AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE Updates : हेमंत कांबळे यांची शिंदे शिवसेना प्रवक्तेपदी नियुक्ती

| Edited By: | Updated on: Jan 08, 2026 | 10:51 PM
Share

Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates: इम्तियाज जलील यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसचे उमेदवार हबीब कुरेशी आणि कलीम कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शासनातर्फे फिर्यादीत जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Maharashtra News LIVE Updates : हेमंत कांबळे यांची शिंदे शिवसेना प्रवक्तेपदी नियुक्ती
Breaking news

मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त मुलाखत प्रक्षेपित झाली आहे. त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गिरीश महाजन नाशिक मध्ये तळ ठोकून आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सभेची तयारी आणि बंडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाजपाचा शंभर प्लसचा नारा आहे. गिरीश महाजन प्रत्येक उमेदवाराच्या वैयक्तिक गाठी भेटी घेणार आहेत. शहरातल्या तीनही विभागाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घेणार भेटी. निवडणुकीच्या तोंडावर गिरीश महाजन ऍक्टिव्ह आहेत. जशी जशी निवडणूक जवळ येत आहे, सर्वच पक्ष मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. आज सकाळी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सिद्धार्थ उद्यानात जात जेष्ठ नागरिकांशी संवाद साधला.तसेच यावेळी शिंदे सेनेचा प्रचार करण्यासाठी आलेल्या वासुदेवांशी दानवे यांची भेट झाली आणि त्यांना दानवे यांनी उबाठाचे पत्रक देत उद्धव ठाकरे यांच्या सभेला येण्याचे वासुदेवाना विनंती केली. तसेच दानवे यांनी उबाठाच्या मशालला मतदान कण्याची विनंती जेष्ठ नागरिक आणि मतदारांना केली.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Jan 2026 07:53 PM (IST)

    हेमंत कांबळे यांची शिंदे शिवसेना प्रवक्तेपदी नियुक्ती

    हेमंत कांबळे यांची शिंदे शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हेमंत कांबळे यांनी अवघ्या काही दिवसांपूर्वी मनसेला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला होता.

  • 08 Jan 2026 07:50 PM (IST)

    मी सर्टिफाईड नागपूरकर, मुख्यमंत्री फडणवीस यांचं राज ठाकरेंना उत्तर

    मी सर्टिफाईड नागपूरकर आहे, असं उत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनसेप्रमुख यांना दिलं आहे. मुख्यमंत्री नागपूरमध्ये तर्री पोहा विथ फडणवीस या कार्यक्रमात बोलत होते.

  • 08 Jan 2026 07:22 PM (IST)

    मनसेप्रमुख राज ठाकरेंचं ठाण्यात शक्तीप्रदर्शन

    मनसेप्रमुख राज ठाकरेंचं ठाण्यात शक्तीप्रदर्शन पाहायला मिळत आहे. राज ठाकरे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या शाखांना भेट देणार आहेत. तसेच ठाकरे शिवसेना आणि मनसे युतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.

  • 08 Jan 2026 07:19 PM (IST)

    15 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, राज्य सरकारकडून अधिसूचना जाहीर

    राज्यात येत्या 15 जानेवारीला एकूण 29 महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निमित्ताने 15 जानेवारीला संबंधित मतदानक्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही सार्वजनिक सुट्टी संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदारसंघाबाहेर कामानिमित्त असलेल्या मतदारांनाही लागू असणार आहे.

    गुरुवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर

  • 08 Jan 2026 06:57 PM (IST)

    ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक धक्का

    ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. मानखुर्द विधानसभेतील प्रभाग क्रमांक 139 चे माजी नगरसेवक  राजेंद्र वाघमारे यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश झाला आहे.

  • 08 Jan 2026 06:31 PM (IST)

    काँग्रेस आणि शिवसेनेचा वेगळा जाहिरनामा आहे – काँग्रेस नेते सतेज पाटील

    काँग्रेस आणि शिवसेनेचा वेगळा जाहिरनामा आहे . 100 जागामध्ये आम्ही कुठेही एकमेकांच्या विरोधात लढत नाही.काँग्रेस 98 जागांवर लढत आहे आणि शिवसेना 71 जागांवर लढत आहे असे काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी म्हटले आहे.

  • 08 Jan 2026 06:20 PM (IST)

    ठाकरे बंधू आता वैफल्यामधून एकत्र आलेले आहेत – खासदार सुनील तटकरे

    ठाकरे बंधू आता वैफल्यामधून एकत्र आलेले आहेत, त्यामुळे ते काय बोलतात त्यांना मी फारसं महत्त्व देत नाही असे विधान खासदार सुनील तटकरे यांनी केले आहे.

