Maharashtra News LIVE : शेतकऱ्यांना पीक कर्ज न देणाऱ्या बँकांवर गुन्हा दाखल करा – चंद्रशेखर बावनकुळे
Maharashtra News LIVE : आज मनोज जरांगे हे जालना, अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला संबोधित करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी बैठक होणार आहे त्याठिकाणी पोलिसांकडून बॉम्ब शोध पथकाकडून,तपासणी करण्यात आली आहे. यासह महत्वाच्या बातम्यांचे अपडेट जाणून घ्या या ब्लॉगमध्ये..

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आंदोलनाची पुन्हा घोषणा करण्यात आली आहे. आज ते पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहेत. शिंदे समिति रेकॉर्ड शोधत नसल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. यंदा मोसमी पाऊस वेळेपूर्वी दाखल होण्याचा अंदाज असून दक्षिण बंगालच्या उपसागरात मोसमी पावसासाठी अनुकूल स्थिती आहे. केरळ येथे 26 मे रोजी मोसमी पावसाचे आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नागपूरमध्ये पनीरच्या नावाखाली चीज अनालॉग देऊन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या हॉटेल्स वर अन्न व औषधी प्रशासन विभागाने कारवाई केली आहे. 25 हॉटेल्सना नोटीस बजावण्यात आली आहे. नागपूरमध्ये शिष्यवृत्ती आणि निर्वाह भत्त्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांचं रात्रीपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू असून विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी मध्यरात्रीपासूनच ठिय्या दिला आहे. यासह महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, कीरिडा आणि मनोरंजनाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी फॉलो करा हा ब्लॉग…
LIVE NEWS & UPDATES
-
नागपुरात कारला बसची धडक
नागपूर प्रेस क्लब समोर कारला बसची धडक
बसने धडक दिलेल्या कारसह पुढे उभ्या असलेल्या दुसऱ्या कारचेही मोठे नुकसान
-गाडी मालक दुबे यांनी या प्रकरणी सीताबर्डी पोलीस ठाण्यात दिली तक्रार
प्रेस क्लब येथून गाडी बाहेर काढताना बसने दिलेल्या धडकेत दोन वाहनाचे मोठे नुकसान
-
धुळे जिल्हा दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने हादारला
धुळे जिल्हा दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने हादारला
भोंदूगिरी करणाऱ्या बाबाने घेतला दोघांचा बळी
साक्री तालुक्यातील वर्धाने आणि उभरांडी शिवारात दोघांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ
भोंदुगिरीच्या नादी लागल्याने घडले दुहेरी हत्याकांड
या प्रकरणात संशयित भोंदूला पोलिसांनी घेतलं ताब्यात
-
-
गडचिरोली जिल्ह्यात 5 माओवाद्यांचं आत्मसमर्पण
गडचिरोली जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. 5 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. या माओवाद्यांवर एकूण 38 लाख रुपयांचं बक्षीस होतं. हे सर्वजण गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात व छत्तीसग गडच्या सिमावर्ती भागात कार्यरत होते.
-
नीट पेपर फुटीप्रकरणातील मुख्य सूत्रधार पी.व्ही कुलकर्णीचं बीड कनेक्शन समोर
नीट पेपर फुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार पीव्ही कुलकर्णी याचे बीड कनेक्शन समोर आले असून बीड शहरातील शाहूनगर भागात त्याची संपत्ती असल्याचं समोर आलं आहे. ज्या ठिकाणी त्याची जागा आहे त्या ठिकाणी पुण्यातील एका खासगी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेले असून मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे, अशी देखील माहिती समोर आली आहे.
-
मोदी यांनी सगळे परदेश दौरे रद्द करून या विद्यार्थ्यांना धीर दिला पाहिजे – इम्तियाज जलील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळे परदेश दौरे रद्द करून या विद्यार्थ्यांना धीर दिला पाहिजे होता. एका मुस्लिम नेत्यांची गळा भेट घेण्यासाठी, पंतप्रधान गेले आहेत. गळा भेट घ्यायची तर विद्यार्थ्यांची घ्यावी. पंतप्रधानांनी आवाहन केल आहे की पेट्रोल – डिझेल वाचवा, सोने खरेदी करू नका हे सगळं बोलून विमानात बसून दौऱ्यावर गेले, त्यांनी सुद्धा दौरा रद्द करायला पाहिजे होता असे एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.
