Special Report | राणांवरील राजद्रोहाचा गुन्हा रद्द होणार ?
राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा सिद्ध होत नाही असे आता न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. राणा दांपत्याला पोलिसांची नोटीस मिळाल्यानंतर ते घराबाहेर पडले नाहीत, त्यामुळे 124 अ हे राजद्रोहराचे कलम त्यांच्यावर लावण्यासारखी परिस्थिती नव्हती असंही म्हणण्यात आले आहे.
राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा सिद्ध होत नाही असे आता न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. राणा दांपत्याला पोलिसांची नोटीस मिळाल्यानंतर ते घराबाहेर पडले नाहीत, त्यामुळे 124 अ हे राजद्रोहराचे कलम त्यांच्यावर लावण्यासारखी परिस्थिती नव्हती असंही म्हणण्यात आले आहे. त्यांना अटक होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मातोश्रीबाहेर आंदोलन करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला, त्यामुळे प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे मात्र प्रत्येकाने मर्यादा पाळायला हवी असे बोलही न्यायालयाकडून सुनावण्यात आले आहेत. राणा दाम्पत्याने आक्षेपार्ह विधान केलं म्हणून राजद्रोहाचा कलम लावणे चुकीचे असून राजद्रोहाचा गुन्हा ज्या व्यक्तीवर लावला जातो त्या व्यक्तीने एखाद्या वक्तव्य केल आणि त्यानंतर समाजात हिंसा झाली तरच हे कलम लावलं जाऊ शकते अशा शब्दात न्यायालयाकडून फटकारण्यात आले असले तरी मविआचे सरकार मात्र त्यांच्या राजद्रोहाच्या गुन्ह्यावर ठाम असून वेळ पडल्यास आम्ही पुरावे सादर करु असं मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे.
