Maharashtra Breaking News LIVE 19 March 2025 : मोठी बातमी! मुरबाड शहापूर बसचा भीषण अपघात, 15 ते 20 जण जखमी
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 19 मार्च 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

‘अमृत भारत’ योजनेंतर्गत परळ स्थानकाचा नवा चेहरा. सुसज्ज सुविधा प्रवाशांसाठी सुरू. बुकिंग ऑफिस, स्टेशन मास्टर व आरपीएफ कार्यालयांचे स्थलांतर, दुचाकी पार्किंग आणि खाद्यपदार्थ कँटीन. पंचेचाळीस हजारपेक्षा जास्त प्रवाशांना फायदा, तिकीट काऊंटर व एटीव्हीएम मशीनमुळे गर्दी कमी होण्याची शक्यता. मुलुंड डम्पिंग ग्राउंड कचऱ्याची मोठ्या प्रमाणात विल्हेवाट लावली जात आहे. मात्र मुलुंडच्या पूर्व द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात कचऱ्यामुळे याच रस्त्यावरती मातीचे थर साचल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांना प्रदूषणाचा व इतरत्र त्रास सहन करावा लागत आहे. पुणे जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे. प्रशासक राजवटीतील हा दुसरा अर्थसंकल्प आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील हे गेले अनेक वर्ष राज्याचे अर्थमंत्री यांचे उपसचिव राहिले आहेत.
LIVE NEWS & UPDATES
-
मुरबाड- शहापूर बसचा अपघात, 15 ते 20 प्रवासी जखमी
मोठी बातमी समोर येत आहे, मुरबाड – शहापूर रस्त्यावर कुडवली गावाजवळ महामंडळाची बस पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 15 ते 20 प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान बस पलटीहून डिझेल टाकी फुटल्यानं बसला आग देखील लागली. मुरबाड – शहापूर बस मुरबाडहून शहापूरच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला आहे.
-
दादा खिंडकर, ज्योतीराम भट्टेच्या पोलीस कोठडीत वाढ
दादा खिंडकर व ज्योतीराम भट्टे यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ
सात दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज बीड न्यायालयात केल होत हजर
21 मार्च पर्यंत सुनावली पोलीस कोठडी, अमाणूष मारहाण करतानाचा व्हिडीओ झाला होता व्हायरल
तिसरा आरोपी योगेश चव्हाणलाही 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी
-
-
इतर 3 राज्यांसह राज्य सरकार केंद्राला होकार कळवणार, दरेकराच्यां कोकण रेल्वेच्या भारतीय रेल्वेतील विलिनकरणाच्या प्रश्नावर फडणवीस यांचं उत्तर
कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेत विलिनिकरण करणार का? असा प्रश्न प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. यावर मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. इतर 3 राज्यांसह राज्य सरकार याबाबत केंद्राला होकार कळवणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं.
-
बीड जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू
बीड जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. जातीय तेढ निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार 19 मार्च ते 2 एप्रिलपर्यंत मोर्चे आणि आंदोलनावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
-
इस्रायलने 400 हत्या केल्या, मानवतेचा त्यांच्यासाठी काही अर्थ नाही – प्रियंका गांधी
इस्रायली सरकारने 400 हून अधिक निष्पाप नागरिकांची केलेली क्रूर हत्या हे दर्शवते की त्यांच्यासाठी मानवतेला काही अर्थ नाही. त्याच्या कृतींमधून त्याची अंतर्गत कमकुवतपणा आणि स्वतःच्या सत्याला तोंड देण्याची असमर्थता दिसून येते.
The cold blooded murder of over 400 innocent civilians including 130 children by the Israeli government, shows that humanity means nothing to them.
Their actions reflect an inherent weakness and inability to face their own truth.
