Major Accident in Ratnagiri कार आंबा घाटातील दरीत कोसळली दोघांचा मृत्यू
साखरपा पोलिस आणि स्थानिकांकडून आंबा घाटात रेस्क्यु ऑपरेशन (Rescue Operation) सुरु आहे. याच ठिकाणचा हा दुसरा अपघात आहे. या अपघातात एक महिन्याचे बाळ आणि एक महिला ठार झाली आहे. यापूर्वी स्विफ्ट कार खाली गेली होती. संरक्षक भिंत आणि गार्ड नसल्याने अपघात झाला.
रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात भीषण अपघात (Accident) झाला असून एक चारचाकी गाडी 400 फूट दरीत कोसळली. या गाडीत सहा माणसे प्रवास करीत होती. यापैकी दोन जण दगावल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आंबा घाटातील गायमुखच्या आधीच्या वळणावर हा अपघात झाला. साखरपा पोलिस आणि स्थानिकांकडून आंबा घाटात रेस्क्यु ऑपरेशन (Rescue Operation) सुरु आहे. याच ठिकाणचा हा दुसरा अपघात आहे. या अपघातात एक महिन्याचे बाळ आणि एक महिला ठार झाली आहे. यापूर्वी स्विफ्ट कार खाली गेली होती. संरक्षक भिंत आणि गार्ड नसल्याने अपघात झाला.
