Maharashtra Breaking News LIVE : नांदेडमध्ये कुत्रा चावल्याने म्हैस दगावली
Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

मतांच्या चोरीवरून देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. भारतामध्ये अराजक तयार झालं पाहिजे, अशा प्रकारची मानसिकता राहुल गांधींची दिसत्ये, कारण त्यांना त्यांच्या पक्षासाठी पुढे भविष्य दिसत नाहीये अशा शब्दांत फडणवीस यांनी टीका केली. बदलापूर शहरातील प्रभाग रचना करताना पालिकेतील अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजप आमदार किसन कचरे यांनी केला आहे. प्रभाग रचनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करावी आणि चुकीची प्रभाग रचना रद्द करून नव्याने प्रभात रचना करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी कथोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याच्या अपहरणाचा प्रयत्न झाला.काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण करण्याचा प्रयत्न होता, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे पडळकरांच्या समर्थकाचा जीव वाचला. यासहद महाराष्ट्र, देश विदेशातील महत्वाच्या, राजकीय, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाम्या वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
LIVE NEWS & UPDATES
-
चीनमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू
गेल्या 48 तासांत चीनमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे किमान 17 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 33 जण बेपत्ता आहेत, अशी माहिती अधिकृत माध्यमांनी शुक्रवारी दिली.
-
पुतिन यांच्याशी झालेल्या संभाषणाबद्दल पंतप्रधान मोदींनी काय म्हटले?
पंतप्रधान म्हणाले की, माझे मित्र राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी माझी खूप चांगली आणि सविस्तर चर्चा झाली. युक्रेनवरील नवीनतम घडामोडी शेअर केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानले. आम्ही आमच्या द्विपक्षीय अजेंडातील प्रगतीचा आढावा घेतला आणि भारत-रशिया विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्यासाठी आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. या वर्षाच्या अखेरीस राष्ट्रपती पुतिन यांचे भारतात स्वागत करण्यास मी उत्सुक आहे.
-
-
पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी फोनवरून संवाद साधला, भारत भेटीचे आमंत्रण दिले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. पंतप्रधानांनी पुतिन यांना या वर्षाच्या अखेरीस भारत भेटीचे आमंत्रणही दिले आहे.
-
नांदेडमध्ये कुत्रा चावल्याने म्हैस दगावली
नांदेडमधून मोठी बातमी समोर आली आहे. कुत्रा चावल्याने म्हैस दगावली आहे. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील बिल्लाळी गावात ही घटना घडली आहे. या म्हशीचं दूध 171 जणांनी प्यायल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाकडून खबरदारी म्हणून त्या 171 जणांना रेबीजची लस देण्यात येत आहे.
-
सरकारने लोकसभेत आयकर विधेयक 2025 मागे घेतले
केंद्र सरकारने शुक्रवारी लोकसभेत आयकर विधेयक, 2025मागे घेतले. बिहारमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) च्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी निवड समितीच्या अहवालानुसार आयकर विधेयक, 2025 मागे घेण्याची परवानगी मागितली.
-
-
पंतप्रधान मोदी १० ऑगस्ट रोजी नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार, 10 ऑगस्ट 2025 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उत्तर रेल्वेच्या जम्मू विभागातील श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानक ते फिरोजपूर विभागातील अमृतसर रेल्वे स्थानकापर्यंत नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.
-
शरणू हांडे अपहरण प्रकरणी वकिलांनी दिली महत्वाची माहिती
शरणू हांडे अपहरण प्रकरणी आरोपीचे वकील शरद पाटील यांनी म्हटले की, एफआयआर करण्यासाठी सात तासाचा अवधी का लागला? हे प्रकरण कसा खोटं आहे याचा मी युक्तिवाद केला. राजकीय दबाव पोटी एफआयआर दाखल केला गेला असण्याची शक्यता आहे.
-
लाडक्या बहिणींना 2100 रूपये कधी मिळणार? आदिती तटकरे म्हणाल्या…
लाडकी बहीण योजनेच्या वाढीव रकमेसंदर्भात मंत्री आदिती तटकरेंनी देखील भाष्य केले आहे. ‘लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 1500 ऐवजी 2100 रूपये देण्याचा निर्णय शासन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे आणि अजित पवार, मंत्रिमंडळ घेतील’, असं तटकरेंनी म्हटलं आहे.