Whether western powers choose to recognise…
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) March 19, 2025
-
-
गाझातील परिस्थितीबद्दल आम्हाला चिंता आहे – परराष्ट्र मंत्रालय
परराष्ट्र मंत्रालयाने गाझातील परिस्थितीवर एक निवेदन जारी केले आणि म्हटले की आम्हाला गाझातील परिस्थितीबद्दल अत्यंत चिंता आहे. सर्व ओलिसांची सुटका होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्ही गाझाच्या लोकांना मानवतावादी मदतीचा पुरवठा सुरू ठेवण्याचे आवाहन करतो.
-
चंदीगड: शेतकरी संघटना आणि केंद्रीय मंत्र्यांची बैठक संपली
चंदीगडमध्ये शेतकरी संघटना आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये सुरू असलेली बैठक संपली आहे. ही बैठक सुमारे 4 तास चालली. बैठकीनंतर कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, ही बैठक अतिशय सौहार्दपूर्ण पद्धतीने झाली. आता पुढील बैठक 4 मे रोजी होईल. या बैठकीला पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा हे देखील उपस्थित होते.
-
दहशतवादी घटनांमध्ये 71 टक्क्यांनी घट… केंद्राने राज्यसभेत दिले उत्तर
दहशतवादाच्या मुद्द्यावर राज्यसभेत बोलताना गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले, “मोदी सरकारचे दहशतवादाबद्दल शून्य सहनशीलतेचे धोरण आहे. सरकार दहशतवाद संपवण्यासाठी सर्व पावले उचलत आहे. परिणामी, दहशतवादी कारवाया 71 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. पूर्वी दहशतवाद्यांचा गौरव केला जात होता, त्यांना चांगले जेवणही दिले जात होते, परंतु आता पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या दहशतवादाविरुद्धच्या शून्य सहनशीलतेच्या धोरणामुळे, अंतर्गत भागात दहशतवादी घटना शून्य आहेत. दहशतवादी एकतर तुरुंगात जातील किंवा नरकात जातील.”
-
महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सरकारविरोधात आंदोलन
राज्य सरकारच्या विरोधात महाराष्ट्र युवक काँग्रेसने आंदोलन केले आहे. अशा प्रकारे आंदोलन केल्याबद्दल नाना पटोले यांनी युवक काँग्रेसचे अभिनंदन केले आहे. या झोपलेल्या सरकार विरोधात लढाई अजून तीव्र करावी लागेल असे काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे.
-
खोक्या भोसले याच्या विरोधात आझाद मैदानात उपोषण
सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या विरोधात बीडचे वन्यप्रेमी उद्या आझाद मैदानावर उपोषणास बसणार आहेत. बीडवरून वन्यजीव प्रेमी मुंबईकडे होणार रवाना आहेत. सतीश उर्फ खोक्या भोसले याने हरण मारल्याचा आरोप केला आहे.खोक्यावर मकोका लावण्याची मागणी होत आहे.
-
पुण्यात मनसेचा राडा, एबीव्हीपी लिहिलेल्या भिंतींवर काळे फासले
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून भिंतीवर ABVP लिहिण्यात आलेय त्याला मनसेकडून काळ फासले जात आहे.
-
नागपूर राडा प्रकरणात VHP च्याही आठ कार्यकर्त्यांना अटक
नागपूर संघर्षातील हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक पोलिसांनी अटक केली आहे. आंदोलन करणारे हे आठ कार्यकर्ते विश्व हिंदू परिषदेचे आहेत. नागपूर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात या आठ कार्यकर्त्यांना हजर करण्यात आले आहे
-
एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना एक रकमी मिळणार
मुंबई उच्च न्यायालयाने साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना एक रकमी देण्यात यावी, अशा निर्णय दिला आहे. यानंतर आज मंगळवारी बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी फटाके फोडून आणि एकमेकाला पेढे भरून आनंदोत्सव साजरा केलाय
-
मुंबईत युवक काँग्रेसचा आक्रोश मोर्चा
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे 15 ते १९ मार्च असा ‘पुणे ते मुंबई युवा आक्रोश पदयात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. बुधवारी ही पदयात्रा मुंबईत दाखल झाली. यासाठी मुंबई काँग्रेस भवन कार्यालय बाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.
