आसाममध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील तरुणांची अजित पवारांना साद, व्हिडिओद्वारे क्वारंटाईन सेंटरमधील असुविधा समोर

| Updated on: Jan 14, 2022 | 11:00 PM

महाराष्ट्रातून जवळपास 200 तरुण आसाममध्ये लष्करी भरतीसाठी गेली होती. त्यावेळी तिथे त्यांची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यात हे तरुण निगेटिव्ह आल्याचा त्यांचा दावा आहे. असं असलं तरी त्यांना एका क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. तिथे त्यांना चांगलं जेवण, पाणी मिळत नाही. तसंच आसाममध्ये प्रचंड थंडी असताना या तरुणांना साधं पांघरायलाही मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे.

Follow us on

मुंबई : लष्करी सेवेसाठी (Military Recruitment) आसाममध्ये (Assam) गेलेले महाराष्ट्रातील तरुण आसाममध्ये अडकून पडले आहेत. या तरुणांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. महत्वाची बाब म्हणजे आम्ही कोरोना पॉझिटिव्ह नसतानाही आम्हाला क्वॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आल्याचा आरोप या मुलांचा आहे. तसंच या ठिकाणी चांगलं जेवण, पाणी उपलब्ध होत नसल्याचं या मुलांचं म्हणणं आहे. अशावेळी या मुलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना साद घातली आहे.