Maharashtra News LIVE : गडचिरोलीच चंद्र दर्शन, शनिवारी रमजान ईद
Maharashtra News LIVE Updates: भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण गाजत असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांचे पाद्यपूजन केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. भोंदू खरातची एसआयटी चौकशी सुरू करण्यात आली आहे. तर आता रुपाली पाटील ठोंबरे यांच्या पोस्टने खळबळ उडवून दिली आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
गडचिरोलीच चंद्र दर्शन, शनिवारी रमजान ईद
गडचिरोली उद्या शनिवारी 21 मार्च रोजी रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. रमजान महिनाच्या आज 30 वा उपवास शेवटचा ठरला. या महिन्यात 30 उपवास केल्यानंतर ईद उ फितर रमजान ईद साजरी केली जाते. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा या ठिकाणी चंद्र दिसला
-
बोरीवलीत तृणधान्य महोत्सव 2026 चे आयोजन
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत बोरिवलीतील कोरा केंद्र मैदानावर 2 दिवसीय उत्पादक ते ग्राहक थेट विक्री संकल्पनेअंतर्गत तृणधान्य महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात आलं आहे. मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले.
-
-
हिंगोलीत किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी
हिंगोलीत किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचं समोर आलं आहे. शहरातील सराफा बाजारमध्ये पंच आणि लोखंडी रॉडने (मुसळ) 2 गटात हाणामारी झाली. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. परस्परांच्या तक्रारी वरून 6 जणांन विरोधात हिंगोली शहर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
-
बदलापूर-अंबरनाथकरांसाठी गूड न्यूड, नक्की काय?
बदलापूर-अंबरनाथकरांसाठी गूड न्यूड समोर आली आहे. बदलापूर-अंबरनाथकरांचा प्रवास गतिमान होणार आहे. कासगाव-कामोठे नव्या रेल्वे मार्गाच्या फायनल लोकेशन सर्व्हेला मंजुरी देण्यात आली आहे.
-
मुंबई : युद्धामुळे क्रॉफर्ड मार्केटमध्ये आयात होणाऱ्या विदेशी वस्तूंवर परिणाम
युद्धामुळे मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये आयात होणाऱ्या सुकामेवा आणि इतर विदेशी वस्तूंवर मोठा परिणाम झाला आहे. आवक कमी झाल्याने इराणी पिस्ता, खजूर , पाईन नट्स यांसारख्या पदार्थांच्या किमतीत मोठी वाढ झाला आहे. पिस्ता, खजूर आणि इतर सुकामेव्याचे दर 200 ते 400 किलोंनी वाढले आहेत.
-
-
कोल्हापूर : पाणीपुरवठा बंद कारवाईनंतर महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर
कोल्हापूरात पाटबंधारे विभागाच्या पाणीपुरवठा बंद कारवाईनंतर महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आलं आहे. आज सकाळी थकीत पाणीपट्टीसाठी पाटबंधारे विभागाकडून महापालिकेची पंपिग स्टेशन सील करून कोल्हापूरचा पाणीपुरवठा बंद केला. यानंतर महापालिकेने देखील थकीत घरफाळा आणि पाणीपट्टी साठी पाटबंधारे कार्यालय सील केले.
-
लातूर : ज्वारी पिकाला अवकाळीचा मोठा फटका, शेतकरी हवालदिल
लातूर जिल्ह्यातल्या ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा फटका बसला आहे. शेकडो एकरावरील ज्वारी पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. सरकारने अद्यापही पंचनामा करण्याचे आदेश दिलेले नसल्याने शेतकरी हवालदिल झालेले पहायला मिळत आहेत.
