Ashadi Ekadashi 2024 : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा, चंद्रभागेच्या तिरी वारकऱ्यांची मांदियाळी, बघा ड्रोनचा नेत्रदिपक नजारा
आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपुरात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने चंग्रभागेच्या तिरी वारकऱ्यांची मांदियाळी आहे. अनेक पालख्या कालपासूनच पंढरपुरात दाखल होत असल्याचे पाहायला मिळतेय. बघा ड्रोनचा नेत्रदिपक नजारा
संपूर्ण महाराष्ट्र सध्या विठुरायाच्या नामघोषात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळत आहे. हिंदू धर्मात आषाढी एकादशीला विशेष महत्व आहे. हिंदू पंचांगानुसार, शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही १६ जुलैला रात्री ८.३३ वाजेपासून १७ जुलै रात्री ९.३३ वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे उद्या आषाढी एकादशी ही १७ जुलै रोजी साजरी करण्यात येणार आहे. तर याच दिवसाच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपुरात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने चंग्रभागेच्या तिरी वारकऱ्यांची मांदियाळी आहे. अनेक पालख्या कालपासूनच पंढरपुरात दाखल होत असल्याचे पाहायला मिळतेय. दरम्यान, यंदा पंढरपुरात दाखल होणाऱ्य वारकऱ्यांची संख्याही २० ते २२ लाखांपर्यंत आहे. तर आतापर्यंत ८ लाख वारकऱ्यांनी विठुरायाचं दर्शन घेतलं असून ते पंढरपुरातून बाहेर पडले आहेत अशी माहिती मिळतेय.
Published on: Jul 16, 2024 03:24 PM
