एमटिव्हीचा आस्था चॅनल झाला; संजय राऊत यांच्यावर नितेश राणे यांचा हल्लाबोल

एमटिव्हीचा आस्था चॅनल झाला; संजय राऊत यांच्यावर नितेश राणे यांचा हल्लाबोल

| Updated on: Apr 28, 2023 | 1:25 PM

आत्तापर्यंत राऊत हे आपण शरद पवार साहेबांचं ऐकतो असं बोलायचे मात्र आता तेच राऊत पवारांच्या भूमिकेला विरोध करताना दिसत आहे.

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) आणि भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्यात खडाजंगी होताना दिसत आहे. राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत भाजपसह शिंदे गटावर टीका केल्यानंतर नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी त्यांच्यावर पलवार केला आहे. तसेच एकाच दिवसांमध्ये एवढा फरक पडेल अशी तरी अपेक्षा नव्हती असेही म्हटलं आहे. तर एवढ्या लवकर एमटिव्हीच आस्था चॅनल होईल, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याचं कौतुक होईल, तोंड पडेल असं वाटलं नव्हत अशी टीका केली आहे. आत्तापर्यंत राऊत हे आपण शरद पवार साहेबांचं ऐकतो असं बोलायचे मात्र आता तेच राऊत पवारांच्या भूमिकेला विरोध करताना दिसत आहे. त्यामुळे राऊत हे उद्धव ठाकरे यांचे राहिलेत ना आता पवार यांचे. नेमका कोणाचा लावारिस आहे हा? का राजकारणामधला लावारिस आहे? असा घणाघात केला आहे.

Published on: Apr 28, 2023 11:41 AM