-
गिरीश महाजनांच्या नावाने 19 वर्षीय युवतीची फसवणूक
मंत्री गिरीश महाजन यांचा पुतण्या असून पोलीस दलात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून 19 वर्षीय युवतीची फसवणूक केल्याची घटना नाशिकच्या निफाड तालुक्यातील सायखेडा येथून समोर आली आहे. या प्रकरणी अभिषेक प्रभाकर पाटील याला अटक करण्यात आली आहे.
-
पुणे: बालगंधर्व चौकात युवक काँग्रेसचे आंदोलन
राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून, भाजपा व निवडणूक आयोगाने मिळून देशातील व राज्यातील निवडणूकीत मतांची चोरी केली आहे असा आरोप केला होता, त्यानंतर आता निवडणूक आयोगाने केलेल्या वोट चोरी घोटाळ्याच्या विरोधात युवक काँग्रेसने बालगंधर्व चौकात आंदोलन केले आहे.
-
पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात
पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात
प्रदीर्घ विश्रांतीनंतर पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात
शहराच्या मध्यवर्ती भागात पावसाच्या जोरदार सरी
पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा
-
गोंदियात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी
गोंदिया जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. विजेच्या कडकडाटासह सुरु झालेल्या या पावसामुळे उकड्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.. दुसरीकडे, या पावसाचा सर्वाधिक फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार असून शेतात लागवड करण्यात आलेल्या धान पिकाला जीवदान मिळालं आहे.
-
कल्याणमध्ये पुन्हा मराठी -अमराठी वाद
कल्याणमध्ये मनसेने परप्रांतीय इडली हॉटेल चालकाला चोप दिल्याचा प्रकार घडला आहे. इडली हॉटेल चालकाने मराठी माणसांबद्दल अपशब्द वापरले होते.
-
सोलापूर : शरणू हांडे अपहरण प्रकरणातील आरोपी कोर्टात हजर
सोलापूरातील शरणू हांडे अपहरण प्रकरणातील आरोपी अमित सुरवसे याच्यासह 4 जणांना सुनावली पोलीस कोठडी सुनावणी आहे.
-
जे काही सुरू आहे, त्याच्या वेदना मला होत आहेत – मंत्री रक्षा खडसे
जळगावात भाजपने एकनाथ खडसे यांच्या विरुद्ध केलेल्या आंदोलनावरून तसेच खडसे कुटुंबावर होत असलेल्या आरोपावरून भाजपचे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे
-
कल्याण स्टेशनवरील स्पावर पोलिसांचा छापा
कल्याण स्टेशनवर स्पाच्या नावाखाली मसाज पार्लर आणि वेश्याव्यवसाय सुरू होता. कल्याण महात्मा फुले पोलिसांनी 10 महिलांची सुटका करत मॅनेजर आणि चालकाला बेड्या ठोकल्या आहेत.
-
आंबेडकर अनुयायांकडून परभणीत रस्ता रोको
सोमनाथ सूर्यवंशी न्यायालयीन कोठडी मृत्यू प्रकरणात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल झाल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक झाले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. जोरदार घोषणाबाजी, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
नदीपात्राच्या पुरातून शेतकऱ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास
हिंगोली-कायाधू नदीपात्राच्या पुरातून शेतकऱ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास सुरु आहे. शेतातील गोठयात बांधलेल्या जनावरांना चारा पाणी करण्यासाठी शेतकऱ्याचा प्रवास. सकाळपासूनच कायधु नदीला पूर आला आहे.
-
सगळे राजकारणी बोगस आहेत; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी साधला निशाणा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच माध्यमाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी, ‘विचार पुढे, लाचार मागे असणार. बोलबच्चन आहेत नुसते हे लोक, सगळे राजकारणी बोगस आहेत खरंच’ असे म्हटले आहे.
