Operation Sindoor : सिंदूरबाबत भूमिका मांडण्यासाठी खासदारांच्या 7 टीम परदेशात, मोदी सरकारकडून कोणाच्या खांद्यावर जबाबदारी?
देशातील सर्व राजकीय दलांची 40 खासदारांची टीम सात गटात विभागली जाणार असून ते विविध देशांत जाऊन ऑपरेशन सिंदूरबद्दल भूमिका मांडत पाकिस्तानचा बुरखा फाडणार...
दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेत भारताने ऑपरेश सिंदूर राबवून पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे. ऑपरेशन सिंदूरवर भूमिका मांडण्यासाठी खासदारांची एक टीम परदेशात पाठवण्यात येणार आहे. 7 सर्वपक्षीय नेते विविध शिष्टमंडळांचं नेतृत्व करणार असून ही खासदारांची टीम ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडणार आहे. यामध्ये काँग्रेस नेते शशी थरूर, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यसारख्या मोठ्या नेत्यांचाही समावेश असणार असल्याची माहिती मिळतेय. परदेशात भारताचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी सात खासदारांची नावं जाहीर कऱण्यात आली आहे. तर काँग्रसचे नाव वगळल्यानंतरही शशी थरूर यांच्या खांद्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेस खासदार जयराम रमेश यांच्याकडून यासंदर्भातील स्पष्टीकरण दिलंय.
भारताची भूमिका मांडण्यासाठी हे नेते परदेशात जाणार
- शशि थरूर – यूनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
- विजयंत जय पांडा – ईस्टर्न यूरोप
- कनिमोझी – रूस
- संजय झा – साउथ ईस्ट आशिया
- रविशंकर प्रसाद – मिडल ईस्ट
- सुप्रिया सुळे – पश्चिम आशिया
- श्रीकांत शिंदे – आफ्रिकन देश
Published on: May 17, 2025 12:46 PM
