Maharashtra Breaking News LIVE 11th April 2025 : उदयनराजे यांच्या वक्तव्याचा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला निषेध
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 11 एप्रिल 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

कोरेगाव पार्क भाग परिसरातील एका उद्योजकाला पाच कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उद्योजकाला धमकाविण्यासाठी पाकिस्तानातील मोबाइल क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा, तसेच सायबर पोलिसांकडून सुरू आहे. कल्याण ग्रामीणमधील खोणी गावात देवाची चोरी! शेतात पूर्वजांपासून उपासनेसाठी असलेला वेताळेश्वर देवाची दगडी मूर्ती आणि दोन पितळी समया अचानक गायब झाल्याने गावकरी संतप्त. डोंबिवली मानपाडा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर देव चोरीचा केल्याचा गुन्हा दाखल. कुटुंबासाठी आणि गावासाठी श्रद्धास्थान असल्याने मानपाडा पोलिसाची टीम चोराच्या शोधात आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
उदयनराजे यांच्या वक्तव्याचा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला निषेध
उदयनराजे भोसले यांच्या वक्तव्याचा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी निषेध केला आहे. सर्वप्रथम स्रियांची शाळासर्वप्रथम थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरू केली आणि त्याचे अनुकरण सावित्रीबाई फुले यांनी केले असे वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
-
शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी धुळ्यात शिक्षण विभागाची बैठक घेतली
शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी धुळ्यात जिल्हा परिषद आणि महापालिका क्षेत्रातील शिक्षण विभागाचा आढावा घेतला आहे. जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांशी संवाद साधला आहे. महापालिका क्षेत्रात घटलेल्या विद्यार्थी संख्येवरून दादा भुसे यांनी टीका केली आहे.
-
-
सोन्याच्या दराची पुन्हा नव्याने विक्रमी उच्चांकी
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दराने पुन्हा नव्याने विक्रमी उच्चांकी गाठली आहे. बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदा सोन्याच्या दराने 95 हजारांचा आकडा पार केला आहे.जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर Gst सह 95 हजार 200 रुपयांवर पोहोचले आहे.
-
Maharashtra Breaking : करमाळा तालुक्यातील आळसुंदे ते वरकुटे शिवरस्ता खुला करण्यासाठी महिलांसह शेतकऱ्यांचे रस्ता रोउको आंदोलन सुरू
मार्ग नसल्याने शेतकरी आक्रमक ; रस्ता रोको आंदोलनावेळी शेतकरी आंदोलक चढले जेसीबीमशीनवर… रस्ता रोको आंदोलन चिघळले… अग्निशमन दलाची गाडी जेसीबीतून उतरविण्यासाठी बोलाविले असता महिला आक्रमक… अग्निशमन दलाच्या गाडीचा शेतकरी महिला यांनी घेतला ताबा… अग्निशमन गाडी आंदोलनावेळी अंगावर घातल्याचा आरोप…
-
Maharashtra Breaking : क्रेडिट घ्यायला राणाला भारतात आणला का हे भाजपनं स्पष्ट करावं – संजय राऊत
क्रेडिट घ्यायला राणाला भारतात आणला का हे भाजपनं स्पष्ट करावं… 2009 साली राणा, हेडलीविरोधत NIA कडून पहिली FIR दाखल करण्यात आला. तेव्हापासून ही सर्व प्रक्रिया सुरु… दहशतवाद्यांचं कसलं क्रेडिट घेताय? असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
-
-
Maharashtra Breaking : पुण्यातील महात्मा फुले वाड्याच्या समोरच आंदोलन
पुण्यातील महात्मा फुले वाड्याच्या समोरच आंदोलन सुरु आहे. पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचे आंदोलन… महात्मा फुले चित्रपटाबाबत सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाला विरोध… ‘सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या घराबाहेर आंदोलन करणार…’ असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे.
-
Maharashtra Breaking : एनआयए तहव्वूर राणाला देशाच्या वेगवेगळ्या भागात नेण्याची शक्यता
राणाच्या कोठडीच्या मागणीचे हे एक मुख्य कारण होते… एनआयएला हे समजून घेण्याची आवश्यकता आहे की मुंबई मॉडेल हे भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये अंमलात आणले गेले होते का आणि तसे हल्ले करण्याचा काही प्लॅन होता का ?? याचा तपास NIA करणार… अशी सूत्रांची माहिती आहे. नोव्हेंबर 2008 मध्ये राणाने आग्रा दिल्ली अहमदाबाद मुंबई या शहरांना दिल्या होत्या भेटी…
-
नाशिक ते मनमाडदरम्यान रेल्वे ट्रॅकचा प्रस्ताव सादर- हेमंत गोडसे
“नाशिक ते मनमाडदरम्यान रेल्वे ट्रॅकचा प्रस्ताव सादर झाला आहे. पुढच्या दोन महिन्यात त्यावर अंतिम निर्णय होऊन मंत्रालयाची मंजुरी मिळेल. कसारा नाशिक लोकलचं काम अंतिम टप्प्यात आलंय असं वाटतंय. नाशिकपासून वैतरणा, नाशिक रोड, लहवित असा ट्रॅक असू शकतो,” अशी माहिती माजी खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.