  • 08 Jan 2026 05:53 PM (IST)

    कॅनडामध्ये कबड्डी खेळाडूच्या घरावर गोळीबार

    लॉरेन्स बिश्नोई टोळीने कॅनडामधील एका कबड्डी खेळाडूच्या निवासस्थानी गोळीबार केला आहे. गोल्डी ढिल्लन यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये जबाबदारी स्वीकारली आहे.

  • 08 Jan 2026 05:40 PM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कल्याण डोंबिवली दौरा

    राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवली दौरा केला.  दौऱ्यात राज ठाकरे यांनी मनसे ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलं.  उद्घाटन दरम्यान सर्वच उमेदवारांचे आभार मानले. आधी कोणाला कितीची कुठून ऑफर होती याची घेतली माहिती या नंतर प्रतिकूल परिस्थितीत निष्ठेने पक्षासोबत राहिल्याबद्दल राज ठाकरे यांनी उमेदवारांचे आभार मानत अभिनंदन केल्याचं सूत्रांची माहिती आहे.

  • 08 Jan 2026 05:25 PM (IST)

    ईडीच्या छाप्याविरोधात ममता बॅनर्जी उद्या कोलकातामध्ये मोर्चा काढणार

    ईडीच्या छाप्याविरोधात ममता बॅनर्जी उद्या कोलकातामध्ये मोर्चा काढणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा मोर्चा दुपारी 2 वाजता बस स्टँड ते हाजरा क्रॉसिंगपर्यंत सुरू होईल.

  • 08 Jan 2026 05:20 PM (IST)

    कोलकाता: ईडीच्या छाप्याविरोधात ममतांचा निषेध

    कोलकातामध्ये ईडीच्या छाप्याविरोधात तृणमूल काँग्रेस संपूर्ण बंगालमध्ये निषेध करत आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की भाजपने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यांनी आम्हाला कमी लेखू नये. भाजप हा लोकशाहीचा खून करणारा पक्ष आहे. ते लूट करतात आणि खोटे बोलतात.

  • 08 Jan 2026 05:10 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरात मुख्यमंत्र्यांनी ठेवलं विकासाचं व्हिजन

    छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टॉक शोच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीनगरसाठी भविष्यातील विकासाचा प्लान सांगितला. या भागातील डीपी रोड अतिक्रमणमुक्त करणार असंही त्यांनी यावेळी सांगितलं. किर्लोस्कर, जेएसडब्ल्यूसारखे मोठे उद्योग या भागात येतील असं त्यांनी सांगितलं. दावोसमधून संभाजीनगरसाठी आणखी प्रकल्प आणू अशीही घोषणा त्यांनी यावेळी केली.

  • 08 Jan 2026 04:50 PM (IST)

    नाशिकमधील 8 हजार इमारतींच्या पुनर्विकासाला मिळणार गती

    मुंबई पुण्याप्रमाणे नाशिकला देखील इमारतींच्या पुनर्विकासासाठी सारखे नियम लागू करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमधील विकासकांशी व्हिडीओ कॉलद्वारे साधला संवाद. नाशिकमधील ८ हजार इमारतींच्या पुनर्विकासाला मिळणार गती

  • 08 Jan 2026 04:40 PM (IST)

    अहिल्यादेवी यांचे नाव देऊन आम्ही थांबणार नाही- देवेंद्र फडणवीस

    अहिल्यादेवी यांचे नाव देऊन आम्ही थांबणार नाही तर ज्या पद्धतीने अहिल्यादेवी यांनी त्यांची राजधानी महेश्वर केले तसेच अहिल्यानगर शहर झाले पाहिजे. आत्ताच मला एक घोटाळ्या संदर्भात निवेदन मिळाले, त्या संदर्भात मी त्यांना सोडणार नाही, ज्यांनी कंपनी स्थापून गोरगरिबाना फसवले, मी केंद्रीय गृहमंत्री यांना भेटून cbi मार्फत चौकशी करण्याची मागणी करणार, देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

  • 08 Jan 2026 04:30 PM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अत्यंत मोठा दावा

    यावेळी आपण पहिल्यांदा अहिल्यानगरचा महापौर निवडून देणार आहे. आपल्या राज्यकारभाराचा अखिलपट ज्यांनी लिहिला त्यांच्या नावाने हा जिल्हा ओळखला जातो. मी इथे येण्या आधीची भाजप राष्ट्रवादी युतीचे पाच नगरसेवक आपण बिनविरोध निवडून दिले. आता मला खात्री आहे सत्ता देखील आपलीच येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

  • 08 Jan 2026 04:20 PM (IST)

