्धव ठाकरेंनी राजकीय टीका टिप्पणी करतानाच एकत्र आलोय आणि एकत्र राहणार असं जाहीरपणे बोलून दाखवलं. पण राज ठाकरेंच्या भाषणात मात्र मराठीची एकजूट कायम ठेवा हे भाषणाच्या शेवटचं एकच वाक्य होतं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