-
सुरतच्या वेसू परिसरातील एका इमारतीला आग; राज्याचे गृहमंत्री घटनास्थळी
सुरत, गुजरात- सुरतच्या वेसू परिसरातील एका इमारतीला आग लागली असून यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी घटनास्थळी उपस्थित आहेत.
-
प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्यावर नियमभंगाचा ठपका
प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्यावर नियमभंगाचा ठपका ठेवण्यात आलाय. मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय भूखंड वापराबाबत नियमभंगाचा निष्कर्ष दिला आहे. वाडकरांचं जुहू तारा रोड परिसरात ‘आजिवसन’ हे गुरूकुल संकुल आहे. संकुलाच्या शासकीय भूखंड वाटपात नियमभंग झाल्याचा ठपका आहे.
-
महात्मा फुले चित्रपटाच्या संदर्भातील सेन्सॉर बोर्डाच्या जातीवादी निर्णयाच्या विरोधात आंदोलन
पुणे- महात्मा फुले चित्रपटाच्या संदर्भातील सेन्सॉर बोर्डाच्या जातीवादी निर्णयाच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे आंदोलन करणार आहेत. पुण्यातील महात्मा फुले वाडाच्या समोरच आंदोलन होणार आहे. या आंदोलनास प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. थोड्याच वेळात आंदोलनाला सुरुवात होणार आहे.
-
गणेश नाईकांचा दुसरा जनता दरबार काशिनाथ घाणेकरमध्ये
फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगलेली पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हटल्या जाणाऱ्या आणि ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः एकनाथ शिंदे आहेत त्याच ठाण्यात गणेश नाईकांचा दुसरा जनता दरबार काशिनाथ घाणेकर या ठिकाणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
-
अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या झाल्यानंतर मुंब्रा पोलीस अलर्ट मोडवर
अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या झाल्यानंतर मुंब्रा पोलीस अलर्ट मोडवर आहे. रात्री उशिरा पोलिसांनी टवाळखोऱ्यांना पळवून लावलं आहे. रात्री उशिरा विविध ठिकाणी मुंब्रा पोलिसांनी गस्ती वाढवली आहे. मुंब्र्यातील गुन्हेगारीवर आळा बसावा यासाठी मुंब्रा पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन सुरू केलंय.
-
अमित शहा उद्या किल्ले रायगडवर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या किल्ले रायगडवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या पुण्यतिथी निमित्त येत आहेत. त्यानिमित्त खासदार सुनील तटकरे यांच्या गीता बाग येथील निवासस्थानी ते भेट देऊन भोजनाचा आस्वाद घेणार आहेत. शहा यांच्या दौऱ्यामुळे गीता बाग येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
नाशिक- रायगड पालकमंत्रीबाबत अमित शाहांची मध्यस्थी?
नाशिक- रायगड पालकमंत्रीबाबत अमित शाह मध्यस्थी करतील का? या प्रश्नावर गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले. केंद्रातील उच्चपदस्थ नेतृत्व पालकमंत्रीपदाबाबत चर्चा करतील, असे आपणास वाटत नाही. तटकरे साहेब खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात कार्यक्रम असल्याने योगायोगाने त्यांच्या घरी ते जेवायला जात असतील, असे ते म्हणाले.
-
वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार
वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगलेली पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हटल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः एकनाथ शिंदे आहेत. त्याच ठाण्यात गणेश नाईकांचा दुसरा जनता दरबार शुक्रवारी काशिनाथ घाणेकर या ठिकाणी घेण्यात येणार आहे.
-
गव्हर्नर हाऊसच्या जागेत स्मारक व्हावे- उदयनराजे
छत्रपती शिवाजी महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक दिल्लीत व्हावे. तसेच अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक लवकर व्हावे. त्या ठिकाणी शक्य नसेल तर गव्हर्नर हाऊसच्या जागेत स्मारक उभारण्यात यावे, अशी अपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.
-
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – अजित पवार
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत कसा मार्ग काढायचा ते ठरवू. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल, थोडा धीर धरा. धर्मादाय रुग्णालयात निधी असतो, मग ते पैसे पूजायला ठेवले आहेत का?. मंगेशकर रुग्णालयाबाबत तिसरा अहवाल अजून आलेला नाही असं अजित पवार म्हणाले.
-
ST मोफत प्रवास योजनेसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जाते – अजित पवार
कोरोनाकाळत दरमहा एसटीला आम्ही 200-250 कोटी रुपये द्यायचो. ST मोफत प्रवास योजनेसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जाते असं अजित पवार म्हणाले.
-
पूर्णा नदीच्या पाणी पातळीत घट
वाढत्या उष्णतेमुळे जळगाव जिल्ह्याच्या पूर्णा नदीच्या पाणी पातळीत घट होत चालली आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता ग्रामीण भागात वर्तवली जात आहे. पाणी जपून वापरण्याचा आव्हान स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने केले जात आहे. गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी वाढत्या उष्णतेने पूर्णा नदीच्या पाणी पातळी 10 टक्क्याने घसरल्याचं चित्र आहे.
-
फुलेवाड्यात अतिशय चांगलं स्मारक बांधायचं आहे – अजित पवार
स्मारकाच्या कामात राजकारण आणायचं नाही. स्मारकासाठी जागा सोडावी लागलेल्या लोकांच पूनर्वसन करणार. फुलेवाड्यात अतिशय चांगलं स्मारक बांधायचं आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
Published On - Apr 11,2025 8:40 AM