    पैशाची मस्ती भाजपला आहे हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

    मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे आणि जमिनीवरच राहणं मला पसंत आहे, हेलिकॉप्टर बुकिंग वरून हर्षवर्धन सपकाळ यांचे विधान. भाजपने त्यांच्या मित्र पक्षांना आणि विरोधी पक्षांना प्रचार करता येऊ नये म्हणून सर्व हेलिकॉप्टर बुक करून ठेवले आणि ब्लॉक करून ठेवले

  • 08 Jan 2026 04:10 PM (IST)

    राज ठाकरे यांचा उद्घाटनानंतर कल्याण पश्चिमच्या उमेदवारांशी संवाद

    राज ठाकरे उद्घाटनानंतर कल्याण पश्चिमच्या उमेदवारांशी संवाद. सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बाहेर काढत फक्त उमेदवारांना कार्याला घेऊन सुरू केले संवाद. राज ठाकरे सध्या कल्याण दाैऱ्यावर आहेत.

  • 08 Jan 2026 04:01 PM (IST)

    कल्याणच्या साई चौकात मनसे अध्यक्ष राज ठाकरे दाखल

    कल्याण साई चौकात मनसे अध्यक्ष राज ठाकरे दाखल

    प्रभाग क्रमांक 2 मधील मनसे आणि ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचे करणार उद्घाटन

    प्रभाग क्रमांक 2 मधून मनसेचे उमेदवार उल्हास भोईर , सुजित जाधव त्याचबरोबर ठाकरे गटाचे उमेदवार सुनीता पाटील, सीता नाईक यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचं करणार उद्घाटन

  • 08 Jan 2026 03:51 PM (IST)

    पुणे ठाण्याप्रमाणेच आता नाशिकमध्येही पुनर्विकास होणार

    पुणे ठाण्याप्रमाणेच नाशिकमध्ये पुनर्विकास होणार

    एकनाथ शिंदे यांचं फोनवरून आश्वासन

    नाशिकमध्ये पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

    एफएसआय मिळत नसल्याने येत आहेत अडचणी

    ऊदय सामंत यांनी फोन करताच शिंदेंचं नाशिककरांना विकासाचं आश्वासन

  • 08 Jan 2026 03:33 PM (IST)

    जळगावात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत रोड शो सुरू

    जळगावात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत रोड शो सुरू

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा रद्द झाल्याची चर्चा

    एकनाथ शिंदे येणार नसल्याने मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत रोड शो सुरू

    एकनाथ शिंदे यांना येण्यास उशीर असल्याने रोड सुरू झाल्याची मंत्री गुलाबराव पाटलांची माहिती

    महापालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ जळगावात शिवसेनेच्या वतीने रोड शो

  • 08 Jan 2026 03:09 PM (IST)

    नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप तर्फे प्रचार पुस्तिकेचे प्रकाशन

    नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप तर्फे प्रचार पुस्तिकेचे प्रकाशन

    नाशिक भाजप कार्यालयात शहराध्यक्ष आणि दोन आमदारांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा

    प्रचार पुस्तिकेला ‘कुंभपर्वातील अमृतवचन’ असे देण्यात आले नाव

    महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची जय्यत तयारी

  • 08 Jan 2026 02:58 PM (IST)

    चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

    जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या कन्नड घाटात भीषण अपघात झाला आहे.  उज्जैन येथे दर्शनासाठी निघालेल्या मित्रांचा हा अपघात झाला आहे.  घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहनाचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. या अपघातात नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील तिघांचा मृत्यू झाला आहे.

  • 08 Jan 2026 02:40 PM (IST)

    जळगावच्या सराफा बाजार सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण

    जळगावच्या सराफा बाजार सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 900 रुपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल 7 हजारांनी घसरण झाली आहे. सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 39 हजार 874 रुपये तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 48 हजार 230 रुपयांवर आले आहेत. गेल्या 15 दिवसात पहिल्यांदाच सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. .
  • 08 Jan 2026 02:28 PM (IST)

    तृतीयपंथियांनी घेतली मतदान करण्याची शपथ, मतदान जनजागृतीसाठी मालेगाव पालिकेचा उपक्रम

    मालेगाव महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू असून विविध राजकीय पक्ष प्रचारात उतरले आहे..तर दुसरीकडे महापालिका प्रशासन मतदानाचा टक्का वाढावा मत जनजागृती व्हावी यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवित आहे..यामध्ये मालेगाव शहरातील तृतीयपंथीयांना एकत्रित करून त्यांना मतदान करण्याबाबत जनजागृती करत मतदान करण्याची शपथ देण्यात आली मतदानाची टक्केवारी वाढावी, मतदान करण्यापासून समाजातील कोणताही घटक वंचित राहू नये यासाठी महापालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे..
  • 08 Jan 2026 02:18 PM (IST)

