राम शिंदेंच्या कार्यालयात फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची महत्वाची भेट
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात अँटी चेंबरमध्ये चर्चा झाली आहे..
महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपद आणि त्रिभाषा सूत्र तसेच हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात अँटी चेंबरमध्ये चर्चा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना एक पुस्तक भेट देताना म्हटले, “हिंदीची सक्ती खरंच आवश्यक आहे का?” फडणवीस यांनी यावर उत्तर देताना सांगितले की, हे पुस्तक त्रिभाषा सूत्र समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांना द्यावे.
विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीचा मुद्दाही या चर्चेत उपस्थित झाला. हे पद निवडणे हा विधानसभा अध्यक्षांचा अधिकार असला, तरी अद्याप हे पद शिवसेनेला देण्यात आलेले नाही. यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे काही आमदारही उपस्थित होते. ही चर्चा आज विधान भवनात पार पडली.
