बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या घृष्णेश्वर महादेवाकडे अंबादास दानवे यांचं साकडं, म्हणाले…
VIDEO | श्रावण महिन्यातील पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी घेतलं घृष्णेश्वर महादेवाचं दर्शन अन् उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना माजबुतीने उभी राहण्याची शक्ती देवो, असं घातलं साकडं
छत्रपती संभाजीनगर, २१ ऑगस्ट २०२३ | आज श्रावणातील पहिला श्रावण सोमवार असून राज्यभरातील महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अशातच बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर महादेवाचे मंदिर… या घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन आज ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडून घेण्यात आलं. यावेळी अंबादास दानवे यांनी घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेतले आणि महादेवाकडे एक साकडं देखील मागितल्याचे त्यांनी सांगितले. अंबादास दानवे म्हणाले, ‘आज सोमवार निमित्त घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. यावेळी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मजबुतीने उभी राहण्याची शक्ती आम्हाला महादेव देवो असं मी साकडे घातले आहे.’ तर कांद्याला निर्यात शुल्क 40 टक्के ठेवले आहे तर कापसाची आयात करतात त्यामुळे शेतकऱ्याच्या हिताची तोंडदेखली भूमिका सरकार घेत आहेत, हे सरकार दुतोंडी आहे. शेतकऱ्यांचा जीव घेण्याचं काम सुरू असल्याची घणाघाती टीका यावेळी अंबादास दानवे यांनी केली.
