China Global Times : चीनविरोधात भारताची मोठी अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं, आता थेट…

China Global Times : चीनविरोधात भारताची मोठी अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं, आता थेट…

| Updated on: May 14, 2025 | 7:35 PM

ग्लोबल टाईम्सने आपल्या वृत्तात दावा केला होता की, पाकिस्तानमधील अनेक ठिकाणांवर रात्रीच्या वेळी भारतीय हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान हवाई दलाने आणखी एक भारतीय लढाऊ विमान पाडले आहे. ग्लोबल टाईम्सने पाकिस्तानी लष्करातील अज्ञात सूत्रांचा हवाला देऊन हा अहवाल प्रकाशित केला. तो पूर्णतः खोटा असल्याचे समोर आले आहे.

भारताने पाकिस्ताननंतर आता चीनविरुद्ध कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आज बुधवारी (१४ मे) भारताने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वरील चिनी मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’चे अकाऊंट देशात बॅन केले आहे. ग्लोबल टाईम्स हे चीनच्या सरकारचं मुखपत्र आहे. जे पूर्णपणे चिनी कम्युनिस्ट पक्षाला प्रोत्साहन देते. दरम्यान यापूर्वी पाकिस्तानसोबतच्या तणावामुळे भारताने पाकिस्तानातील अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांचे एक्स म्हणजे ट्विटकअकाऊंट देखील बॅन केले होते. आता भारताने चीनविरुद्धही अशीच कारवाई केली आहे. ग्लोबल टाईम्सने भारताने दहशतवादाविरुद्ध सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दल चुकीची माहिती दिली होती. ज्यावर भारताने जोरदार टीका केली होती. यानंतर, भारताने आता ग्लोबल टाईम्सच्या एक्स-अकाऊंवर बंदी घातली आहे. दरम्यान, चीनने पुन्हा एकदा एक नापाक हरकत केल्याचे आज पाहायला मिळाले. अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे चीनने बदलली आहेत. यानंतर भारताने यावर तीव्र आक्षेप घेतला आणि चीनला चोख प्रत्युत्तर दिलंय.

Published on: May 14, 2025 04:19 PM