-
-
नीट पेपर फुटी प्रकरणी संभाजीनगरात MIM चे आंदोलन
छत्रपती संभाजीनगरच्या क्रांतीचौकात MIM च्या वतीने नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील हे देखील उपस्थिती असून केंद्र सरकारच्या विरोधात एमआयएमचे पदाधिकारी जोरदार घोषणाबाजी करत आहेत.
-
शेतकऱ्यांना पीक कर्ज न देणाऱ्या बँकांवर गुन्हा दाखल करा – चंद्रशेखर बावनकुळे
ज्या बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाही त्या बँकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. अमरावतीच्या जिल्हास्तरीय खरीप हंगाम बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापले.
-
परभणी – आयशर टेम्पोला लागली आग
परभणीत आयशर टेम्पोला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत आगीत आयशर टेम्पोसह तीन जनावरे जळून खाक झाली. शहरातील खंडोबा बाजार परिसरात ही घटना घडली. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
-
कल्याण : RPF जवानला तिघांनी केली बेदम मारहाण
कल्याण रेल्वे स्थानकात एका आरपीएफ जवानाला जबर मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे .दादर गोरखपूर एक्सप्रेस मध्ये एका प्रवाशाला काही लोक मारहाण करत असल्याची माहिती आरपीएफ जवान नरेंद्र यादव यांना मिळाली. नरेंद्र यादव यांनी त्या ठिकाणी जाऊन मेल एक्सप्रेस मधील बोगी मधून बिनाकारण प्रवाशाला मारहाण करणाऱ्या तिघांना खाली येण्यास सांगितले. तिघे प्रवासी खाली आले आणि नरेंद्र यादव यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. कल्याण रेल्वे स्थानकातील फ्लॅट क्रमांक चार वरील ही घटना आहे. या प्रकरणी कल्याण जीआरपी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
-
नीट पेपर फुटी प्रकरणी NTA बरखास्त करावी – सदाभाऊ खोत
नीट पेपर फुटीमध्ये मोठी साखळी असून सरकारने राष्ट्रीय परीक्षा संस्था(NTA) बरखास्त करावी अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे देशभरातील लाखो होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या प्रकरणात केवळ छोट्या आरोपींना नव्हे, तर मूळ सूत्रधारांना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
-
करमाळा तालुक्यातील मांगी तलावात 36 टक्के पाणीसाठा
करमाळा तालुक्यातील मांगी तलावाची एकूण साठवण क्षमता 1 टी एम सी इतकी असून गेल्या वर्षी मे महिन्याच्या सुमारास या तलावात 40 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र यंदा त्यात 4 टक्क्यांची घट झाली असून तो 36 टक्क्यांवर खाली आली आहे. या तलावाच्या लाभक्षेत्रात 22 गावातील 3117 हेक्टर क्षेत्र येत असून डाव्या कालव्यातून पर सेकंद 900 लिटर ने विसर्ग सुरु आहे.
-
सरकारने किमान 20 रुपयात कांदा खरेदी करावा- शेतकरी
सरकारने 12 रुपये 35 पैशाने कांदा खरेदीचे आश्वासन दिले मात्र आम्हाला ते परवडत नाही. सरकारने किमान 20 रुपयांनी कांदा खरेदी करावा तरच आम्हाला त्याचा उपयोग होईल. कांद्याला एकरी 80 हजार रुपये उत्पादन खर्च होतो. मात्र, आम्हाला त्यातून केवळ 25 ते 30 हजार रुपये मिळत आहेत असे कांदा उत्पादक शेतकऱ्याचे म्हणणे आहे.
-
पुणे महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी
पुणे महामार्गावर रांजणगाव गणपती परिसरात भीषण वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
-
जमिनीच्या वादातून लोखंडी रॉडने मारहाण
शिरूर कासार तालुक्यातील पाडळी शिवारात गायरान जमिनीच्या वादातून लोखंडी रॉडने अमानुष मारहाण करत युवकाचा खून. अमानुष मारहाणीनंतर शंकर अंकुश बर्डे नामक युवकाचा काही वेळातच मृत्यू.
