सोलापुरातील लग्नाच्या वरातीत महिलांचा अश्लील डान्स, लग्न राहिलं बाजूला अन् भलतंच घडलं, बघा VIDEO

सोलापुरातील लग्नाच्या वरातीत महिलांचा अश्लील डान्स, लग्न राहिलं बाजूला अन् भलतंच घडलं, बघा VIDEO

| Updated on: Feb 27, 2025 | 12:31 PM

लग्नाच्या वरातीमध्ये काही महिलांना अश्लील हावभाव करत नाच केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यासह पोलिसांनी डीजे, ट्रॅक्टरसह तब्बल ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सोलापूर येथे लग्नाच्या वरातीत काही महिलांनी अश्लील हावभाव करत डान्स केल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. लग्नाच्या वरातीमध्ये काही महिलांना अश्लील हावभाव करत नाच केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यासह पोलिसांनी डीजे, ट्रॅक्टरसह तब्बल ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मामाने आपल्या भाच्याच्या लग्नाच्या वरातीत नृत्य करण्यासाठी तीन ते चार हजार देऊन बारबाला नाचवल्यात. यातील काही महिला या लावणी नृत्यांगणा असल्याचे सांगितले जात आहे. सोलापुरातील बारबालांना नाचवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या लग्नाच्या वरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटीझन्सकडून तीव्र संताप आणि टोकाच्या प्रतिक्रिया दिल्या जात आहे. याप्रकरणी, पोलिसांनी नवरदेव आणि मुलाच्या मामासह एकूण ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, लग्नाच्या वरातीतील डीजे, ट्रॅक्टरसह एकूण 80 हजारांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे.

Published on: Feb 27, 2025 12:31 PM