-
-
अमरावती : कुलर व्यवसायाला युद्धाचा फटका
आखाती देशातील युद्धाचा फटका कुलर व्यवसायाला बसला आहे. सिलेंडर टंचाईमुळे कुलर तयार करणाऱ्या उद्योगांचे उत्पादन मंदावलं आहे. लोखंडी बॉडी, स्टँड व फ्रेम तयार करण्याचं काम अडकल्याची माहिती समोर आली आहे. नवीन कुलर बाजारपेठेत येण्यास उशीर होत असल्याचं व्यवसायिकांनी म्हटलं आहे.
-
गॅस बिलासंदर्भात ठाणेकराची सायबर फसवणूक
एका ठाणेकराची गॅस बिलाच्या आडून चक्क १ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. गॅस बुकींगच्या ॲाफिसमधून बोलतोय म्हणून सांगून बिल भरण्यासाठी या व्यक्तीला लिंक पाठवली होती. देवनारायण शर्मा असे पिडीत व्यक्तीचे नाव असून ठाण्यातील पाचपाखाडी या परिसरात राहतात.
-
भोंदूगिरी करणारे सर्वच जेरबंद होतील – बावनकुळे
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात महसूल मंत्री बावनकुळे यांनी या प्रकरणात सखोल तपास करुन कारवाई केली जाईल असे म्हटले आहे. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर सरकारच्या वतीने कारवाई करण्यात येईल आणि सर्व दोषींना जेरबंद करण्यात येईल असेही आश्वासन त्यांनी दिले आहे.
-
मालाड येथे खड्ड्यात पडून एका ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
मालाड पूर्वमधील कुरार येथे एसआरए प्रकल्पासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एका ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुलाचे नाव दिव्यांश मौर्य असून, त्याचा मृतदेह काल रात्री उशिरा एका खड्ड्यात सापडला आहे. यामुळे या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
-
माटुंगा लेबर कॅम्प येथे स्लॅब कोसलून महिला जखमी
माटुंगा येथील लेबर कॅम्प येथील आनंद बिल्डिंगच्या खोली क्रमांक ४२३ मध्ये स्लॅब कोसळल्याने एक महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे.
-
KDMC चा 3186 कोटींचा ‘स्मार्ट’ अर्थसंकल्प सादर
KDMC चा 3186 कोटींचा ‘स्मार्ट’ अर्थसंकल्प सादर
कोणतीही करवाढ नाही, मात्र नव्या प्रकल्पांसाठी पालिका घेणार मुन्सिपल बाँडवर 200 कोटींचे कर्ज
उत्पन्न वाढीसाठी सुटलेल्या मालमत्तांचा सर्व्हे करून मालमत्ता कर वसुल करणार
शिक्षण, आरोग्य, घनकचरा प्रकल्प व सामाजिक घटकांसाठी विशेष तरतूद असलेला अर्थसंकल्प सादर
24 तारखेला होणाऱ्या महासभेत चर्चेनंतर पालिकेच्या अर्थसंकल्पाला मंजुरी अपेक्षित
-
आमदार संदिप क्षीरसागर यांच्याकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी
बीडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने शेती पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. बीड तालुक्यातील लिंबागणेश आणि पोखरी परिसरात आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून टरबुज आणि इतर शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. यावेळी तहसीलदार आणि महसूल प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
-
बॅनरच्या वादातून मांडवगण फराट्यात गोळीबार
शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील भैरवनाथ क्रिकेट ग्राउंड परिसरात क्रिकेट स्पर्धेतील बॅनर लावण्याच्या वादातून दोन गटांमध्ये संघर्ष होऊन थेट गोळीबाराची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर फायरिंग केल्याचे समोर आले आहे.
-
भोंदूबाबा खरातचे 100पेक्षा जास्त व्हिडीओ असल्याची धक्कादायक बाब
भोंदूबाबा खरातचे 100 पेक्षा जास्त व्हिडीओ असल्याची धक्कादायक बाब समोर.. नाशकात सुरु असलेल्या SITच्या बैठकीतील सूत्रांची माहिती.. नाशकात IPS तेजस्विनी सातपुतेंच्या उपस्थितीत बैठक.. झाडाझडतीत 2 लॅपटॉप, 8 लाख कॅश, पिस्तुल, कागदपत्रे जप्त..
