Ahmedabad Plane Crash : वडिलांच्या अंत्यविधीसाठी आलेल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबाचा हृदय पिळवटणारा आक्रोश
एयर इंडियाच्या अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत वडिलांच्या अंत्यविधीसाठी आलेल्या तरुणाचा काल मृत्यू झालेला आहे.
वडिलांच्या अंत्यविधीसाठी आलेल्या तरुणाचा काल एयर इंडियाच्या अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत मृत्यू झालेला आहे. एल. लॉरेन्स यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबाने हंबरडा फोडला आहे. लॉरेन्स हे 1 जून रोजी भारतात आपल्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी आले होते. काल ते लंडनला परतणार होते. मात्र अहमदाबाद येथून निघालेलं विमान मेघानी येथे कोसळलं. या भीषण अपघातात 241 प्रवाशांनी आपला जीव गमावला. यात लॉरेन्स देखील होते. लॉरेन्स ख्रिश्चन यांचं कुटुंब लंडनमध्ये आहे. त्यांचं तीन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांच्या आत्त्यांनी याबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांना आपल्या भावना अनावर झाल्याने रडू फुटलं.
दरम्यान, काल मेघानी येथे झालेल्या विमान अपघाताने देशात एकच खळबळ उडाली आहे. 242 प्रवासी घेऊन जाणारं हे एअर इंडियाचं विमान होतं. हा अपघात इतका भीषण होता की यात 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ज्या इमारतीवर हे विमान कोसळलं त्यातल्या 24 वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा यात मृत्यू झाला आहे.