    सलील देशमुख यांच्या मनात नेमकं काय? पवारांना सोडून ठाकरेंच्या प्रचारात

    शरद पवार गटात नाराज असलेले सलील देशमुख नागपुरात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या प्रचारात दिसून आले.  सलील देशमुख यांच्याकडून मशालीचा प्रचार करतानाचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय, असा सवाल उपस्थित केला जातोय.
  • 08 Jan 2026 01:58 PM (IST)

    नवी मुंबई पालिकेत भाजपचा महापौर बसेल

    नवी मुंबई पालिकेत भाजपचा महापौर बसेल, असे रवींद्र चव्हाण म्हणाले.एक वेगळे व्हिजन या जाहिरनाम्यातून ठेवले आहे. नवी मुंबईचा सर्व दृष्टीने विकास झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासकामाला प्रेरित होऊन पक्षप्रवेश करणार आहे. काँग्रेसधील सर्व नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे ठरवले आणि मीडिया च्या समोर विधिवत पद्धतीने पक्षप्रवेश होतोय असे रवींद्र चव्हाण म्हणाले.

  • 08 Jan 2026 01:50 PM (IST)

    राज्यात आम्ही युतीत तर महापालिकेत वेगळे लढतोय

    राज्यात आम्ही युतीत आहोत तर छत्रपती संभाजीनगर मध्ये आमचे घटक पक्ष वेगळे वेगळे लढत आहोत, असे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. जाहीरनाम्यात पाणी प्रश्न वचन आम्ही दिले आहे.या शहरत पर्यटन सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे.शौचालयाची अवस्था दयनीय आहे.या निवडणुकीत आमची कामगिरी चांगली राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  • 08 Jan 2026 01:40 PM (IST)

    भाजपकडून जाहीरनाम्याचं प्रकाशन

    नवी मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपकडून जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं. भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक , संदीप नाईक, सजीव नाईक,यांच्या उपस्थितीत जाहीरनाम प्रकाशित करण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभीवर जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. गणेश नाईक यांच्या हस्ते नवी मुंबईत भाजपकडून जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला.

  • 08 Jan 2026 01:30 PM (IST)

    नवनीत राणा यांचा सूतगिरणी प्रभागात प्रचार

    देशात सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे, या बावनकुळे यांच्या वक्तव्यावर नवनीत राणांनी प्रतिक्रिया दिली आहे.विरोधकांचं काम आरोप करणे आहे.आमचं काम जनतेपर्यंत पोहचले आहे.जो कार्यकर्ता कमळ सोबत प्रामाणिक आहे त्याच्यासोबत नवनीत राणा आहे.सूतगिरणी प्रभागात भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमांची युती आहे त्याचा मी प्रचार करत आहे, असे राणा म्हणाल्या.

  • 08 Jan 2026 01:20 PM (IST)

    सचिन खरात यांची निवडणुकीतून माघार

    सचिन खरात यांची निवडणुकीतून माघार माझा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नसल्याचे केले जाहीर अजित पवारांनी सन्मान जनक जागा दिल्या नाहीत म्हणून बाहेर पडल्याचे सचिन खरात यांच्याकडून सांगण्यात येत आहे

  • 08 Jan 2026 01:10 PM (IST)

    गाढवाच्या गळ्यात पाट्या अडकून अनोखं आंदोलन

    नांदेडच्या भोकर येथील सुमठाणा ग्रामपंचायतीने विकास कामात भ्रष्टाचाराचा आरोप करत अनोखं आंदोलन करण्यात आलं. भोकर पंचायत समिती कार्यालयासमोर हे अनोखं आंदोलन करण्यात आलं.गाढवाच्या गळ्यात गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच यांच्या पाट्या लावून आंदोल करण्यात आलं. वेळोवेळी तक्रारी करूनही चौकशी होत नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.ग्रामपंचायत ने केलेल्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

  • 08 Jan 2026 01:01 PM (IST)

    अंबरनाथ काँग्रेसचे १२ नगरसेवक आज भाजप मध्ये

    अंबरनाथ काँग्रेसचे १२ नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.नवी मुंबईत भाजप अध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कारवाई केल्यानंतर ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील नाराज झाले होते. अंबरनाथ शहरात भाजप अजित पवार गट आणि काँग्रेस यांनी अंबरनाथ विकास आघाडी नवीन तयार केल्याने कारवाई केली होती

  • 08 Jan 2026 12:54 PM (IST)

    अंबरनाथ मधील काँग्रेसचे 12 निलंबित झालेले नगरसेवक अज्ञात स्थळी

    अंबरनाथ मधील काँग्रेसचे निलंबित झालेले ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या सह 12 नगरसेवक अज्ञातस्थळी गेले आहेत. ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांचा मोबाईल फोन नॉट रिचेबल आहे.