-
भोंदूबाबा खरात प्रकरणात सर्व काळे धंदे उघड होणार- चित्रा वाघ
भोंदूबाबा खरात प्रकरणात सर्व काळे धंदे उघड होणार.. भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं वक्तव्य.. तपासाची जबाबदारी IPS अधिकारी तेजस्वी सातपुतेंवर सोपवलीय.. तेजस्वी सातपुतेंच्या नेतृत्वाखाली सत्य बाहेर येईल- चित्रा वाघ यांचा दावा..
-
नाशिक फाईल्स प्रकरणात सरकार कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतंय?- अतुल लोंढे
नाशिक फाईल्स प्रकरणात सरकार कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतंय?…..वरिष्ठ प्रदेश काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंकडून ट्वीट करत सवाल….अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तपास व्हावा… अतुल लोंढेंची मागणी…
-
चाकणकर स्वत: तंत्रमंत्र विद्या करायच्या असं पीडितेने सांगितलं- सुषमा अंधारे
चाकणकर स्वत: तंत्रमंत्र विद्या करायच्या असं पीडितेने सांगितलं.. तंत्रमंत्र, अघोरी विद्या,गुवाहाटी हा असा प्रवास आहे.. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा आरोप..
-
भोंदूबाबाला सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण?.
भोंदूबाबाला सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण?… राक्षसी महत्त्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता? दादांच्या बंगल्यावर खरातशी जवळीक असणारे कोण कोण आले? खरात प्रकरणावरुन रोहीत पवारांचा सवाल
-
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपकडून सत्तेचा सर्रास गैरवापर केल्यानं शिवसेनेत तीव्र नाराजी
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपकडून सत्तेचा सर्रास गैरवापर केल्यानं शिवसेनेत तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे. साताऱ्यात सत्ताधारी मंत्री शंभूराज देसाईना धक्काबुक्की झाल्याची माहीती समोर आली आहे. पोलिस बळाचा वापर करून शिवसेनेच्या मंत्र्यालाच धक्काबुक्की झाली. सातारा पोलिसांनी 2 सदस्यांना ताब्यात घेतलं . मात्र सत्ता स्थापनेच्या हव्यासापोटी भाजप सर्व मर्यादा ओलांडत असल्याची भावना पक्षांतर्गत आहे.
-
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा. 32 जागांवर संख्याबळ दाखवत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद ताब्यात घेतलं. भाजपचा प्रिया शिंदे अध्यक्ष तर राजू भोसले उपाध्यक्ष.
-
भोंदूबाबांसाठी चाकणकरांकडून पत्रकाराला धमकी – अंबादास दानवे
भोंदूबाबाला संरक्षण देण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्ष धमकी देतात. महिलांवर अत्याचार करणारा माणूस समाजात वावरत असेल तर गंभीर आहे. याप्रकरणी एकालाही पाठिशी घालू नये. रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिला पाहिजे. जर त्या राजीनामा देणार नसतील तर मुख्यमंत्र्यांनी चाकणकरांना पदावरून काढून टाकलं पाहिजे अशी मागणी अंबादास दानवेंनी केली.
-
छत्रपती संभाजीनगर – ऑटो एलपीजी गॅस भरण्यासाठी पंपावर रिक्षांची मोठी रांग.
– ऑटो एलपीजी गॅस भरण्यासाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये पंपावर रिक्षांची मोठी रांग लागली आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये ऑटो एलपीजी गॅसचा तुटवडा असून शहरात असणारे ऑटो एलपीजी गॅसचे 12 पैकी 10 पंप बंद असल्याची माहिती समोर आली आहे. 12 दिवसांत, लिटर मागे तब्बल 31 रुपयांनी ऑटो एलपीजी गॅसचे दर वाढले . घरगुती गॅस नंतर आता गॅस पंपावर ऑटो रिक्षाची मोठी गर्दी दिसत आहे.