-
जालना शहरासाठी 44 कोटी रुपयाचा टंचाई आराखडा मंजूर
जालना जिल्ह्यासाठी 44 कोटी रुपयाचा टंचाई आराखडा मंजूर झाला आहे. मात्र अद्याप एकही गावात टँकर सुरू नाही. जिल्ह्यातील 387 गावे आणि 33 वाड्यांना पाणी टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे.
-
नागपुरातील बाजारपेठांवर परिणाम
हिंसाचाराच्या घटनेनंतर नागपूर शहरातील बाजारपेठांत शुकशुकाट आहे. महाल, गांधीबाग, इतवारी, इंदोरा बाजारपेठा बंद आहेत. हिंसाचार ग्रस्त भागात बॅरिकेटिंगमुळे वर्दळ थांबली आहे. काही भागांत संचारबंदी लागू केल्याने बाजार पेठा बंद आहेत.
-
अखेर क्रिकेटर युजवेंद्र चहल अन् धनश्री वर्माचा घटस्फोट; मुंबई उच्च न्यायालयातचे आदेश, 20 मार्च रोजी निकाल
क्रिकेटर युजवेंद्र चहलने पत्नी धनश्री वर्मासोबत मुंबई उच्च न्यायालयात हजेरी लावली आहे. उद्या म्हणजे 20 मार्च 2025 रोजी चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाबाबत निकाल देण्याचे हायकोर्टाकडून कुटुंब न्यायालयाला निर्देश देण्यात आले आहेत. घटस्फोटासाठीचा किमान कालावधी हटवण्यास कुटुंब न्यायालयानं नकार दिला होता. मात्र आगामी आयपीएलपूर्वी तातडीनं घटस्फोट मिळवण्यासाठी दांपत्यानं कुटुंब न्यायालयाच्या निकालाला हायकोर्टात आव्हान दिलं होतं. चहल आणि धनश्री वर्मानं परस्पर सहमतीनं घटस्फोटासाठी याचिका दाखल केली आहे.
-
परंडा-सिना कोळेगाव धरणातून नियमबाह्य सोडलेलं पाणी बंद करा; शेतकऱ्यांचं आंदोलन पेटलं
करमाळा तालुक्यातील परंडा-सिना कोळेगाव धरणातून नियमबाह्य सोडलेलं पाणी बंद करा. या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. पाणी बंद करण्यासाठी धरणाच्या लात्रक्षेत्रात शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदलोन सुरु आहे. आंदोलनाची दखल न घेतल्यास शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता आहे. पाणी बंद करण्यासाठी शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरु आहेत. आंदोलनादरम्यान रामराव शामराव साबळे या शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं म्हटलं जातं आहे. शेतकऱ्यांचं पाणी आंदोलन चांगलंच पेटणार असल्याचं दिसून येत आहे.
-
केईएम रुग्णालयाच्या गेटला शिवसैनिकांनी काळं फासलं; इंग्रजी बोर्ड काढले नसल्यानं ठाकरे गट आक्रमक
केईएम रुग्णालयाच्या गेटला शिवसैनिकांनी काळ फासून आंदोलन केलं आहे. मराठीत मजकूर नसल्यानं शिवडी परळ येथील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गेटलाच काळ फासलं आहे. रुग्णालय प्रशासनाला वारंवार सांगून देखील दुर्लक्ष केल्याने ठाकरे गटाने भूमिका घेतल्याचं म्हटलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या केईएम हॉस्पिटलच्या शतकपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने सर्व प्रवेशद्वारांवर नवीन गेट तयार करण्यात आलेले होते त्याच्यावर केईएम प्रशासनाने इंग्रजीमध्ये लिहून मराठीचा अपमान केल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. परदेशातील पाहुणे येणार आहेत असे सांगून नाव इंग्रजीमध्येच ठेवण्याचा हट्ट केईएम प्रशासनाचा होता, परंतु कार्यक्रम संपूनही दोन महिने झाले तरी केईएम प्रशासनाने सदर इंग्रजी बोर्ड काढले नसल्यानं ठाकरे गटाने रुग्णालयाच्या प्रशासनाला निवेदन दिलं होतं की, तातडीने सदर इंग्रजी नाव काढा किंवा ते मराठीत करा.निवेदन देऊनही एक महिना होऊन गेला तरी अद्याप कार्यवाही केलेली नव्हती. म्हणून शिवसेनेच्या वतीने आंदोलन करून सदर गेटला काळे फासण्यात आलं.