-
धनंजय मुंडेंचं दहशतीचं राजकारण आता संपलंय- अंजली दमानिया
धनंजय मुंडेंचं दहशतीचा राजकारण आता संपलंय असे ट्वीट मी काल केलं आणि त्याचं कारण असं की बीडमध्ये पालकमंत्री अजित पवार गेले असताना तिथे धनंजय मुंडे कुठेही दिसले नाही हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा भाषणात अजित पवार म्हणतात की इथे कोणाचे बड्या बापाचा बेटा असला तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई होईल. तिसरा डायलॉग त्यांचा की आका असो काका असो सगळ्यांवर कारवाई होईल.
-
रामदास भाऊ आता मंडणगडचेच नेते-भास्करराव जाधव
रामदास कदम फक्त म्हणायला महाराष्ट्राचे नेते आहेत. आता ते जामगा आणि मंडणगडचे नेते राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही वक्तव्याला आम्ही फार काही महत्त्व देत नाही. त्यांचं वक्तव्य वाचाळ वीराचे वक्तव्य आहे, अशी टीका उद्धव सेनेचे नेते भास्करराव जाधवांनी केली.
-
सदाभाऊ खोत यांचा रोहित पवारांवर हल्लाबोल
आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते शरणू हांडे यांचे सोलापूर मधून राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्या गुंडाने अमित सूर्यवशे यांनी अपहरण केले होते. कर्नाटक मध्ये मिळून आले निश्चितपणान सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि संपूर्ण पोलीस दलाचे अभिनंदन करतो. पण गुंडागर्दी कुठे चालते, अपहरण कशा पद्धतीने होतात, खून कशा पद्धतीने होतात, भ्रष्टाचार कशा पद्धतीने होतात. याचं एक मोठं विश्वविद्यालयचे आदरणीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आता रोहित पवार चालवत आहेत. आता रोहित पवार यांच्या तोंडावरती बोट आहेत का त्यांचे तोंड आता शिवलेलं आहे. का शब्द आता फुटू शकत नाही. हा कार्यकर्ता कुणाचा गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवरती हल्ला झाल्यानंतर त्याचा सत्कार रोहित पवार यांनी केलेला होता म्हणजे या राज्यांमध्ये गुंडागर्दीला खतपाणी रोहित पवार आता तुम्ही घालत आहात, असा आरोप सदाभाऊ खोतांनी केला.
-
मनसे आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांची बैठक
नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांची बैठक सुरू आहे. शिवसेनेचा मुख्यालयामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीला मनुष्याचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि मनसेचे ही नेते पदाधिकारी उपस्थित आहेत. आगामी महापालिका निवडणुकांसह शहरातील नागरी समस्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे.
-
नैराश्यामुळे तरुण शेतकऱ्यांचे टोकाचे पाऊल
देशात शेतकरी 8 आत्महत्या दिवसाला होत आहे आणि त्यात युवक 7 आत्महत्या करत आहे त्याचे कारण डिप्रेशन आहे आई वडिलांचा विचार करा, असे आमदार रोहित पवार म्हणाले.
-
बावनकुळेंचा ठाकरेंना टोला
इंडिया आघाडीतील उद्धव ठाकरें यांच स्थान त्यांना कळणं गरजेचं आहे. मी त्यांच स्थान ठरवून उपयोग नाही इंडिया आघाडीच्या बैठकीत शेवटच्या रांगेत उद्धव ठाकरे बसण्यावरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
-
आका असो फाका, माफ करणार नाही
नगरपालिका, नगरपंचायत, मनपा असेल तिथे आपलं काम झालं पाहिजे. जर एखादा कॉन्ट्रॅक्टर ओळखीचा असला तरी. कारण तो जनतेचा पैसा आहे त्यांच्या बापाचा पैसा नाही. किती वर्ष पिढ्या नि पिढ्या दुसऱ्यांचे तुम्ही ऊस काढत बसणार जरा आत्मचिंतन करा. कुणी मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवाय राहणार नाही पाय घसरत असेल तर सावरा सुधरा. मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला माफ करणार नाही. कुणी आका असु नाही तर फाका असो, असा सज्जड दम अजितदादांनी बीडमध्ये भरला.
