Maharashtra Breaking News LIVE 24 February 2025 : गजा मारणे याला मारहाण प्रकरणात कोथरूड पोलिसांकडून अटक
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 24 फेब्रुवारी 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

जिल्हा सत्र न्यायालयात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अपिलावर आज महत्त्वपूर्ण सुनावणी. अत्यल्प उत्पन्न दाखवून कोकाटे यांनी मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका लाटल्याप्रकरणी कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलीय 2 वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रुपये दंड. या शिक्षेविरोधात कोकाटे यांनी सत्र न्यायालयात केलय अपील. आज सत्र न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष. सत्र न्यायालयात कोकाटे यांची शिक्षा कायम राहणार की दिलासा मिळणार?. धाराशिव मधील तुळजापूर येथे एकाच रात्रीत चार घरफोड्या, दोन चोरटे सीसीटीव्हीत कैद. शहरातील तुळजाई नगरातील दोन घरे तर लगटच्या शिंदे प्लॉटिंगमधील दोन घरांवर चोरट्यानी हात साफ केला. तुळजापूर शहरातील शिंदे प्लॉटींग तुळजाई नगर येथे घरफोडी करताना चोरटे सीसीटीव्हीत कैद. घरातील भाडेकरू लग्नाला गेल्याची वेळ साधत चोरट्यांचा डल्ला. पाच तोळे सोने आणि टीव्ही गायब.
LIVE NEWS & UPDATES
-
गजा मारणे याला मारहाण प्रकरणात कोथरूड पोलिसांकडून अटक
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या माणसाला मारहाण केल्याप्रकरणी आरोपी गजा मारणे याला कोथरूड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मारणे याने मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे निकटवर्ती असेलल्या देवेंद्र जोग यांना मारहाण केली होती. पोलिसांनी त्या प्रकरणात गजा मारणेला अटक केलीय. तसेच इतर आरोपींचा शोध सुरूय. या प्रकरणातील मुख्य आरोपी बाब्या पवारलारही करण्यात आलीय.
-
निलम गोऱ्हे यांनी भाष्य केलं नसतं तर बरं झालं असतं : शरद पवार
शिंदे शिवसेनेच्या निलम गोऱ्हे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीजवर एक पद मिळायचं, असं म्हटलं. यावरुन राज्याच्या राजकारणात चांगलाच वाद पेटला. आता गोऱ्हेंच्या या प्रतिक्रियेवरुन शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निलम गोऱ्हे यांनी भाष्य केलं नसतं तर बरं झालं असतं, असं शरद पवार यांनी म्हटलं.
-
-
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती
मोठी बातमी समोर आली आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. कोकाटे यांना 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
-
ठाण्यात निलम गोऱ्हेंविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन
ठाण्यात निलम गोऱ्हे यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात येत आहेत. गोऱ्हेंविरोधात ठाकरे गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. राजन विचारे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जात आहे.
-
सोलापूर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आयशर टेम्पोला आग
सोलापूर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आयशर टेम्पोला भीषण आग लागली आहे. हैदराबाद रोड येथील चंदनकाट्या जवळ टेम्पोला आग लागल्यामुळे वाहन आगीत जळून खाक झाली आहेत. टेम्पोला भीषण आग लागल्यामुळे सोलापूर हैद्राबाद महामार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून टेम्पोला लागलेली आग विजवण्यात आली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांमधून टेम्पोला लागलेली आग विजवण्यात आली
-
-
शिवसेना नेते संजय शिरसाटांचा संजय राऊत आणि ठाकरेंच्या शिवसेनावर निशाणा
शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी संजय राऊत आणि ठाकरेंच्या शिवसेनावर निशाणा साधला आहे. “ठाकरेंच्या शिवसेनेनं मराठवाड्यात पैसे घेऊन तिकीटं दिली. ठाकरेंनी निष्ठावंतांना तिकीटं दिलं नाही “असं म्हणत शिरसाटांनी राजू शिंदेंवरून टोला लगावला. तसेच ” एक महिला बोलली तर तिच्या घराबाहेर हे आंदोलन करतात. शिवसेना प्रमुखांनी बनवलेली शिवसेना तुम्ही बुडवली” निलम गोऱ्हेंवरून शिरसाटांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.
-
भाजपा मंत्री पंकजा मुंडे आईंसह प्रयागराज येथे महाकुंभात, केलं अमृतस्नान
भाजपा मंत्री पंकजा मुंडे हे देखील प्रयागराज येथे महाकुंभाला गेल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी त्यांच्या आईसह कुंभमेळ्यात उपस्थिती दर्शवली. तसेच पंकजा मुंडे यांनी महाकुंभात अमृतस्नान आणि पूजाही केली.