-
केईएम रुग्णालयाच्या गेटला शिवसैनिकांनी काळ फासून केलं आंदोलन
केईएम रुग्णालयाच्या गेटला शिवसैनिकांनी काळ फासून आंदोलन केलंय. मराठीत मजकूर नसल्याने शिवडी परळ येथील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी लावण्यात आलेल्या गेटला काळ फासलं. रुग्णालय प्रशासनाला वारंवार सांगूनदेखील दुर्लक्ष केल्याने ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली.
-
सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या विरोधात उद्या आझाद मैदानावर उपोषण
सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या विरोधात उद्या आझाद मैदानावर उपोषण होणार आहे. सतीश उर्फ खोक्या भोसलेवर मकोका लावण्यात यावा, अशी मागणी केली जातेय. त्याने हरणाच्या शिकारी केल्या आहेत, त्याची चौकशी करण्यात यावी, असा आरोप केला जातोय. उपोषणकर्ते आज सायंकाळी बीडहून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न्यूझीलंडच्या पंतप्रधानांच्या भेटीला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुलाबा इथल्या हॉटेल ताजमहाल पॅलेसमध्ये दाखल झाले आहेत. ताजमहाल पॅलेसमध्ये न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लॅक्सन यांची ते भेट घेणार आहेत.
-
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेची 25 मार्चपासून ऑनलाईन नोंदणी
पंढरपूर- श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेची 25 मार्चपासून ऑनलाईन नोंदणी होणार आहे. 01 एप्रिल ते 31 जुलै, 2025 मधील पुजांची ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. भाविकांना आता घरबसल्या विविध पुजेची ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. विठ्ठल रुक्मिणी मातेची महापूजा, पाद्य पूजा, तुळशी अर्चन पूजा तसेच चंदनउटी पूजेचा देखील समावेश करण्यात आला आहे.
भाविकांना पूजेची नोंदणी https://www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे.
-
परंडा – सोनारी रोडवर शेतकऱ्यांकडून रास्ता रोको; जलसमाधीचा इशारा
परंडा तालुक्यातील परंडा – सोनारी रोडवर हरणवाडा पुलाजवळ शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. सकाळी 11 वाजल्यापासून हे आंदोलन सुरू आहे. सिना कोळगाव धरणातून नियमबाह्य सोडलेले पाणी तात्काळ बंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. रास्ता रोको आंदोलनाची दखल न घेतल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. सिना कोळगाव धरण्याच्या लाभक्षेत्रातील पाण्यात शेतकऱ्यांनी उड्या मारल्या आहेत. मागणी मान्य न झाल्यास जलसमाधी घेणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
-
Maharashtra News: वाळू माफियांचा महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यावर हल्ला
हिंगोली येथे वाळू माफियांचा महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ल… हल्ल्यात ग्राम महसूल अधिकारी व ग्राम महसूल साहय्यक जखमी… जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू… नागनाथ राऊत असं जखमी झालेल्या महसूल अधिकाऱ्यांचे नाव… वसमत शहर परिसरात हल्ला झाल्याची माहिती..
-
Maharashtra News: नागपूर राडा… ATS ची टीमही स्वतंत्र तपास करु शकते – डीसीपी
नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या 10 टीमकडून आरोपींचा शोध सुरु… सायबर टीमकडून 4 ते 5 हजार व्हिडीओची तपासणी सुरु… ATS ची टीमही स्वतंत्र तपास करु शकते…. अशी माहिती डीसीपींनी दिली आहे.