-
माझा 42 वर्षांचा राजकीय प्रवास बोलायचं त्यावेळी बोलेन- तटकरे
माझा 42 वर्षांचा राजकीय प्रवास.. मला जेव्हा बोलायचं आहे त्यावेळी बोलेन… पार्थ पवारांवरून माध्यमांच्या प्रश्नावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया…
-
तटकरेंच्या भेटीदरम्यान शरद पवारांचं मौन
NCPच्या अंतर्गत घडामोडींवर तटकरे-पटेलांची पवारांशी चर्चा…..पटेल-तटकरेंचं पवारांनी फक्त ऐकून घेतल्याची सूत्रांची माहिती….. 12 मेला ‘सिल्व्हर ओक’वर पवारांची भेट घेतल्याची माहिती….शरद पवार कुटुंबप्रमुख म्हणून भूमिका बजावू शकतात, NCPत सूर…. सूत्रांची माहिती…
-
NCPमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवारांची तक्रार- सूत्र
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवारांची तक्रार… सूत्रांची टीव्ही नाईन मराठीला माहिती… अजितदादांच्या राष्ट्रवादीमधला अंतर्गत संघर्ष आता पवारांच्या कोर्टात?… पवारांनी कुटुंबप्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्यावी… बड्या नेत्याची मागणी… सूत्रांनी दिली माहिती…
-
मराठा-कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ सुरू- जरांगे
मराठा-कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ सुरू….. जरांगेंचा आरोप… मराठ्यांची फसवणूक करू नका… सर्वपक्षीय मराठ्यांनी साथ द्यावी…. जरांगेंचं आवाहन… तर सर्व अभ्यासकांना 28 मे ला आंतरवालीत येण्याचं आवाहन….
-
सुनेत्रा पवार यांना अस्वस्थ करण्यासाठी हा उद्योग
राष्ट्रवादीच्या चांगल्या कामांमध्ये खंड आला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठेतरी डिस्टर्ब झाला पाहिजे यासाठी या सर्व गोष्टी कोणीतरी पेरण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्यामध्ये सर्व अल्बेल बराबर आहे आमच्यामध्ये संवाद कुठेही तुटलेला नाही. समजा काही समज गैरसमज असतील तर त्या पुढच्या आठवड्या पर्यंत माध्यमापर्यंत पोहोचवले जातीलआमच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना अस्वस्थ करण्याच्या दृष्टिकोनातून या बातम्या पेरल्या जात आहेत, असा आरोप आमदार अनिल पाटील यांनी केला.
-
सोलापूरमधून थेट एटीएम मशीनच चोरीला
सोलापूर शहरातील घरकुल परिसरात चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच चोरीला गेली. चार चाकी गाडीने एटीएम मशीनला दोरखंडाने बांधून मशीन बाहेर काढत चोरल्याची माहिती समोर आली आहे. सोलापुरातील घरकुल परिसरातील सग्गम नगर परिसरात चोरट्यांची ही धाडसी चोरी समोर आली आहे. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एटीएम सेंटर मधील 3 सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. एकीकडे महागाईच्या झळा पोहोचत असतानाच दुसरीकडे चोरीचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
-
बँकेच्या कर्जापायी रचला स्वतःच्या मृत्यूचा कट
गोंदियामध्ये बँकेच्या कर्जापायी एका व्यक्तीने स्वतःच्या मृत्यूचा कट रचला. दारू पाजून शेजारच्या मित्राचाच गळा आवळून खून केला. स्वत:चे कपडे आणि आधार कार्ड इतर साहित्य खिशात घालून प्रेत रेल्वे रुळावर ठेवले. खून करणारा आठ महिन्यापासून नागपूरात वास्तव्य करीत होता. मृताच्या भावाला संशय आल्याने घटनेचे बिंग फुटले. घरी एक फोन कॉल केल्यानंतर डोंगरगाव हत्याकांडात नवा खुलासा झाला आहे.