-
जिल्ह्यातील लिंग गुणोत्तरात तफावत; 1 हजार मुलांमागे केवळ 866 मुली
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार जालना जिल्हा लिंग गुणोत्तरात मोठी घट झाली असून सद्यस्थितीला 1 हजार मुलांना मागे केवळ 866 मुली आहेत. जिल्ह्यात मागील काही दिवसांपूर्वी भोकरदन आणि शहरात सर्रास सुरू असणारे गर्भलिंग निदान करणारे मोठे रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले होते. अंधश्रद्धा हुंड्याच्या पद्धतीमुळे अनेक ठिकाणी गर्भलिंग निदान करून मुलगी असल्यास गर्भपात केला जातो.यामुळे जिल्ह्यातील लिंग गुणोत्तरात मोठी तफावत पहायला मिळत आहे.
-
नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांची बैठक
नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांची बैठक सुरू. शिवसेनेच्या मुख्यालयामध्ये बैठकीचं आयोजन. बैठकीला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि मनसेचे नेते पदाधिकारी उपस्थित. आगामी महापालिका निवडणुकांसह शहरातील नागरी समस्यांवर बैठकीत होणार चर्चा.
-
मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी
मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दीत ट्रक पलटी झाल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. विरारच्या सिरसाट फाटा ते घोडबंदर रोडवर ही वाहतूक कोंडी झाली असून, गुजरात आणि मुंबई दोन्ही लेनवर वाहतूक कोंडी झाली आहे. विरार आणि शिरासाड फाटाच्या मध्यभागी रात्री बारा वाजता ट्रक पलटी झाला असून, अद्यापही तो काढला नसल्याने महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत असून वाहनधारकांचे प्रचंड हाल सुरु आहेत.
-
मराठा कार्यकर्त्यांचा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव
तुळजापुरात मराठा कार्यकर्त्यांचा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव. मनोज जरांगे पाटलांना मुंबईला जाण्याची वेळ येऊ देऊ नका, बावनकुळेंना निवेदन. सरकार मराठ्यांचा अंत पाहत आहे का ? मनोज जरंगे पाटलांनी पुकारलेल्या आरक्षण आंदोलनावर भूमिका काय मराठा कार्यकर्त्यांचा सवाल?
-
2022 मध्ये नंतर महाराष्ट्र फारच वाईट वळणावर गेला – किशोरी पेडणेकर
“2022 मध्ये नंतर महाराष्ट्र फारच वाईट वळणावर गेला. त्यामुळे उद्धवजी आणि राज जी जर एकत्र येत असतील, तर अनेकांची पोटदुखी चालू झाली आहे. त्या पोट दुखीवर एकच औषध ती म्हणजे आमची युती” असं मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
-
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पोलीस कंट्रोल रुमची पाहणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पोलीस कंट्रोल रुमची पाहणी करण्यात आली. पुण्यातील पोलीस कंट्रोल रुमची पाहणी त्यांनी केली.
-
उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची परंपरा धुळीस मिळवली- नरेश म्हस्के
“उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची परंपरा धुळीस मिळवली. महाराष्ट्राचा कणा खुर्चीसाठी गहाण ठेवला. उद्धव ठाकरेंची पिंजरा चित्रपटातील मास्तरसारखी अवस्था झाली आहे”, अशी टीका नरेश म्हस्केंनी केली आहे.
-
शिंदेंच्या सेनेचं प्रतिकात्मक आंदोलन
राहुल गांधींच्या प्रेझेंटेशनवेळी उद्धव ठाकरेंना सहाव्या रांगेत बसवलं. याप्रकरणी मुंबईत शिंदेंच्या सेनेकडून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं. शीतल म्हात्रे आणि मनीषा कायंदे या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.
-
चौकशी करून रोहित पवारांना आरोपी केलं पाहिजे – पडळकर
“माझ्या कार्यकर्त्याच्या हत्येचा प्रयत्न होता. या प्रकरणाच्या पाठीमागे कोणीतरी आहे. चौकशी करून रोहित पवारांना आरोपी केलं पाहिजे,” अशी मागणी गोपिचंद पडळकरांनी केली आहे.
-
‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाच्या वादावर भुजबळांची प्रतिक्रिया
“खालिद का शिवाजी या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी काही हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तो चित्रपट मी पाहिलेला नाही, त्यामुळे त्यात काय चुकीचं आहे हे मला माहीत नाही”, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली.
