Pune Bailjodi | संत ज्ञानेश्नर महाराजांच्या पालखीचा मान फुरसूंगीतील सोन्या-माऊलीला

| Updated on: May 31, 2022 | 8:05 PM

आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 20 जूनला देहूतून पंढरपूरकडे जाणार आहे. त्यामुळे यावेळेआधी रथ ओढण्यासाठी संस्थान विश्वस्त मंडळाकडून बैलजोडीची पाहणी केली जाते. विशेष म्हणजे मंडळाकडून बैलजोडीची पाहणी ही शेतकऱ्यांच्या शेतात जावून पाहणी केली जाते. यावेळी ही देहूस्थांनकडे 17 अर्ज प्राप्त झाले होते.

Follow us on

पिंपरी चिंचवड : अखंड वारकरी सांप्रदाय (Warkari Sampraday) ज्याची आस लावून असतो त्या आषाढी वारीची घोषणा काही दिवसांपूर्वीच झाली आहे. त्यामुळे वारकरी पंढरपूरला जाण्यासाठी तयारीला लागला आहे. ज्याप्रमाणे वारकरी आपल्या आषाढी वारीकडे (Ashadi Wari) आस लावून असतो तसेच अनेकांचे लक्ष हे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील चांदीच्या रथाला (Silver Chariot) कोणाची बैलजोडी ओढणार याकडे ही असते. यासाठी राज्यातून अनेक बैलजोड्यांचे मालक अर्ज हातात घेऊन पांडूरंगाला साद घालताना दिसतात. की आपल्याच बैलजोडी ला रथ ओढण्याचा मान मिळावी. यावर्षीचा हा फुरसूंगीतील सोन्या-माऊलीला मिळाला आहे. येथील आप्पासाहेब खुटवड यांची ही सोन्या-माऊली बैलजोडी आहे. याबाबत संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी रविवारी (ता. 29) माहिती दिली होती.