  • 08 Jan 2026 12:43 PM (IST)

    70 हजार कोटींच्या घोटाळ्यावरून बावनकुळेंनी दिला इशारा, अजित पवारांचं म्हणणं काय ?

    70 हजार कोटींच्या घोटाळ्यावरून  झालेल्या आरोपाच्या मुद्यावरून अजित पवारांनी केलेल्या विधानानंतर ही केस अजून कोर्टात सुरू आहे, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला होता.  त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  प्रत्येकाने काय बोलावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्यावर मी जास्त बोलणार नाही असं ते म्हणाले.

    केंद्रात एनडीएसोबत आहोत, आम्ही राज्यात युती सोबत आहोत, त्यांच्यासोबत काम करत आहोत. विकास करत आहोत. तसं इथली निवडणूक वेगळी आहे. इथले स्थानिक काम करणारे होते त्यांच्या चुका मी मांडत आहे असंही अजित पवार यांनी नमूद केलं.

  • 08 Jan 2026 12:28 PM (IST)

    राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो- अजित पवार

    लोकांना काय वाटतं माहीत नाही. ते त्या अँगलने का विचार करतात ते माहीत नाही. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही युती करतोय. कोल्हापुरात आधी युती झाली होती. जेव्हाही चर्चा केल्यावर कुणाला तरी बरोबर घेतलं पाहिजे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सूर जुळले पाहिजे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या प्रश्नावर अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.

    इतके वर्ष राष्ट्रवादी म्हणून काम केलं.  20121 नंतर आम्ही वेगळे झालो होतो. पक्षाची स्थापना झाल्यापासून आम्ही एकत्र काम केलं आहे. राजकारणात कोणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो असंही अजित पवार म्हणाले

  • 08 Jan 2026 12:16 PM (IST)

    पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ नागरिकांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा संवाद

    आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने  उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत. हे गेल्या चार दिवसापासून पिंपरी चिंचवड शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रचारासाठी येत आहेत.

  • 08 Jan 2026 12:03 PM (IST)

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांची भेट

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांची भेट झाली . एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांची भेट झाली. औपचारिक चर्चा झाल्याची माहिती समोर.

  • 08 Jan 2026 11:57 AM (IST)

    अहिल्यानगर- आमदार संग्राम जगताप यांच्या दोन अंगरक्षकांचं निलंबन

    अहिल्यानगर- आमदार संग्राम जगताप यांच्या दोन अंगरक्षकांचं निलंबन करण्यात आलं. कर्तव्यात कसूर आणि शस्त्र हाताळणीत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी बॉडीगार्डवर कारवाई करण्यात आली. नीलेश भालसिंग आणि राघवेंद्र भालसिंग यांना निलंबित करण्यात आलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये रिव्हॉल्वरचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याचा ठपका दोघांवर आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला होता.

  • 08 Jan 2026 11:44 AM (IST)

    बीडच्या विशेष मकोका न्यायालयात पार पडली संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी

    बीड- संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात पार पडली. याप्रकरणी पुढील सुनावणी 23 जानेवारी रोजी होणार आहे. पुरावे सादर करण्यासंदर्भातील कागदपत्रांची यादी सरकारी पक्षाने न्यायालयासमोर सादर केली.

  • 08 Jan 2026 11:36 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये MIMचं मोठं शक्तीप्रदर्शन

    छत्रपती संभाजीनगरमध्ये आज ओवैसींची सभा आहे. असदुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील यांची पदयात्रा सुरू आहे. ओवैसींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM कडून मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे.

  • 08 Jan 2026 11:34 AM (IST)

    राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगावच्या दौऱ्यावर

    राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. महापालिका निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांचा आज दुपारी रोड शो पार पडणार आहे. ज्या विजयी रथातून एकनाथ शिंदे रोड शोमध्ये सहभागी होतील, तो रथ फुलांच्या माळांनी रथ सजविण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर शस्त्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • 08 Jan 2026 11:27 AM (IST)

    हल्ल्यानंतर इम्तियाज जलील यांना सुरक्षा

    छत्रपती संभाजीनगर: काल इम्तियाज जलील यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांना सुरक्षा देण्यात आली आहे. आता त्यांच्यासोबत एक उपनिरीक्षक आणि नऊ शस्त्रधारी असे 10 पोलीस असणार आहेत.