-
अहिल्यानगर – संभाजीनगर महामार्गांवर वाहतुकीची कोंडी
अहिल्यानगर – संभाजीनगर महामार्गांवर वाहतुकीची कोंडी झाली आहे. तब्ब्ल 5 किलोमीटर पर्यत वाहनांच्या रांगाचं रांगा लागल्या आहेत. आज शनी जयंती असल्याने शनी शनिगणापूरकडे जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी झाली. शिंगणापूर फाटा पासून सुरु झालेली वाहतूक कोंडी तब्ब्ल 5 किलोमीटरपर्यंत आहे. आज शनी आमवश्या, शनी जयंती आणि शनिवार असा दुर्मिळ योग तेरा वर्षानंतर आल्याने दर्शनासाठी भाविकांकडून एकच गर्दी होत आहे. तर वाहतूक सुरळीत ठेवण्यात प्रशासकीय यंत्रणा फेल झाल्याचे चित्र आहे.
-
चाकणच्या जनावरांच्या बाजारात बोकडांची एक लाख रुपयाला विक्री;बाजारसमितीत ७ ते ८ कोटींची उलाढाल
“बकरी ईद अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि त्यामुळे पुणे जिल्ह्यातील चाकण येथील जनावरांच्या बाजारात सध्या मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विविध भागांतून व्यापारी आणि नागरिक येथे बोकड खरेदीसाठी दाखल झाले आहेत. यंदा बाजारात स्थानिक जातींसह राजस्थान, सोलापूर आणि अहमदनगर भागातील बोकड विक्रीसाठी आणण्यात आले आहेत. बोकडांच्या वजनानुसार आणि जातीप्रमाणे त्यांच्या किंमती ठरत असून काही बोकडांना लाखाच्या घरातही मागणी असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.तर चाकणच्या जनावरांच्या बाजार मध्ये सात ते आठ कोटी रुपयांची उलाढाल आतापर्यंत झाली आहे
-
30 मे पासून आमरण उपोषण
30 मे पासून आमरण उपोषण करण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 1994 चा जीआर च्या धर्तीवर सातारा आणि औंध संस्थान जीआर काढा. मराठा आंदोलकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे परत घ्या. सारथी मधील सर्व योजना सुरू करा अशा मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी केल्या.
-
हे तर अत्यंत दुर्दैवी वक्तव्य -विनायक राऊत
सामाजिक कार्यकर्त्यांना चीफ जस्टिस झुरळ म्हणत असतील तर देश कुठे जात आहे, हे दुर्दैव आहे असे वक्तव्य शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केले आहे. राजकीय दबावापोटी जर अशी विधाने होत असतील तर प्रामाणिक काम करणार्या कार्यकर्त्याला अभय कोण देणार ? असा सवाल त्यांनी विचारला. सरकार बरोबर नाही, १० वाचे , १२ वाचे पेपर फुटतात. नीट चे पेपर फुटल्याने लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अधांतरीच, त्या नैराष्यातून त्यांनी आत्महत्या केल्या हे फार चुकीचं आहे, असे ते म्हणाले.
-
चक्क एटीएम मशीनच चोरली
सोलापूर शहरातील घरकुल परिसरात चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच चोरली. चार चाकी गाडीने एटीएम मशीनला दोरखंडाने बांधून मशीन बाहेर काढत चोरल्याची माहिती. सोलापुरातील घरकुल परिसरातील संगम नगर परिसरात अशा प्रकारची चोरी. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एटीएम सेंटर मधील 3 सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत.
-
डाव्या आघाडीकडून केंद्रीय शिक्षणमंत्र्याविरुद्ध निदर्शने
सोलापुरात डाव्या आघाडीकडून केंद्रीय शिक्षणमंत्र्याविरुद्ध निदर्शने. यावेळी शिक्षण मंत्र्यांची प्रतिमा जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापट. नीट पेपर फुटीच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी. DYFI या विद्यार्थी संघटनेकडून केंद्र सरकार विरोधात निदर्शने.
-
पेपर फुटतात कसे ? विनायक राऊत यांचा सवाल
“सामाजिक कार्यकर्त्यांना चीफ जस्टिस झुरळ म्हणत असतील तर देश कुठे जात आहे, हे दुर्देव आहे. राजकीय दबावापोटी जर अशी विधाने होत असतील तर प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला अभय कोण देणार ? सरकार बरोबर नाही, १० वी चे , १२ वी चे पेपर फुटतात. नीटचे पेपर फुटल्याने लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अधांतरीच. त्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्या हे फार चुकीचं आहे. पेपर फुटतात कसे ?” अशी टीका माजी खासदार विनायक राऊत यांनी केली.