-
बीडमध्ये भागचंद महाराज झांजे धनंजय देशमुख यांच्या भेटीला
बीडमधील मस्साजोगमध्ये भागचंद महाराज झांजे हे धनंजय देशमुख यांची भेट घेतली आहे. अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायातून भागचंद महाराज झांजे यांनी देशमुख यांची भेट घेतली आहे. याच विषयावरून धनंजय देशमुख व भागचंद महाराज झांजे यांच्यात याच गोष्टीवरून चर्चा सुरू आहे. धनंजय मुंडे व महंत नामदेव शास्त्री यांच्या भेटीवर झांजे महाराज यांनी दिली होती प्रतिक्रिया. या प्रतिक्रियेनंतर भागचंद महाराज झांजे यांना जीवे मारण्याची धमकीही आल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
-
शिवसेना (उबाठा ) नेते वसंत मोरे यांचा नीलम गोऱ्हे यांच्यावर हल्लाबोल
शिवसेना (उबाठा ) नेते वसंत मोरे यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर हल्लाबोल केला. “पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विधानपरिषदेत ‘लक्षवेधी’ मांडण्याच्या धमक्या देऊन पैसे उकळणाऱ्या तुम्ही उद्धव साहेबांना मर्सिडीज काय देणार? २०१२ पासून ते २०१७ पर्यंत शिवसेना नेत्याने तोंड उघडले तर ताई तुम्ही कुठे असाल,” असा सवाल करत नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यानंतर पुण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आक्रमक झाली आहे.
-
मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाट वाहतुकीसाठी बंद
मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. आजपासून २४ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाहतुकीस बंद राहणार. तर ३ ते ६ मार्च पर्यंतही याच वेळेत बंद राहणार. पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी आणि रस्त्याच्या दुरुस्तीसाठी घाट बंद करण्यात आला आहे. या कालावधीत नाशिक-मुंबई महामार्गावरून नवीन कसारा घाटातून वाहतूक वळविली आहे.
-
वनमंत्री गणेश नाईक यांच्या ठाण्यातील बहुचर्चित जनता दरबाराला सुरुवात
वनमंत्री गणेश नाईक यांच्या ठाण्यातील बहुचर्चित जनता दरबाराला सुरुवात झाली आहे. ठाण्यातील महाजनवाडी हॉलमध्ये जनता दरबार घेण्यात येत आहे. तब्बल दहा वर्षांनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात नाईक यांचा जनता दरबार भरला आहे. नाईक हे ठाण्याचे पालकमंत्री असताना दर आठवड्याला जनता दरबार घेत होते.
-
65 बेकायदा इमारतींच्या रहिवाशांचा संघर्ष
65 बेकायदा इमारतींचे रहिवासी ठाण्यात वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात न्यायाच्या मागणीसाठी आले आहेत. बोगस कागदपत्रांवर इमारती उभारणाऱ्यांवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाईची मागणी दीपेश म्हात्रे करणार आहेत. गणेश नाईक यांच्या जनता दरबारात या प्रकरणावर काय भूमिका घेतली जाते याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष आहे.
-
राज्यातील मंत्री प्रयागराजमध्ये दाखल
प्रयागराज- राज्यातील मंत्री प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. संजय राठोड, दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, भरत गोगावले दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयागराजमध्ये दाखल होणार आहेत. मंत्र्यांसमवेत एकनाथ शिंदे कुंभमेळ्यामध्ये पवित्र स्नान करणार आहेत.
-
मस्साजोग – भागचंद महाराज झांजे हे धनंजय देशमुख यांच्या भेटीला
मस्साजोग, बीड – भागचंद महाराज झांजे हे धनंजय देशमुख यांच्या भेटीला आले. धनंजय देशमुख व भागचंद महाराज झांजे यांच्यात चर्चा सुरू आहे.
अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायातून भागचंद महाराज झांजे यांची भेट आहे. धनंजय मुंडे व महंत नामदेव शास्त्री यांच्या भेटीनंतर झांजे महाराज यांनी प्रतिक्रिया दिली होती.
-
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे केंद्रीय मंत्र्यांची पाठ
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे केंद्रीय मंत्र्यांची पाठ. केंद्रीय हवाई वाहतूक राज्य मंत्री आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सर कार्यवाह मुरलीधर मोहोळ आणि केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री, कार्यकारी अध्यक्ष रक्षा खडसे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाकडे पाठ. दोन्ही केंद्रीय मंत्र्यांना साहित्य संमेलनामध्ये पद देऊनही महामंडळ आणि आयोजकांना मंत्र्यांकडून केराची टोपली दाखवण्यात आली.
-
दिल्लीत झालेलं साहित्य संमेलन नव्हतंच – संजय राऊत
दिल्लीत झालेलं साहित्य संमेलन नव्हतंच. नीलम गोऱ्हे या लक्षवेधी घ्यायला किती पैसे घेतात ते विचारा – नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यावरून संजय राऊत संतापले
-
नीलम गोऱ्हे यांचं कालचं वक्तव्य हे विकृती – संजय राऊत
नीलम गोऱ्हे निर्लज्ज बाई, त्यांच कालचं वक्तव्य हे विकृती. गोऱ्हे या पक्षातून जाताना घाण करून गेल्या. – संजय राऊतांचे टीकास्त्र
-
जळगाव- अंत्योदयशिधापत्रिका असलेल्या कुटुंबातील १ लाख महिलांना होळीपूर्वीच मिळणार साडी..