-
Maharashtra News: नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींच्या निवड प्रक्रियेला सुरुवात
बाजार समितीचे संचालक सभागृहात दाखल होण्यास सुरुवात… सभापती पदावर असलेले देविदास पिंगळेंवर आणण्यात आला होता अविश्वास ठराव… बाजार समितीवर वर्चस्व मिळवण्यासाठी चुंभळे विरुद्ध पिंगळे अशी असते चुरस… शिवाजी चुंभळे किंवा कल्पना चुंभळे यांच्यापैकी एकाची निवड होणार… नाशिक बाजार समितीवर आता भाजपची सत्ता… अजित पवारांच्या राष्ट्रवादीची होती यापूर्वी सत्ता… कल्पना चुंभळे यांच्या नावावर एकमत… थोड्याच वेळात होणार अधिकृत घोषणा… कल्पना चुंभळे यांच्या रूपाने पहिल्यांदाच महिला सभापती…
-
Maharashtra News: नाशिकमधली होळी राहाड उत्सवाला सुरुवात
नाशिकमधली होळी राहाड उत्सवाला सुरुवात झाली आहे… महिलांनी डोक्यावर कलश घेऊन रहाडीत प्रवेश केला… होळीत विधिवत पूजनानंतर रहाड उत्सवाला सुरुवा… महिला, लहान मुलींनी केली उत्सवाला सुरुवात
-
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैल जोडीच्या दरात वाढ, शेतकरी नाराज
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैलांच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. खरीप पूर्व हंगामाच्या पार्श्वभूमीवर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात बैल विक्रीसाठी दाखल झाले आहेत. व्यापाऱ्यांकडून बैलांच्या किमतीत वाढ करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी खंत व्यक्त केली आहे. मार्च महिना संपायला आला असून धुळे जिल्ह्यात खरीप भागांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा तयारीला वेग आला आहे.
धुळे बाजार समितीमध्ये नवीन बैल जोडीसाठी व्यापारी हे 70 ते 80 हजार रुपये बैल जोडी मागत आहेत. बाजारात काही दिवसांपूर्वी 50 ते 55 हजाराला बैल जोडी मिळत असताना काही व्यापाऱ्यांनी बैलजोडीचा दरात वाढ केली आहे. बैल जोडीच्या किंमतीत वाढ केल्याने बैल खरेदी करायची तरी कशी असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे. बैल जोडीचे दर कमी करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.
-
Maharashtra News: नागपूर पोलिसांनी हिंसाचाराच्या घटनेवर नियंत्रण मिळवलं असले तरी संचार बंदी कायम
नागपूर शहरातील 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचार बंदी कायम… आवश्यक असेल तरच नागरिकांनी बाहेर पडावे पोलिसांचे आव्हानं… घटना घडलेल्या चिटणीस चौक परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त… नागपूर पोलिसांकडून कायदा सुव्यवस्थेचा पुन्हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून खबरदारी घेत संचार बंदी कायम…
-
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून महाराष्ट्रातील सर्व खासदारांना निमंत्रण
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील सर्व खासदारांना निमंत्रण दिले आहे. सर्व खासदारांना राष्ट्रपतीकडून नाश्त्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. राज्यातील सर्व खासदार राष्ट्रपती भवनात दाखल झाले आहेत. राज्यसभेच्या आणि लोकसभेच्या खासदारांना राष्ट्रपतींकडून निमंत्रण देण्यात आले आहे. सर्वपक्षीय खासदार आणि मंत्र्यांनाही राष्ट्रपतीभवनाकडून निमंत्रण दिलं गेलं आहे.
-
नागपुरात संचारबंदी कायम, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचा सल्ला
नागपूर पोलिसांनी हिंसाचाराच्या घटनेवर नियंत्रण मिळवलं असले तरी संचार बंदी कायम राहणार आहे. नागपूर शहरातील 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचार बंदी कायम असणार आहे. आवश्यक असेल तरच नागरिकांनी बाहेर पडावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. घटना घडलेल्या चिटणीस चौक परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. नागपूर पोलिसांकडून कायदा सुव्यवस्थेचा पुन्हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून खबरदारी घेत संचार बंदी कायम
-
हिंजवडीत टेम्पो जळून खाक, टेम्पोत चौघांचा होरपळून मृत्यू.