  • 08 Jan 2026 11:12 AM (IST)

    राज ठाकरे आज कल्याण–डोंबिवलीत, मनसेचं जोरदार शक्तिप्रदर्शन

    मनसे प्रमुख राज ठाकरे आज कल्याण–डोंबिवली दौऱ्यावर आहेत. उमेदवारांच्या जनसंपर्क कार्यालयांचे ते उद्घाटन करणार आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना राज ठाकरे निवडणुकीचा कानमंत्र देणार आहेत. महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी होण्यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

    कल्याण डोंबिवलीत मनसेकडून एकूण 49 उमेदवार देण्यात आले होते. मात्र यापैकी 16 उमेदवारांचे अर्ज बाद तर काहींनी अर्ज मागे घेतले आहेत. ज्यात डोंबिवली शहर प्रमुख मनोज घरत यांचाही समावेश आहे. सध्या कल्याण डोंबिवलीत 33 उमेदवार रिंगणात असून मनसे उमेदवारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पहायला मिळतंय.

  • 08 Jan 2026 10:58 AM (IST)

    अहिल्यानगरमध्ये देवेंद्र फडणवीसांची तोफ धडाडणार, आज जाहीर सभा पार पडणार

    अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडणार आहे. शहरातील राजकीय वातावरण तापले असून, भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या सभेला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद सभापती राम शिंदे, आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दूर ठेवत भाजप आणि राष्ट्रवादीने स्थानिक पातळीवर युती केल्याने, मुख्यमंत्री फडणवीस आपल्या भाषणातून नेमकी काय भूमिका मांडतात आणि विरोधकांवर काय निशाणा साधतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सभेसाठी प्रशासनाने आणि कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली असून अहिल्यानगरमध्ये महायुतीचे मोठे शक्तीप्रदर्शन पाहायला मिळणार आहे.

  • 08 Jan 2026 10:49 AM (IST)

    कल्याणमध्ये निवडणुकीच्या काळात पोलिसांची मोठी कारवाई, पिस्तुलासह सराईत गुन्हेगाराला अटक

    कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून, कल्याणमध्ये एका सराईत गुन्हेगाराला पिस्तुलासह रंगेहात पकडण्यात आले आहे. करण जितू निशाद (२१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कल्याणमधील नेतीवली परिसरात हा आरोपी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे, आरोपी करण निशाद हा सराईत गुन्हेगार असून अल्पवयीन असल्यापासूनच त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने हे घातक शस्त्र कुठून आणले आणि तो कोणाला विकणार होता किंवा कोणावर हल्ला करण्याच्या तयारीत होता, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

  • 08 Jan 2026 10:39 AM (IST)

    राजगुरुनगर नगरपरिषदेचा भोंगळ कारभार, ड्रेनेजचे सांडपाणी नागरिकांच्या घरात

    पुण्याजवळील राजगुरुनगर शहरात नगरपरिषदेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरी समस्यांचा मोठा उद्रेक झाला आहे. शहरातील ड्रेनेज व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, सांडपाणी थेट नागरिकांच्या घरात शिरत आहे. यामुळे घरातील फर्निचर, भांडीकुटी आणि जीवनावश्यक वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. सांडपाणी निचरा होण्याची योग्य व्यवस्था नसल्याने आणि ड्रेनेजचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. घरात सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेष म्हणजे, वारंवार तक्रारी करूनही नगरपरिषद प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा खळबळजनक आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

  • 08 Jan 2026 10:29 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये असदुद्दीन ओवैसींची पदयात्रा, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

    छत्रपती संभाजीनगरमध्ये काल झालेल्या राड्यानंतर आज एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या उपस्थितीत शहरात भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे. ही पदयात्रा चंपा चौक ते बुढि लेन या दरम्यान निघणार आहे. यामध्ये ओवैसींसोबत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील हेदेखील सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, कालच माजी खासदार इम्तियाज जलील यांचे समर्थक आणि काँग्रेसचे कलीम कुरेशी यांचे समर्थक यांच्यात जोरदार राडा झाला होता. या पार्श्वभूमीवर शहरात कमालीचा तणाव असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पदयात्रा निघणाऱ्या मार्गावर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला असून चोख बंदोबस्त ठेवला आहे.

  • 08 Jan 2026 10:19 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचा राडा; ओवैसींच्या सभेपूर्वी रॅलीत कार्यकर्त्यांना मारहाण

    छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम (MIM) पक्षातील अंतर्गत नाराजीनाट्याने आता हिंसक वळण घेतले आहे. पक्षाध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेसाठी निघालेल्या रॅलीला मिल कॉर्नर भागात काळे झेंडे दाखवण्यात आल्याने मोठा राडा झाला. या घटनेचा एक नवीन व्हिडिओ समोर आला असून, यामध्ये एमआयएमच्या रॅलीमधील कार्यकर्त्यांना काही लोकांनी बेदम मारहाण केल्याचे दिसत आहे. शहरात एमआयएममधील गटबाजी आणि नाराजी गेल्या काही दिवसांपासून उफाळून येत आहे. ओवैसींच्या उपस्थितीतच कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या राड्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

