Walmik Karad News : CCTV बंद करून वाल्मीक कराडला तुरुंगात चहा, नाश्ता मिळतो, दमानियांचा आरोप

Walmik Karad News : CCTV बंद करून वाल्मीक कराडला तुरुंगात चहा, नाश्ता मिळतो, दमानियांचा आरोप

| Edited By: | Updated on: Feb 28, 2025 | 4:59 PM

Jitendra Awhad and Anjali Damania Allegations on Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मीक कराड याला तुरुंगात VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड आणि अंजली दमानिया यांनी केला आहे.

बीडच्या कारागृहात वाल्मीक कराड याला VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड आणि अंजली दमानिया यांनी केला आहे. देशमुख कुटुंबीय कारागृह प्रशासनाकडे वाल्मीक कराडचं सीसीटीव्ही फुटेज मागणार आहेत. जेलमध्ये असलेले कर्मचारीच आरोपी असलेल्या वाल्मीक कराडला सहकार्य करत असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केला आहे.

यावर आता विरोधीपक्ष नेत्यांकडून टीका होत आहे. वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा सोबती आहे. मंत्र्यांच्या सोबत्याला VIP ट्रीटमेंट नाही द्यायची तर कोणाला द्यायची? वाल्मीक कराड याला VIP ट्रीटमेंट ही धनंजय मुंडे यांच्यामुळेच मिळते असा आरोप, कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर कराडला तुरुंगात मालीश करून दिली जाते, चहा नाश्ता आणि चांगलं जेवण पुरवलं जात असल्याचा दावा नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. खून करावा तरी वाल्मीकने आणि जगावं तरी वाल्मीकनेच आपण वेडे आहोत, अशीही टीका अवहाडांनी यावेळी केली आहे.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील वाल्मीक कराड याला तुरुंगातील सीसीटीव्ही बंद करून जेवण, नाश्ता पुरवून VIP ट्रीटमेंट दिली जात असल्याचं म्हंटलं आहे.

Published on: Feb 28, 2025 04:59 PM