पोस्टर लागले, तक्रारही दिली… तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता; ठाकरेंच्या त्या नगरसेवकांचं काय झालं?

पोस्टर लागले, तक्रारही दिली… तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता; ठाकरेंच्या त्या नगरसेवकांचं काय झालं?

| Updated on: Jan 26, 2026 | 1:08 PM

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे एकूण 11 नगरसेवक निवडून आलेत. यापैकी 4 नगरसेवक हे निवडणुकीचा निकाल लागल्यावर नॉट रिचेबल झालेत. यामध्ये मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नाली केने यांचा समावेश आहे. गटनोंदणीच्या वेळी सुद्धा हे नगरसेवक बेपत्ता होते. ठाकरेंच्या शिवसेनेने नगरसेवक बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीसात केली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे एकूण 11 नगरसेवक निवडून आलेत. यापैकी 4 नगरसेवक हे निवडणुकीचा निकाल लागल्यावर नॉट रिचेबल झालेत. यामध्ये मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नाली केने यांचा समावेश आहे. गटनोंदणीच्या वेळी सुद्धा हे नगरसेवक बेपत्ता होते. ठाकरेंच्या शिवसेनेने नगरसेवक बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीसात केली आहे, तर नॉट रिचेबल नगरसेवक हे शिंदेंच्या गळाला लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यामळे ठाकरेंच्या शिवसेनेने नगरसेवक बेपत्ता झाल्याचे पोस्टर कल्याण डोंबिवलीत लावले आहे. एवढेच नव्हे तर या चार नगरसेवकांचे कुटुंबीयही आता नॉट रिचेबल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तर दुसरीकडे कल्याण डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या मनसेच्या 4 नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेला विकास या मुद्द्यावर पाठिंबा दिला आहे. यावर, सामानातून संजय राऊत यांनी राजू पाटलांवर निशाणा साधला आहे.

Published on: Jan 26, 2026 01:08 PM