-
सांगली जिल्ह्याला गारपिटीचा मोठा तडाखा
सांगली जिल्ह्याला गारपिटीचा मोठा तडाखा बसला आहे. द्राक्ष बागांबरोबर आता भाजीपाल्यालाही फटका बसला आहे. शेतकऱ्यांवर गारपीटीची आसामानी कहर झाल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे. मिरज तालुक्यात सलग दोन दिवस झालेल्या गारपिटीने द्राक्षबागा बरोबर टोमॅटो पिकालाही फटका बसलेला आहे.
-
भोंदू बाबा अशोक खरातवर कारवाईची मागणी
अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे सदस्य SIT प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्या भेटीला. भोंदू बाबा अशोक खरातवर कारवाईची मागणी. यापूर्वी देखील अनिसने कॅप्टन खरातवर कारवाईची केली आहे मागणी.
-
गारपिटीने नुकसान झालेल्या फळबागांची कृषी विभागाच्या पथकाकडून पाहणी
बदनापूर तालुक्यात गारपिटीने नुकसान झालेल्या फळबागांची कृषी विभागाच्या पथकाकडून पाहणी. काल झालेल्या गारपिटीमुळे फळबागेच्या नुकसानीचा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून आढावा. देवपिंपळगाव येथे काल झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता मोठा फटका.
-
रुपाली चाकणकर यांना पदोपदी का वाचवलं जात आहे? – अंजली दमानिया
“रुपाली चाकणकर यांना पदोपदी का वाचवलं जात आहे?. वैष्णवी हगवणे प्रकरण असेल आणि अनेक प्रकरणं. पण यांना का वाचवलं जात आहे? आता हा कळस झाला आहे. आत राजीनामा घेतला नाही तर महाराष्ट्रातील सक्षम महिलांनी पुढे यावं. पुढच्या प्रेसमध्ये नाव सांगेन त्या डेप्युटी कलेक्टरच” असं अंजली दमानिया म्हणाल्या.
-
नाशिक पोलिसांकडून संगमनेर ऍसिड हल्ला प्रकरणातील संशयिताचे रेखाचित्र प्रसिद्ध
नाशिक पोलिसांकडून संगमनेर ऍसिड हल्ला प्रकरणातील संशयिताचे रेखाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. संशयित आरोपीची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्याचे पोलिस प्रशासनाने आश्वासन दिले आहे…
-
श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची मोठी गर्दी
श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रकट दिनाच्या निमित्ताने स्वामी भक्तांसाठी पहाटे दोन ते रात्री बारा वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे. श्री स्वामी समर्थ मंदिर समितीच्या वतीने आज दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं. युद्धामुळे भाविकांची गर्दी कमी झाली आहे. त्यामुळे युद्ध लवकरात लवकर थांबावे अशी स्वामींकडे प्रार्थना आहे.
-
अहिल्यानगर जिल्ह्यातील 40 गावांना अवकाळी वादळी पावसाचा तडाखा…
अहिल्यानगर जिल्ह्यातील 40 गावांना अवकाळी वादळी पावसाचा तडाखा बसला आहे. जिल्ह्यातील श्रीरामपूर , राहता , संगमनेर , अकोले , राहुरी , नेवासा ,भागातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपीट आणि वादळी पावसामुळे गहू , टोमॅटो , मका , कांदा पिकांचे मोठ नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 40 गावांना वादळी पावसाचा तडाखा बसल्याने अनेक पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालेत. रब्बी पिके काढणीच्या टप्प्यावर असताना आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेलं शेती पिकांचे उत्पादन संपुर्णत: नष्ट झाले आहे. सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
-
सोलापुरात घरगुती गॅससाठी गॅस एजन्सी बाहेर मोठ्या प्रमाणात रांगा
सोलापुरात घरगुती गॅससाठी गॅस एजन्सी बाहेर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या आहेत. गॅस एजन्सी बाहेर पोलीस बंदोबस्तात गॅसचे वितरण सुरू करण्यात आले आहे. सोलापुरातील कुमठा नाका परिसरात गॅस सिलेंडरसाठी लागली अर्धा किलोमीटर रांगा लागल्या आहेत. आधी नोटबंदी नंतर कोव्हीड लस आणि आता गॅससाठी जनता रांगेत थांबलीय. आम्हाला सबसिडी जमा झाल्याचा मॅसेज येतो मात्र आम्हाला टाकी मिळत नाही. त्यामुळे आमच्या हक्काची गॅस टाकी दुसऱ्याला दिली जातेय आणि काळा बाजार केला जातोय.