-
TCS प्रकरणात भाजपच्या लोकांनी ही माहिती पुरविली – सुजात आंबेडकर
“नाशिकमध्ये तीन मोठी प्रकरणं समोर आलेली आहेत. यामुळे नाशिकला गालबोट लागले आहे. TCS प्रकरणात भाजपच्या लोकांनी ही माहिती पुरविली. त्यावरून पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. भाजपच्या सांगण्यावरून पोलिस इन्व्हिस्टेशन करतात. अद्याप या प्रकरणात ठोस पुरावे समोर आलेले नाहीत. बाहेरचे फंडिंग होते का? हे देखील समोर आलेले नाही. पोलिसांनी कुठलेही पुरावे न बघता भाजपच्या माहितीच्या आधारे काम केले यावर आमचा आक्षेप आहे. एक narrative सेट करण्यात आला, ज्यातून पुढे जाऊन हिंदू-मुस्लिम रंग याला देण्यात आला” असं सुजात आंबेडकर म्हणाले.
-
नंदुरबार जिल्ह्यात जातीय जनगणनेला आजपासून प्रत्यक्ष सुरुवात
नंदुरबार जिल्ह्यात जातीय जनगणनेला आजपासून प्रत्यक्ष सुरुवात. प्रगणक आणि पर्यवेक्षकांना आवश्यक साहित्याचे वितरण. माहिती पुस्तिका, ॲप, नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र देण्यात आले. प्रत्येक प्रगणकाकडून सुमारे 800 नागरिकांची माहिती संकलित होणार.घर, वाहन आणि जातीनिहाय माहिती ऑनलाईन नोंदवली जाणार. 16 मे ते 14 जून दरम्यान जनगणनेचा पहिला टप्पा पार पडणार. जिल्ह्यातील साडेतीन हजारांहून अधिक शिक्षक निभावणार महत्त्वाची भूमिका.
-
गांजाची खरेदी विक्री करणाऱ्या सहा आरोपींना अटक
गांजाची खरेदी विक्री करणाऱ्या सहा आरोपींना अटक करण्यात नागपूर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला यश आले. या कारवाईत ३४ किलो गांजा जप्त करण्यात आला… ३४ किलो गांजा, ट्रक आणि कारसह २९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रात्रीच्या सुमारास गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत भंडारा-नागपूर हायवे रोडलगत एक ट्रक आणि मारुती कार संशयास्पद अवस्थेत उभी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. ट्रक आणि कार यांच्यामध्ये काहीतरी संशयास्पद देवाणघेवाण सुरू असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी तत्काळ दोन्ही वाहनांना घेराव घालत ट्रकचालक आणि कारमधील इसमांना ताब्यात घेतले. पंचासमक्ष वाहनांची सखोल झडती घेतली असता कंटेनर ट्रक आणि कारमधून एकूण ३४ किलो गांजा आढळून आला. संबंधित कंटेनर ओडिशातून आला होता.सर्व आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करत सहा आरोपींना अटक केली आहे.
-
जळगावच्या सराफ बाजारात सलग तिसऱ्या दिवशी सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण
सोन्याच्या दरात 1500 रुपयांची तर चांदीच्या दरात 3 हजार रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 61 हजार 195 रुपये, चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 70 हजार 890 रुपयांवर पोहोचले आहेत. चार दिवसांत सोन्याच्या दरात 4 हजार तर चांदीच्या दरात तब्बल 26 हजार रुपयांची घसरण झाली आहे.
-
आज पासून रामकुंडच्या उत्तर तीरावरून भाविकांना प्रवेश बंद
सिंहस्थाच्या कामामुळे रामकुंड परिसराचा उत्तर भाग राहणार बंद आहे. श्रद्धा विधी आणि इतर धार्मिक विधी यशवंत महाराज पटांगण आणि भाजी पटांगणावर होणार आहेत. पुरोहित संघ आणि प्रशासनाच्या झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी उत्तर ऐवजी दक्षिण तीरावर सगळे विधी होणार. अस्थिविसर्जन मात्र रामकुंडातच होणार..
