India-Pakistan Conflict : पाकिस्तानला तुर्कीएचा उघड पाठिंबा; कराची बंदरात युद्धनौका दाखल
India-Pakistan Conflict After Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारत - पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असताना आता तुर्कीएने पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला आहे.
तुर्कीए आता उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा देत आहे. तुर्कीएची युद्धनौका पाकिस्तानच्या कराची बंदरात दाखल झालेली आहे. याआधी तुर्कीएचं कार्गो विमान देखील पाकिस्तानात दाखल झालं होतं.
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. त्यामुळे सीमेवर देखी युद्ध परिस्थिती तयार झाली आहे. असं असतानाच आता तुर्कीएने पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिला आहे. तुर्कीएची युद्ध नौका कराचीच्या बंदरात दाखल झाली आहे. याआधी एक कार्गो विमान देखील तुर्कीएने पाकिस्तानात पाठवलं होतं. या विमानातून तुर्कीएने पाकिस्तानात शस्त्रास्त्र पाठवल्याची माहिती समोर आली आहे. तर हे विमान पाकिस्तानमध्ये इंधन भरण्यासाठी थांबल्याचा कांगावा तुर्कीएने केला होता. पाकिस्तान आणि तुर्कीएमध्ये आधीपासूनच एकमेकांना लष्करी सहाय्य होतं. याआधी तुर्कीएनं पाकला ड्रोनचा पुरवठा देखील केला होता.