-
नक्षलवाद्यांनी हिंसा सोडावी आणि मुख्य प्रवाहात यावे; धर्मरावराव आत्राम यांच्याकडून आत्मसमर्पणाचे आवाहन
गडचिरोलीचे आमदार आणि माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी नक्षलवाद्यांना हिंसेचा मार्ग सोडून लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माओवाद्यांना दिलेली ३१ मार्चची डेडलाईन जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर आत्राम यांनी हे वक्तव्य केले. गडचिरोलीसह तेलंगणा, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशातील नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करावे, असे सांगताना त्यांनी स्पष्ट केले की बंदुकीच्या जोरावर क्रांती करण्याचे स्वप्न कधीही साकार होणार नाही. राज्य सरकारच्या विविध पुनर्वसन योजनांचा लाभ घेऊन नक्षलवाद्यांनी सन्मानाने जीवन जगावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
-
गारपीटीमुळे कलिंगड, गहू, कांदा पिकाचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला
अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यात गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे कलिंगड, गहू, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल सायंकाळपासून अहिल्यानगर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले आहे. तसेच गारपीट आणि पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान पाहायला मिळत आहे. पीक काढणीला आलेली असताना झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
-
शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला, अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागा भुईसपाट
सोलापूर जिल्ह्यात निसर्गाच्या कोपाने बळीराजाचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी, वांगी, रानमसले, कळमण, बीबी दारफळ, वडाळा, बाणेगाव आणि मार्डी या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेषतः पडसाळी येथील शेतकरी अंकुश सिरसट यांची तीन एकर द्राक्षबाग पूर्णपणे भुईसपाट झाली असून, बेदाणा रॅकवरील मालासह त्यांचे सुमारे 50 ते 60 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यंदा द्राक्षाला चांगला बाजारभाव मिळत असतानाच हे अस्मानी संकट ओढवल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळीचा तडाखा; वादळी वाऱ्यासह पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका गहू, बाजरी, ज्वारी आणि फळबागांना बसला असून काढणीला आलेला गहू पूर्णपणे भुईसपाट झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान सोसल्यानंतर, आता सततच्या पावसामुळे आगामी खरीप हंगामही धोक्यात आला असून मराठवाड्यातील बळीराजा पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे.
-
सोलापुरात साधे पेट्रोल स्थिर, मात्र स्पीड पेट्रोल महागले, नवे दर काय
सोलापूरकरांसाठी इंधन दराबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. शहरात सध्या साधे पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असून, केवळ ‘स्पीड’ पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे साध्या पेट्रोलचा दर 104 रुपये प्रति लिटरवर कायम असला, तरी स्पीड पेट्रोल आता 111 रुपयांवरून 113 रुपयांवर पोहोचले आहे. दरम्यान, पेट्रोल पंपावर इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणताही तुटवडा नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे, त्यामुळे नागरिकांनी विनाकारण गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
-
बीडच्या केज तालुक्यात गारपीटीनंतर डोंगर पट्ट्यात गारांचा खच, शेतकरी संकटात
बीडच्या केज तालुक्यातील डोंगर पट्ट्यामध्ये झालेल्या गारपीटीचे विदारक दृश्य समोर आले आहे. बीडच्या कोरडेवाडी, तुकुचीवाडी आणि घाटेवाडी भागात काल झालेल्या गारपीटी नंतर तब्बल दोन इंच गारांचा खच पडल्याचे दिसून आले. या गारपीटीमुळे गहू, ज्वारी आंबा, आणि भाजीपाल्याचं नुकसान झालं असून काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास गेला आहे. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय.