  • 08 Jan 2026 10:09 AM (IST)

    सांगली-मिरजेत जयंत पाटलांचा झंझावात, विरोधकांवर जोरदार प्रहार

    सांगली-मिरज महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने प्रचाराचा धडाका लावला असून, आमदार जयंत पाटील यांनी मिरजेत मॅरेथॉन सभा घेतल्या. प्रभाग क्रमांक २० मधील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार अभिजीत हारगे आणि आम्रपाली कांबळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पाटलांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. या प्रभागात भाजप, अजित पवार गट आणि काँग्रेस आघाडी अशी तिरंगी लढत होत असून, अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांचे चिरंजीव मैदानात असल्याने ही लढाई प्रतिष्ठेची बनली आहे.

  • 08 Jan 2026 09:55 AM (IST)

    रील स्टार ऊसतोड मजुराच्या अपघाती मृत्यूमुळे धाराशिव जिल्ह्यात हळहळ व्यक्त

    राज्यभरात सोशल मीडियावर रीलस्टार म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यातील गणेश डोंगरे याच्या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील भाऊसाहेब बिराजदार कारखान्यावरती उसाची ट्रॉली पलटी होऊन गणेश डोंगरे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. बीड जिल्ह्यातील गणेश डोंगरे हा आपली पत्नी अश्विनी सह धाराशिव जिल्ह्यामध्ये ऊस तोडणीचे काम करत होता. ऊसतोड मजुराची संघर्षमय कहानी दोघे ही पती-पत्नीची रीलच्या माध्यमातून महाराष्ट्रभर दाखवात होते. यामूळे त्यांची ओळख निर्माण झाली होती. मात्र अचानक बैलगाडी वरील ऊस अंगावर पडल्याने गणेश डोंगरे याचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.

  • 08 Jan 2026 09:45 AM (IST)

    धुळे शहराचा तापमानाचा पुन्हा एकदा घसरला..

    धुळे शहराचा तापमानाचा पुन्हा एकदा घसरला आहे.  7.2 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण होतं.  तापमानात आज मोठी घट झाली आहे.  तापमानात घट झाल्याने व्यायाम प्रेमींमध्ये उत्साह दिसून येत आहे. पांजरा नदीकिनारी व्यायाम करणाऱ्यांची मोठी गर्दी देखील पाहायला मिळत आहे.

  • 08 Jan 2026 09:30 AM (IST)

    छत्रपती संभाजी नगर शहरात होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवगर्जना सभेचं टीझर रिलीज

    छत्रपती संभाजी नगर शहरात होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवगर्जना सभेचं टीझर रिलीज झालं आहे. नछत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांची 10 जानेवारीला पार पडणार भव्य सभा होणार आहे. दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांची सभा झालेल्या सांस्कृतिक मैदानावर उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी संभाजी नगरात जोरात तयारी सुरू झाली आहे.

  • 08 Jan 2026 09:13 AM (IST)

    पद्मभूषण माधव गाडगीळ यांचं निधन

    पद्मभूषण माधव गाडगीळ यांचं निधन झालं आहे. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. डॉ शिरीष प्रयाग यांच्या हॉस्पिटल मध्ये त्यांचे रात्री 11 वाजता निधन झाले.

  • 08 Jan 2026 09:08 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम मधील गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर

    एमआयएमच्या रॅलीमधील काही कार्यकर्त्यांना मारहाण, काळे झेंडे दाखवत एमआयएमचे झेंडे देखील हिसकावले आहेत. काल झालेल्या असोद्दीन ओवैसिंच्या सभेला जाणाऱ्या रॅलीला काळे झेंडे दाखवण्यात आले. छत्रपती संभाजीनगरच्या मिल कॉर्नरवरील कालच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बुधवारी दुपारी इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर पुन्हा सायंकाळी गोंधळ झाला.

  • 08 Jan 2026 08:58 AM (IST)

    धुळे शहराचा तापमानाचा पुन्हा एकदा घसरला

    धुळे शहराचा तापमानाचा पुन्हा एकदा घसरला. 7.2 अंश तापमानाची नोंद. गेल्या दोन दिवसापासून होते ढगाळ वातावरण. तापमानात आज झाली मोठी घट. तापमानात घट झाल्याने व्यायाम प्रेमींमध्ये उत्साह. पांजरा नदीकिनारी व्यायाम करणाऱ्यांची मोठी गर्दी.

  • 08 Jan 2026 08:47 AM (IST)

    उद्धव ठाकरे यांच्या शिवगर्जना सभेचं टीझर रिलीज

    छत्रपती संभाजी नगर शहरात होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवगर्जना सभेचं टीझर रिलीज. छत्रपती संभाजीनगर मध्ये उद्धव ठाकरे यांची 10 जानेवारीला पार पडणार भव्य सभा. दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांची सभा झालेल्या सांस्कृतिक मैदानावर होणार उद्धव ठाकरेंची सभा. उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी संभाजी नगरात जोरात तयारी सुरू.