हिंजवडीत टेम्पो जळून खाक, टेम्पोत चौघांचा होरपळून मृत्यू. चौघेही कंपनीचे कर्मचारी होते. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पोत होते. त्यावेळी हिंजवडी फेज वन मध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले.
मात्र मागचे दार न उघडल्यानं चौघांचा होरपळून मृत्यू झाला. काही जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना 8 च्या सुमारास घडली.
-
वांद्रा परिसरात 286 किलो गांजा जप्त, गुन्हे शाखेची मोठी कारवाई
मुंबईच्या वांद्रा परिसरातील गोडाऊनमध्ये तब्बल 286किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 9 चे इनचार्ज दया नायक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत आरोपी इम्रान अन्सारी (36) याला अटक करण्यात आली असून जप्त केलेल्या गांजाची किंमत अंदाजे 71 लाख 67 हजार रुपये असल्याचे समजते.
-
कोल्हापूर पोलीस प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी नागपूरला रवाना, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
कोल्हापूर पोलीस प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी नागपूरला रवाना झाले आहेत. कोल्हापूर सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे. कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
-
अधिवेशन संपताच भाजपचे आमदार, मंत्र्यांची प्रशिक्षण वारी होणार
अधिवेशन संपताच भाजपचे आमदार, मंत्र्यांची प्रशिक्षण वारी होणार आहे. उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे दोन दिवस प्रशिक्षण. सर्व आमदार आणि मंत्र्यांना 26 मार्चपासून दोन दिवस मुक्कामी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 27 आणि 28 मार्च रोजी आमदार, मंत्री, प्रशिक्षणाचे धडे गिरवणार
-
राज्यभरात रंगपंचमीचा सण साजरी होत असताना वाई तालुक्यातील बावधन गावात प्रसिद्ध बगाड यात्रा
सातारा : राज्यभरात रंगपंचमीचा सण साजरी होत असताना वाई तालुक्यातील बावधन गावात प्रसिद्ध बगाड यात्रा पार पडत आहे. बगाड यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक बावधन गावात दाखल झाले आहेत. बगाड यात्रेला सोनेश्वर मंदिरापासून काही वेळात होणार सुरुवात.
यावर्षीचा बगाड्या होण्याचा मान अजित अजित ननावरे यांना मिळाला आहे.
-
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदासाठी आज निवडणूक
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदासाठी आज निवडणूक. अजित पवार गटाचे माजी सभापती देविदास पिंगळे यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव 15-0 ने मंजूर झाल्यानंतर आज नवीन सभापतीची निवड. सकाळी 11 वाजता बाजार समितीच्या कार्यालयात पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया.
-
बोरिवली आणि कांदिवलीतील बेकायदेशीर व्यापाऱ्यांवर बीएमसीचा बुलडोझर
बोरिवलीत बीएमसीने बोरिवली स्टेशन परिसर आणि महावीर नगरमध्ये बुलडोझर चालवून बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कारवाई केली. यादरम्यान, बेकायदेशीर गाड्या बुलडोझरने पाडण्यात आल्या.
-
नागपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर 130 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
अफवा आणि वादग्रस्त पोस्ट टाळण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त. सोशल मीडिया पेट्रोलिंग सुरू. वादग्रस्त पोस्ट, लाईक आणि कमेंटवर पोलिसांची करडी नजर. धार्मिक स्थळांवर सुरक्षा वाढवली. संभाव्य तणाव टाळण्यासाठी पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा. ऑपरेशनमध्ये 150 जणांची चौकशी. संशयित हालचालींवर सतत नजर.
-
राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता
विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्टात पुढील आठवड्यात उकाडा वाढणार. राज्यातील वाढत्या तापमानामुळे पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण, गोवा येथे वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता. भारतीय हवामान विभागाचा अंदाज
Published On - Mar 19,2025 8:51 AM
