Udyanraje Bhosale Video : ‘औरंगजेब चोर होता, त्याची कबर JCB नं…’; उदयनराजे भोसले भडकले

Udyanraje Bhosale Video : ‘औरंगजेब चोर होता, त्याची कबर JCB नं…’; उदयनराजे भोसले भडकले

| Updated on: Mar 07, 2025 | 4:05 PM

'जे कोणी लोक औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन दर्शन घेतात. कदाचित ते त्यांचे भविष्य असेल. त्यांनी ती कबर घेऊन स्वतःच्या घरी घेऊन जावी.', अशी संतप्त प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली.

औरंगजेबाची कबर JCB नं उखडून टाका, असं मोठं वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. ‘औरंगजेबाची कबर ठेवून काय करणार? औरंगजेब चोर होता. तो देश लुटायला आला होता त्याचं उदात्तीकरण का करायचं? जे कोणी लोक औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन दर्शन घेतात. कदाचित ते त्यांचे भविष्य असेल. त्यांनी ती कबर घेऊन स्वतःच्या घरी घेऊन जावी. इथे हिंदू मुस्लीम असा सवाल येतच नाही. औरंगजेब त्याची कबर जेसीबी लावून उखडून टाका, अशी संतप्त प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली. जी लोक औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन दर्शन घेतात. मात्र औरंगजेबाचं उदात्तीकरण आता खपवून घेतलं जाणार नाही’, असे म्हणत उदयनराजे भोसले चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. साताऱ्यात बोलत असताना उदयन राजे भोसले यांनी मोठं वक्तव्य केलं. दरम्यान, यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कोणी बोलण्याचं धाडस कुणी केलं नाही पाहिजे, असा कायदा मंजूर करण्याची मागणीदेखील केली. सध्या अधिवेशन सुरू आहे, या काळात एक नॉन बेलेबल कायदा पास करावा. जर एखाद्या पदावर असणाऱ्या माणसाने असे वक्तव्य केलं, तर त्याच त्वरित निलंबन झालं पाहिजे. असे म्हणत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अधिकृत इतिहास सरकारने जाहीर करावा, ज्यामुळे असे प्रश्न सारखे सारखे उद्भवणार नाहीत, असेही उदयनराजे भोसले म्हणाले.

Published on: Mar 07, 2025 02:21 PM