  • 08 Jan 2026 08:25 AM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांचा आज सायंकाळी 4 वाजता टॉक शो

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज सायंकाळी 4 वाजता टॉक शो होणार आहे. गरवारे स्टेडियमजवळील प्रेसिडेन्ट लॉन्सवर आयोजित हा टॉक शो एलसीडीच्या माध्यमातून 80 हून अधिक ठिकाणी लाईव्ह करण्यात येणार आहे. शहरासाठी असलेले व्हिजन, भविष्यातील नियोजन, गुंतवणूक, शासन म्हणून काय विशेष प्लॅन असेल, यावर मुख्यमंत्री आज बोलणार आहेत

  • 08 Jan 2026 08:24 AM (IST)

    इम्तियाज जलील हल्ला प्रकरण, 50 जणांच्या जमावावर गुन्हा

    एमआयएम व काँग्रेसचे उमेदवार प्रचार रॅलीत समोरासमोर येऊन बुधवारी दुपारी 1.30 वाजता खासगेट परिसरात राडा झाला.यात माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना मारहाण करून वाहनाचा पाठलाग करण्यात आला. पोलिसांनी वेळीच लाठीचार्ज केल्याने परिस्थिती नियंत्रणात येत मोठा अनुचित प्रकार टळला. याप्रकरणी जिन्सी पोलिसांनी रात्री काँग्रेसचे उमेदवार हबीब कुरेशी, त्यांचे भाऊ कलीम कुरेशी यांच्यासह 50 जणांच्या जमावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 08 Jan 2026 08:21 AM (IST)

    जे बिनविरोध निवडून आलेत, त्या ठिकाणी बोटावरचं काळं कसं दाखवायचं?

    आपण प्रत्येक वेळी म्हणतो, मतदान माझा हक्क आहे. पण मग आता जे बिनविरोध निवडून आलेत, त्या ठिकाणी मतदारांनी बोटावरचं काळं कसं दाखवायचं? या महेश मांजरेकरांच्या प्रश्नावर ‘काय आहे की, व्होटिंग पॅडवर ‘नोटा’चा अधिकार आहे. पण त्या नोटांमुळे झालेला हा प्रॉब्लेम आहे’ असं राज ठाकरे म्हणाले.वाटलेल्या नोटांमुळे झालेला हा प्रॉब्लेम आहे असं उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं.

Published On - Jan 08,2026 8:21 AM

Follow us
समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
म्हातारा झाल्यावर गरज संपते, मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले
म्हातारा झाल्यावर गरज संपते, मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले.
काँग्रेसचा हात सोडून 12 नगरसेवकांनी हाती कमळ अन् हर्षवर्धन सपकाळ बरसले
काँग्रेसचा हात सोडून 12 नगरसेवकांनी हाती कमळ अन् हर्षवर्धन सपकाळ बरसले.
महापाप केल्यावर मुख्यमंत्री अन् महापौर पद! फडणवीस आणि....
महापाप केल्यावर मुख्यमंत्री अन् महापौर पद! फडणवीस आणि.....
मुंबईकरांना काय हवं? यासाठी मुंबईत जन्म... राज यांचा फडणवीसांवर निशाणा
मुंबईकरांना काय हवं? यासाठी मुंबईत जन्म... राज यांचा फडणवीसांवर निशाणा.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणं 'या' महिलांना भोवलं, कारण...
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणं 'या' महिलांना भोवलं, कारण....
मी आमदार नाही, पण आमदाराचा बाप... दानवेंच्या विधानाची राज्यात चर्चा
मी आमदार नाही, पण आमदाराचा बाप... दानवेंच्या विधानाची राज्यात चर्चा.
VIDEO : ओवैसी-जलील यांच्या पदयात्रेत तुफान गर्दी, अख्खं संभाजीनगर जाम
VIDEO : ओवैसी-जलील यांच्या पदयात्रेत तुफान गर्दी, अख्खं संभाजीनगर जाम.
स्वत:चा महापौर बसवायला मुल्ला-सुल्ला चालतात? अविनाश जाधवांचा थेट सवाल
स्वत:चा महापौर बसवायला मुल्ला-सुल्ला चालतात? अविनाश जाधवांचा थेट सवाल.
गुरू तेग बहादुर यांचा अपमान? दिल्ली विधानसभेत गदारोळ अन् वातावरण तापलं
गुरू तेग बहादुर यांचा अपमान? दिल्ली विधानसभेत गदारोळ अन् वातावरण तापलं.