Aditi Tatkare Tweet : मंत्री अदिती तटकरेंचं वैष्णवीच्या बाळाविषयी महत्वाचं ट्विट
Vaishnavi Hagawane Case : पुण्यातील मृत वैष्णवी हगवणेच्या बाळाबद्दल मंत्री अदिती तटकरे यांनी आज महत्वाचं ट्विट केलेलं आहे.
वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा 9 महिन्यांच्या बाळाचं संगोपन कोण करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी केल्याजाणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर तिच्या 9 महिन्यांच्या चिमूकल्याची हेळसांड सुरू होती. सध्या हे बाळ त्याच्या आज्जी आजोबांकडे म्हणजेच वैष्णवीच्या माहेरी आहे. मात्र पुढे या बाळाचं काय होणार? अशी चिंता सगळ्यांना वाटत होती. आता यावर निर्णय देण्यात आलेला असून वैष्णवीचं बाळ जनक याचा ताबा त्याची आजी स्वाती कस्पटे म्हणजे वैष्णवीच्या आईकडे देण्यात आला आहे.
बाल कल्याण समितीने त्याची आजी व वैष्णवी हगवणे यांच्या आई स्वाती कस्पटे यांना योग्य व्यक्ती म्हणून जनकचा सांभाळ करण्यासाठी नियुक्त केलं आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती ट्विट करून दिलेली आहे.
Published on: May 30, 2025 07:15 PM