-
शरयू हांडे पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला- पडळणकर
“शरयू हांडे पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचलाय. सुरवसेनं माझ्या गाडीवर दगड फेकले होते. अमित सुरवसेच्या छातीवर शरद पवारांचा टॅटू आहे. सुरवसेचे एकाच परिवारासोबत फोटो कसे,” असा सवाल गोपिचंद पडळकरांनी उपस्थित केला आहे.
-
गोपीचंद पडळकर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल, शरणू हांडेंना भेटणार
भाजप आमदार गोपीचंद पडळकर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल झाले आहेत. समर्थक शरणू हांडे याला भेटण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर सोलापुरात आले आहेत. आरोपी अमित सुरवसे याने शरणू हांडे याचे अपहरण करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
दिल्लीत उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींची बैठक, महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा
दिल्लीत उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींची ३५ मिनिटे बैठक सुरु आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर ही बैठक होत आहे. या बैठकीला राहुल गांधी, उद्धव ठाकरे, प्रियांका गांधी हे देखील उपस्थित आहेत.
-
लाखो मतांची चोरी कशी झाली याचे पुरावे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरच, संजय राऊत यांचा दावा
नरेश म्हस्के म्हणजे दुतोंडा गांडूळ आहे. शिवसेना तोडली, तेव्हा शिवराय दिसले नाहीत का, निवडणूक आयोग हा भाजपचा हस्तक आहे. नोकर आहे, राहुल गांधींनी जी माहिती दिली, ती निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आहे. त्यांच्या वेबसाईटवरुन हा क्राइम त्यांनी शोधला. लाखो मतांची चोरी कशी झाली, याचे पुरावे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरच आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केले.
-
ठाकरेंच्या आसन व्यवस्थेवरुन टीका करणारे भंपक लोक – संजय राऊत
ठाकरेंच्या आसन व्यवस्थेवरुन टीका करणारे भंपक लोक आहेत. राहुल गांधींनी व्होट चोरीची माहिती दिली. उद्धव ठाकरेंचे आणखी काही फोटो होते, बघितले नाही का? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला.
-
नाशिकमध्ये आज ठाकरे सेना आणि मनसे यांची एकत्रित बैठक
नाशिकमध्ये आज ठाकरे सेना आणि मनसे यांची एकत्रित बैठक होणार आहे. सकाळी ११ वाजता ठाकरे गटाच्या शालिमार येथील कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी, पाणीटंचाईचा प्रश्न आणि रस्त्यांवरील खड्डे यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही पक्षांचे नेते एकत्र येऊन चर्चा करणार आहेत. स्थानिक समस्या सोडवण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र येत असल्याने या बैठकीकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
-
मालगाडीचा घसरलेला डबा उचलण्याचे प्रयत्न सुरू
मनमाडवरून रेल्वेचे हायड्रोलिक इन्स्ट्रुमेंट, व अपघात विभागाचे पथक घटनास्थळावर दाखल. रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्ग थोड्यावेळासाठी ठेवण्यात आले बंद. घसरलेला डबा उचलण्याचे प्रयत्न सुरू
-
मी जेवायला आलो तर माझं बिल घेऊ नका, अजित दादांची मिश्किल टिपणी
हॉटेल मालक मला म्हणाले अजित दादा नाष्टा करुन जा, पण आज खरंच वेळ नाही. पुढच्या वेळी आलो की नक्की जेवण करेन. तेंव्हा मात्र माझं बिल घेऊ नका. अशी मिश्किल टिपणी अजित दादांनी केली. पण हा चेष्टेचा भाग झाला. मी स्पष्ट सांगतो. राजकारण आणि व्यवसाय स्वतंत्र ठेवा. हॉटेलमध्ये कोणी ही येऊ द्या, बिल सर्वांचं घ्या. असं केलं नाही तर दिवाळं निघेल. हॉटेल बंद करण्याची वेळ येईल.
