VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 17 May 2022
औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये टोलवाटोलवीचं राजकारण सुरु आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. भागवत कराड यांनी नुकतंच यावरून शिवसेनेला डिवचलं. तुम्ही आधी विधानसभेत ठराव मंजूर करून घ्या, केंद्राकडे प्रस्ताव पाठवा, मग आम्ही लवकरात लवकर शहराचं नाव बदलून संभाजीनगर करू, असं डॉ. कराड म्हणाले.
औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये टोलवाटोलवीचं राजकारण सुरु आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. भागवत कराड यांनी नुकतंच यावरून शिवसेनेला डिवचलं. तुम्ही आधी विधानसभेत ठराव मंजूर करून घ्या, केंद्राकडे प्रस्ताव पाठवा, मग आम्ही लवकरात लवकर शहराचं नाव बदलून संभाजीनगर करू, असं डॉ. कराड म्हणाले. शिवसेनेचाही गेल्या कित्येक वर्षांचा हा अजेंडा राहिला आहे. मात्र आता महाविकास आघाडी सरकारमध्ये असल्याने शिवसेनेचे हात बांधले आहेत. त्यामुळेच भाजप नेते वारंवार शिवसेनेला यासंदर्भाने आव्हान देत आहेत. अशा स्थितीत महाविकास आघाडीच्या मनात नेमकं काय आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना संभाजीनगरचा मुद्दा मार्गी लागेल का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
Published on: May 17, 2022 11:52 AM