-
मराठा – कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ सुरु – जरांगे पाटील
मी समाजासोबत प्रामाणिक राहिलो… मराठा – कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ सुरु आहे. मराठ्यांची फसवणूक करु नका. सर्वपक्षीय मराठ्यांनी साथ द्यावी. मी प्रामाणिक म्हणून अंतरवालीत आजही गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबईत मराठ्यांनी एक वातावरण तयार केलं होतं. आता परत आंदोलनाची तयारी.. असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे.
-
कंपन्यांकडून इंधनपुरवठा उशिराने होत असल्याने ग्रामीण भागासह अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलची भीषण टंचाई….
मुक्ताईनगरच्या कुरऱ्हा परिसरातील पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पंपावरील पेट्रोल संपल्यामुळे पेट्रोल पंपावर शोकशुकाट आहे. दुसरीकडे रावेरमध्ये पेट्रोल डिझेल घेण्यासाठी नागरिकांची प्रचंड प्रमाणात गर्दी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे तातडीने इंधन पुरवठा सुरळीत व्हावा अशी मागणी नागरिकातून होत आहे.
-
नाफेड-एनसीसीएफकडून 12.35 रुपये दराने कांदा खरेदीची घोषणा
मुख्यमंत्र्यांच्या कांदा खरेदी घोषणेनंतर लासलगाव बाजार समिती कांदा दरात घसरण झाली आहे. कांद्याच्या जास्तीतजास्त दरात 50 रुपयांची तर सरासरी दरात 70 रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांचा संताप पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी 24.10 रुपये, यंदा निम्म्या दराने खरेदीचा आरोप, बाजार समिती आवारातून गेल्या वर्षांच्या दराने कांदा खरेदीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
-
शरद पवारांकडून ऊसाची आणि केळीची पाहणी
शरद पवारांनी बारामतीच्या दौऱ्यावर असताना स्वतःच्या शेतात फेरफटका मारला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या माध्यमातून केलेल्या उसाची आणि केळी पिकाची पाहणी केली..
-
आजपासून रामकुंडच्या उत्तर तीरावरून भाविकांना प्रवेश बंद
सिंहस्थाच्या कामामुळे रामकुंड परिसराचा उत्तर भाग राहणार बंद. श्रद्धा विधी आणि इतर धार्मिक विधी होणार यशवंत महाराज पटांगण आणि भाजी पटांगणावर. 16 जुलै पर्यंत धार्मिक विधींचे स्थान बोलणार. पुरोहित संघ आणि प्रशासनाच्या झालेल्या बैठकीत निर्णय. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी उत्तर ऐवजी दक्षिण तीरावर होणार सगळे विधी. अस्थिविसर्जन मात्र रामकुंडातच होणार..
-
पोलिस ठाण्यासमोरच दोन गट भिडले, तुंबळ हाणामारी…
पोलिस ठाण्यासमोरच दोन गट भिडले. पोलिस ठाण्याच्या आवारातच दोन गटांत तुंबळ हाणामारी. हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी पोलिस ठाण्याच्या आवारातील प्रकार. अल्पवयीन मुलीच्या विवाहाच्या संशयावरून राडा. एका गटाने मुलीच्या विवाहाबाबत आक्षेप घेतल्याने राडा झाल्याची प्राथमिक माहिती…
-
शिष्यवृत्ती आणि निर्वाह भत्त्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे रात्री पासून ठिय्या आंदोलन..
आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून दिला ठिय्या.. शिष्यवृत्ती भत्ता, शैक्षणिक खर्च तसेच निर्वाह भत्ता वेळेत मिळत नसल्याने संतप्त झालेल्या वसतिगृह झोपण्या ऐवजी आदिवासी विभागाचा कार्यालयाचा परिसरात मध्यरात्रीपासून आंदोलनाला सुरुवात केली.
-
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आंदोलनाची दिशा ठरणार?
मराठा आंदोलक मनोज जरांगे आज अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. सकाळी १० वाजता होणाऱ्या या बैठकीत ते समाजाशी संवाद साधणार असून पुढील आंदोलनाची भूमिका निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. हैदराबाद गॅझेटनुसार ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आहेत, अशा मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सप्टेंबर २०२५ मध्ये आझाद मैदान येथे मनोज जरांगे यांनी आंदोलन केले होते.
-
तटकरेंच्या भेटीवर शरद पवार यांचे माैन..
शरद पवार आज बारामतीत आहेत. यावेळी त्यांनी तटकरे यांच्या भेटीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी शरद पवार यांनी तटकरेंच्या भेटीबद्दल माैन बाळगले.