-
गोविंदाची पंढरी दहीहंडीसाठी सज्ज
मंडप परवानगीची प्रक्रिया सुकर करण्यासाठी ऑनलाईन सेवा सुरू. मात्र ठाण्यात उत्सवासाठी 38 पैकी 21 मंडळांना मंडपाची पालिकेकडून परवानगी. ठाणे महापालिका निवडणुकीत इच्छुक असलेल्या कडून देखील दहीहंडी उभारली जात आहे
-
बावनकुळे यांचे मोठे विधान
चंद्रशेखर बावनकुळे यांनी या कार्यक्रमावेळी भाषण केले. या भाषणावेळी त्यांनी २१ वर्षांपूर्वीच्या एका घटनेचा उल्लेख केला. “मला अभिमान आहे की तुम्ही २१ वर्षांपूर्वीची घटना सांगितली. २१ वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्यासमोर हा विकास आराखडा मांडला होता. मला कोणावर टीका करायची नाही, असे त्यांनी म्हटले.
-
ठाणे – गोविंदाची पंढरी दहीहंडीसाठी सज्ज
ठाणे – गोविंदाची पंढरी दहीहंडीसाठी सज्ज झाली आहे. मंडप परवानगीची प्रक्रिया सुकर करण्यासाठी ऑनलाईन सेवा सुरू.
मात्र ठाण्यात उत्सवासाठी 38 पैकी 21 मंडळांना मंडपाची पालिकेकडून परवानगी. ठाणे महापालिका निवडणुकीत इच्छुक असलेल्या कडून देखील दहीहंडी उभारली जात आहे.
-
‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर एक महिन्याची बंदी
‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाचं प्रदर्शन महिन्याभरासाठी पुढे ढकलण्यात आलं आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाला एका महिन्यासाठी स्थगिती देण्यात आली आहे.
-
हिंगोली- पावसात जेलेश्वर तलावाच्या पिचिंगचा काही भाग कोसळला
हिंगोली-पहिल्याच पावसात जेलेश्वर तलावाच्या पिचिंगचा काही भाग कोसळला तर पिचिंगला अनेक ठिकाणी खोल तडे गेले. भाजपा आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या प्रयत्नांतून कोटयावधी रुपये खर्च करून शहरातील जेलश्वर तलावाचे सु-शोभिकरण होत आहे.
काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा हिंगोलीकरांचा आरोप असून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंपनीवर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.
-
जालना महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेचा मसुदा तयार
जालना महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेचा मसुदा तयार; पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांना प्रारूप आराखडा सादर करण्यात आला.
जालना महापालिकेत सदस्य संख्या होणार 65; एका प्रभागात 4 नगरसेवक असणार. 12 ऑगस्टपर्यंत जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव नगर विकास विभागाकडे जाणार. 13 ऑक्टोंबर पर्यंत हरकती आणि सूचनाचे निराकरण करून अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना निघणार.
-
रत्नागिरीमध्ये खासगी बसमध्ये काढली महिलेची छेड
रत्नागिरीमध्ये खासगी बसमध्ये एका महिलेची छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. पहाटे बस थेट रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात नेण्यात आली. पोलिसांनी महिलेचा तक्रार अर्ज दाखल करून घेतला असून त्यानंतर ही बस सिंधुदुर्गकडे रवाना करण्यात आली.
-
गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे फिल्मी स्टाईल अपहरण करण्याचा प्रयत्न
काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी सोलापुरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे फिल्मी स्टाईल अपहरण करुन हत्येचा प्रयत्न करण्यात आला. शरणु हांडे असे अपहरण झालेल्या गोपीचंद पडळकर समर्थकाचे नाव आहे तर अमित सुरवसे असे अपहरण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
सोलापूर शहर पोलीस दलाच्या सतर्कतेमुळे गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकाचा जीव थोडक्यात वाचला.
-
देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर साधला निशाणा
आपल्या लोकशाहीने तयार केलेल्या संस्था आहेत, त्या संस्थांवरून लोकांचा विश्वास उडला पाहिजे, भारताच्या लोकशाही प्रक्रियेवरून लोकांचा विश्वास उडला पाहिजे. भारतामध्ये अराजक तयार झालं पाहिजे, अशा प्रकारची मानसिकता राहुल गांधींची दिसत्ये, कारण त्यांना त्यांच्या पक्षासाठी पुढे भविष्य दिसत नाहीये अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
Published On - Aug 08,2025 7:58 AM