-
वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीमुळे केळी, हळद,गहू आणि ज्वारीचे मोठे नुकसान
नांदेड जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलाय,काल सायंकाळी झालेल्या वादळी वार्यासह गारपिटीमुळे अर्धापुर तालुक्यातील चाभरा, सोनाळा,खैरगाव,लिंबगाव भागातील शेतीतील केळी,हळद,गहू,ज्वारी इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झालंय, सोनाळा येथील काशिनाथ देबगुंडे यांच्या शेतातील 2 एक्कर ज्वारी भुईसपाट झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
-
वातावरणात झालेल्या बदलाचा फटका आंबा, मोहफूल व मक्याला
जिल्ह्यातील काही ठिकाणी तीन दिवसा पासूनच वादड वारा अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. यावर्षी आंब्याचे उत्पन्न जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात होईल असे दिसून येत होते परंतु अचानक आलेल्या वादळंमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे दिसून येत आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे आंबा मका व महफूल सारख्या पिकांना फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे
-
खरातच्या दरबारात अनेक प्रशासकीय अधिकारी
प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पत्नी आणि नातलगांसोबत अनेक ठिकाणी जमिनी खरेदी. पाथर्डी गवळाणे, सिन्नर आणि शिर्डी ओझर विमानतळाच्या भागात कोट्यावधींची गुंतवणूक. अनेकांच्या जमिनी हडपल्या तर काहींवर अवैध कब्जा. ओझर परिसरात काही बांधकाम व्यवसायिकांसोबत भागीदारी, गेल्या आठवड्यात केले होते इमारतीच भूमिपूजन
-
भोंदू कॅप्टन खराच्या घरात सापडलेल्या पिस्तूल संदर्भात तपास सुरू
खरात याच्या घरातून एक पिस्तूल आणि तीन जिवंत काढतोस पोलिसांनी केले होते काल जप्त. भोंदू खरातकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना होता का ? पिस्तूल कोणाकडून कसे केव्हा कधी मिळवले याचा पोलिसांकडून शोध सुरू. पिस्तूल चा वापर धमकवण्यासाठी करायचा का असा देखील प्रश्न उपस्थित
-
बुलढाणा जिल्ह्यात रात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून मध्यरात्री वादळी वारा आणि विजांच्या कडकडासह पाऊस पडला .. तर चिखली, लोणार तालुक्यात गारपीट झाली असून शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे .. यामधे कांदा, गहू, हरभरा, आंबा, सह इतर पिकांचे नुकसान झाले आहे ..
-
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यात काल सायंकाळी आणि मध्यरात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जोरदार वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बदनापूर तालुक्यातल्या कंडारी खुर्द गावात शेतकऱ्यांच्या गहू पिकाचे अतोनात नुकसान झालं. ऐन हंगामात रब्बी हंगामातील पीक जोमात असताना अवकाळी पावसाने दणका दिल्याने शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाले. सरकारने पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी केली.