-
पंढरपूर – भाविकांकडून पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्यावर मंदिर समितीची कारवाई
पंढरपूर – भाविकांकडून पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्यावर मंदिर समितीने कारवाई केली. मोफत ई-रिक्षा सेवेसाठी भाविकांकडून पैसे घेतले संत नामदेव पायरीजवळ रात्री उशिरा प्रकार उघड झाला, मंदिर समितीच्या सीसीटीव्हीत गैरप्रकार कैद झाला होता.
पंढरपूरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात वृद्ध, दिव्यांग आणि गर्भवती महिलांसाठी सुरू असलेल्या मोफत ई-रिक्षा सेवेत गैरप्रकार समोर आला आहे. कंत्राटी कर्मचारी कुणाल राजेंद्र घोडके याने भाविकांकडून पैसे घेतल्याचे सीसीटीव्हीत आढळले. कुणाल घोडके या संबंधित कर्मचाऱ्याची विठ्ठल मंदिरातील सेवा कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याची प्रक्रिया सुरू असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
-
नाशिक – कारागृहात असूनही खरातची कमाई सुरूच
नाशिक – कारागृहात असूनही खरातची कमाई सुरूच आहे. रिंग रोड साठी भूसंपादनातून सुमारे तीन कोटी रुपये मिळणार . गवळणे परिसरात अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरात यांना 82 लाख 83 हजार रुपये मिळणार आहेत. तर पाथर्डी परिसरात तृप्तबाला आणि सृष्टी खरातला एक कोटी 82 लाख मिळणार आहेत. सोबत निलंबित उपजिल्हाधिकारी भांडे पाटील यांच्या पत्नीलाही लाखो रुपये मिळणार. खरात खरेदीप्रक्रियेत उपस्थित राहण्याची शक्यता नसल्याने दर कमी होऊ शकतात. भूसंपादनाचा फायदा घेण्यासाठी दोन्ही मुलींना उपस्थित राहणे आवश्यक आहे.
-
अशिक्षित लोकांना सत्तेत बसवू नका, नीट पेपरफुटी प्रकरणावरून संगीतकार विशाल ददलानीने व्यक्त केला संताप
अशिक्षित लोकांना सत्तेत बसवू नका, विचार करून मतदान करा असं म्हणत नीट पेपरफुटी प्रकरणावरून संगीतकार विशाल ददलानीने संताप व्यक्त केला. तसेच त्याने परीत्रा व्यवस्थेत मोठ्या सुधारणांचीही मागणी केली आहे.
-
हिंगोली-कार्यवाहीसाठी गेलेल्या महसूल पथकातील अधिकाऱ्याला वाळू माफियांकडून जीवे मारण्याची धमकी
हिंगोलीत कार्यवाहीसाठी गेलेल्या महसूल पथकातील अधिकाऱ्याला वाळू माफियांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गोरेगांव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेनगाव तालुक्यातील गोरेगांव चौफुलीवर हा प्रकार घडला.
-
सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत NCP नेत्यांची पुढील आठवड्यात महत्वाची बैठक
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत NCP नेत्यांची पुढील आठवड्यात महत्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील कथित अंतर्गत कलहावर या बैठकीत चर्चा होणार असून सुनेत्रा पवार या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संवाद साधणार असल्याचे समजते.
-
नीट पेपर फुटी प्रकरण – CBI कडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची चौकशी
नाशिक – CBI कडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची देखील चौकशी करण्यात येत आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी नाशिकच्या शुभम खैरनार याला CBI ने ताब्यात घेतलं आहे. पेपर फुटीच्या संपूर्ण प्रक्रियेत टेलिग्राम ॲपचा सर्वाधिक वापर झाल्याचं उघड झालं आहे. टेलिग्रामवर मोठ्या फाइल्स सहज पाठवता येत असल्याने ,ते ॲप वापरण्यात आलं. अहिल्यानगरच्या धनंजय लोखंडे यांच्या सोबत देखील शुभमचे कनेक्शन उघड झालं असून शुभमशी संबंधित काही लोकांचे जाब जबाब नोंदवल्याची माहिती समोर आली आहे.
Published On - May 16,2026 9:05 AM