जळगाव जिल्ह्यात रेशन दुकानावर अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या कुटुंबातील १ लाख ३५ हजार ३०२ महिलांना होळी सणापूर्वीच साडी मिळणार . अन्नधान्य पुरवठा विभागाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील सर्व रेशन दुकानांवर अंत्योदय कार्डधारकांच्या संख्येनुसार साड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
लाभार्थी महिलांनी रेशन दुकानात जाऊन ई-पॉस मशीनवर अंगठा ठेवल्यानंतर त्यांना एका कार्डवर एक साडी दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी गायकवाड यांनी दिली.
-
Maharashtra News: बुलढाणा जिल्ह्यात आढळला पहिला GBS चा रुग्ण…
जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा बुद्रुक येथील साडे आठ वर्षांच्या बालकाला झाली GBS ची लागण… अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू…
-
Maharashtra News: तुळजापुरात ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या महिलेला मुंबईतून अटक, मोठ रॅकेट उघड होण्याची शक्यता
ड्रग्ज प्रकरणातील पाच पैकी चार आरोपींना आतापर्यंत अटक, आरोपींना एक मार्चपर्यंत पोलीस कोठडी… अटकेच्या कारवाईबाबत पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची माहिती… तुळजापुरात विक्रीसाठी येत असलेले एमडी ड्रग्ज पोलिसांनी पकडल्यानंतर मुंबई कनेक्शन आले उजेडात… तुळजापुरातील स्थानिकांसह आतापर्यंत प्रकरणात पाच आरोपी समोर…
-
Maharashtra News: जळगावातही आता तब्बल 25 मजली उंच इमारतींना महापालिका देणार परवानगी
मुंबई-पुण्यापाठोपाठ आता जळगाव महापालिका हद्दीतही गगनचुंबी इमारतींना परवानगी मिळणार आहे… जळगाव महापालिकेच्या नियमानुसार आता जळगाव शहर हद्दीत 70 मीटर उंचीची अर्थात 25 मजल्यापर्यंतच्या इमारतींना परवानगी दिली जाणार आहे… जळगाव शहरात 18 मजल्याच्या दोन इमारतींना महापालिकेच्या नगररचना विभागाने परवानगी दिली आहे. या इमारतीच्या बांधकामास सुरुवात झाली आहे
-
गाडी दुभाजकाला धडकली, दोन जणांचा होरपळून मृत्यू
जामखेड शहरातील दूभाजकाला धडकून ईरटीका गाडीने घेतला पेट. बीड रोडवरील नवले पेट्रोल पंपाजवळ पहाटे 4 च्या सुमारास घडली घटना घडली. या घटनेत गाडीतील दोन जणांचा होरपळून दुर्देवी मृत्यू. धनंजय गुडवाल आणि महादेव काळे असे मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे. धनंजय गुडवाल हे पोलीस असून जामखेड पोलीस ठाण्यात कार्यरत. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी घेतली धाव.
-
नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष घेणार संघटनात्मक आढावा
नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ घेणार संघटनात्मक आढावा बैठक. आज आणि उद्या जिल्हाध्यक्ष तसेच प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक. आज राज्यातील सर्व जिल्ह्याचे काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राहणार उपस्थित, तर उद्या 25 फेब्रुवारीला प्रदेश कमिटीच्या प्रतिनिधीची बैठक. बैठकीला काँग्रेसचे अनेक नेते राहणार उपस्थित.
-
वसईत बहुजन विकास आघाडीला खिंडार
वसई पूर्व राजीवली डांबर कंपाऊंड येथे बहुजन विकास आघाडीला खिंडार. वसईच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांच्या उपस्थितीत बविआचे नितीन भोईर यांचा शेकडो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह भाजपात पक्ष प्रवेश. भाजपाचे वसई विरार जिल्हा सचिव प्रवीण गावडे, धीरेंद्र कुलकर्णी यांच्या पुढाकारातून आमदार स्नेहा दुबे-पंडित यांच्या उपस्थितीत नितीन भोईर यांचा झाला पक्षप्रवेश.
-
धनंजय मुंडे यांच्या विरोधातील तक्रारीवर आज सुनावणी
करुणा शर्मा यांनी दाखल केली होती ऑनलाईन तक्रार. धनंजय मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती सादर केल्याची तक्रार. मंत्री धनंजय मुंडे यांनी 2024 मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसेच करुणा शर्मा यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता. मात्र करूणा शर्मा यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता. त्यांनी ही माहिती दडपल्याबाबत शर्मा यांनी तक्रार केली होती. त्यानंतर न्यायालयाने नोटीस बजावत याबाबतची सुनावणी 24 फेब्रुवारी रोजी ठेवली. आज या प्रकरणात परळी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Published On - Feb 24,2025 8:19 AM