-
धाराशिवमध्ये अवकाळी पावसाने केळीच्या बागा उध्वस्त
धाराशिव जिल्ह्याला सलग तीन दिवस अवकाळी पावसाने झोडपले आहे. वेगाचा वारा आणि गारांचा पाऊस झाल्याने धाराशिव मध्ये केळीच्या बागा उध्वस्त झाले आहेत. आधीच युद्धजन्य परिस्थितीमुळे केळी निर्यात बंद झाली आहे. त्यामध्येच अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने केळीची झाडे अक्षरशा मोडून पडली आहेत. धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळा येथे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत
-
भोंदू अशोक खरातच्या दरबारात अनेक प्रशासकीय अधिकारी
भोंदू अशोक खरातच्या दरबारात अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हजेरी लावल्याचे समोर आले आहे. या भोंदूने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पत्नी आणि नातलगांसोबत अनेक ठिकाणी जमिनी खरेदी केली आहे. पाथर्डी गवळाणे, सिन्नर आणि शिर्डी ओझर विमानतळाच्या भागात कोट्यावधींची गुंतवणूक करण्यात आली आहे. त्याने अनेकांच्या जमिनी हडपल्या तर काहींवर अवैध कब्जा केला आहे. ओझर परिसरात काही बांधकाम व्यवसायिकांसोबत भागीदारी, गेल्या आठवड्यात केले होते इमारतीच भूमिपूजन केले आहे.
-
गारपीट आणि वादळी वा-यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान
राहाता तालुक्यातील अनेक भागाच गारपीट आणि वादळी वा-यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गहू , हरबरा , मका यासह द्राक्ष आणि डाळींब उत्पादनाला फटका बसला आहे. काही ठिकाणी मका भुईसपाट तर गहू पिकांचे देखील नुकसान झाले आहे. फळधारणा सुरू झाली असताना गारा आणि वादळी वा-यामुळे फळे गळून पडली आहे. एकरी शेतक-याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. राहाता तालुक्यातील सादतपूर येथील प्रगतशिल शेतकरी दादासाहेब मगर यांच्या डाळींबाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
-
शिरूर तालुक्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे थैमान
शिरुर तालुक्यातील मलठण परिसरात गारपिटीसह झालेल्या मुसळधार पावसामुळे गव्हाचे मोठे नुकसान झालेय काढणीला आलेला गहू भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.पावसामुळे गव्हाचे उभे पीक पूर्णपणे भिजून गेले असून हार्वेस्टर मशीनने काढणी करणे आता अशक्य झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मजूर लावून भिजलेला गहू कापून वाळवण्याची वेळ आली आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कांदा आणि भाजीपाला पिकांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
-
मी पुन्हा येईन-सुधीर मुनगंटीवार यांचे संकेत
2027 मधील मतदारसंघ पुनर्रचनेनंतर मी पुन्हा चंद्रपुरात येईन, असे संकेत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. चंद्रपुरात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी मी पुन्हा येईल असे म्हटले होते, त्याच पद्धतीने मी पुन्हा चंद्रपुरात येईन ,विकासाचा झंझावात करेन असे भाष्य केले.
-
अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा, मोठे नुकसान
जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेली पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. चाळीसगाव, भडगाव आणि पाचोरा तालुक्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. मका, ज्वारी, बाजरी, गहू आणि कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काढणीच्या टप्प्यावर आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
नाशिकचा भोंदू अशोक खरात ऊर्फ कॅप्टन याचे कारनामे समोर आले आहे. तर अजून अनेक गोष्टी समोर यायच्या आहेत. त्याची एसआयटी चौकशी सुरु करण्यात आली आहे. तर यानिमित्ताने रुपाली पाटील ठोंबरे विरुद्ध रुपाली चाकणकर असा सामना पुन्हा रंगला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या भोंदू खराची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तर आज रुपाली ठोंबरे यांची फेसबूक पोस्ट चर्चेत आली आहे. रुपाली चाकणकर फरार झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर राज्यात अनेक जिल्ह्यांना वादळी पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे उन्हाळी पिकांना चांगलाच फटका बसला आहे. तर गावरान अंब्यांचा मोहर झडण्याची शक्यता आहे. मध्य-पूर्वेतील युद्धाच्या झळा अजूनही नागरिकांना सहन कराव्या लागत आहे. गॅस दरवाढीनंतर राज्यात खाद्यतेलाच्या किंमती सुद्धा वाढल्या आहेत. यासह राज्यातील ठळक बातम्यांची अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचा.
Published On - Mar 20,2026 8:05 AM
