Threat attack on CMO office : पाकिस्तानी नंबर अन् मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी, MSG मध्ये काय म्हटलं?

Threat attack on CMO office : पाकिस्तानी नंबर अन् मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी, MSG मध्ये काय म्हटलं?

| Updated on: Feb 28, 2025 | 10:53 AM

मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याच्या धमकीचा मेसेज बुधवारी दुपारी आल्यानंतर आता पोलीस तपास यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. मिळालेल्या धमकी प्रकरणी वरळी पोलिसांकडून तपासाला सुरूवात झाली आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांना मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ल्याची धमकी मिळाली आहे. मंत्रालयामधील मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्यात येईल असा धमकी देणारा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना मिळाला आहे. एका पाकिस्तानी नंबरवरुन मुंबईतील ट्रॅफिक पोलिसांना व्हॉट्सअपवर धमकीचा मेसेज मिळाला आहे. मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याच्या धमकीचा मेसेज बुधवारी दुपारी आल्यानंतर आता पोलीस तपास यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. मिळालेल्या धमकी प्रकरणी वरळी पोलिसांकडून तपासाला सुरूवात झाली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांना धमकीचा मेसेज करणारी व्यक्ती भारतातील की बाहेरील आहे याचा तपास सध्या सुरू आहे. दरम्यान, मुंबई वाहतूक पोलिसांना मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ल्याच्या धमकीचा मेसेज करणाऱ्या व्यक्तीने मालिक शहाबाज हुमायून राजा देव असे नाव सांगितले, अशी माहिती समोर आली .

Published on: Feb 28, 2025 10:53 AM