Maharashtra News live : डोंबिवली एमआयडीसी स्फोट प्रकरण, मुख्य आरोपीला अटक

| Updated on: May 24, 2024 | 9:28 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 24 मे 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra News live : डोंबिवली एमआयडीसी स्फोट प्रकरण, मुख्य आरोपीला अटक

डोंबिवली MIDC दुर्घटनास्थळी एनडीआरएफच्या टीमकडून पुन्हा शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे. ढिगाऱ्याखाली काहीजण अद्यापही अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. नवी मुंबईत अनधिकृत होर्डींगविरोधी कारवाईत 34 मोठ्या होर्डींगवर निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली आहे. तर पुण्यातील NDA मध्ये आज 146 वा दीक्षांत समारोह सोहळा होणार आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये आज 146 व्या बॅचची आज पासिंग आउट परेड होणार असून पदवीदान सोहळ्यासाठी चीफ ऑफ ऑफ आर्मी स्टाफ, जनरल मनोज पांडे यांची मुख्य उपस्थिती असेल. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 24 May 2024 08:41 PM (IST)

  नागपूर हिट अँड रन प्रकरणी न्यायालयाने आरोपींचा जामीन फेटाळला

  नागपूर : मद्यधुंद अवस्थेत कार चालवून दोघांचा मृत्यू झाल्याच्या अपघात प्रकरणात ऋतिका ऊर्फ रितू दिनेश मालू यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. ही घटना २५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री घडली होती. रितू मालू आणि माधुरी शिशिर सारडा या दोघी मर्सिडीज कारने दोघी वर्धमाननगरकडे जायला निघाल्या असताना मोपेडला धडक देऊन अपघात झाला. या अपघातात मोहम्मद हुसेन आणि त्याचा मित्र मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी त्यांना जामीन मंजूर झाला होता. आज या प्रकरणांमध्ये जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली असता अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.

 • 24 May 2024 06:01 PM (IST)

  अनधिकृत पबवर कारवाई करणार- अजित पवार

  पुण्यात सुरु असलेल्या अनधिकृत पब आणि बारवर कारवाई करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

 • 24 May 2024 05:52 PM (IST)

  केरळच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा, 'ऑरेंज' अलर्ट जारी

  केरळच्या पठाणमथिट्टा, अल्लापुझा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की, कोझिकोड आणि कन्नूरमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीसाठी 'ऑरेंज' अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 • 24 May 2024 05:38 PM (IST)

  विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

  पुणे पोर्शे घटनेतील आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला मंगळवारी औरंगाबाद येथून अटक करण्यात आली होती. अटक करण्यापूर्वी विशालने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला होता.

 • 24 May 2024 05:37 PM (IST)

  भाजप-एनडीएला 5 टप्प्यात बहुमतापेक्षा जास्त जागा मिळाल्या - पंतप्रधान मोदी

  हिमाचलमधील मंडी येथे एका विशाल जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, निवडणुकांचे 5 टप्पे पार पडले आहेत आणि या 5 टप्प्यांमध्ये भाजप एनडीएला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. आता यात हिमाचलच्या 4 जागा जोडल्या गेल्या तर ते केकवर आयसिंग होईल. हिमाचल पुन्हा एकदा मोदी सरकारची हॅटट्रिक करेल आणि 400 पार करेल.

 • 24 May 2024 05:25 PM (IST)

  रशियाच्या रोस्तोव्हमध्ये अडकलेल्या 160 भारतीयांचे TV9 च्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना आवाहन

  रशियातील रोस्तोवमध्ये अडकलेल्या 160 भारतीयांनी TV9 च्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना आवाहन केले आहे. हे सर्व भारतीय वीज कंपनीत काम करतात. त्यांचे म्हणणे आहे की कंपनीने त्यांचे पासपोर्ट जप्त केले आहेत, दोन महिन्यांपासून त्यांचे पगार दिले नाहीत, त्यांना मारहाण केली आहे आणि त्यांना युक्रेनमध्ये युद्धासाठी पाठवण्याची धमकी दिली आहे.

 • 24 May 2024 05:09 PM (IST)

  दिल्लीत उद्या मतदान, तापमान 45 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता

  राजधानी दिल्लीत 25 मे रोजी मतदान होत आहे. दिल्लीत  सर्वात कडक उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्याचे तापमान 44 ते 45 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेबाबत हवामान खात्याने रेड अलर्टही जारी केला आहे.

 • 24 May 2024 04:10 PM (IST)

  पुणे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट

  पुणे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. विशाल अग्रवालने चालकाला खोटा जबाब देण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. गाडी तु चालवत होता असं पोलिसांना सांग तुला बक्षिस देऊ, असं आरोपीच्या वडिलांनी चालकाला सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच विशाल अग्रवालवर पुरावा नष्ट केल्याचं कलम लागणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

 • 24 May 2024 04:00 PM (IST)

  केजरीवाल यांच्या स्वीय सहाय्यकाला पुन्हा कोठडी

  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा स्वीय सहाय्यक विभव कुमार याला पुन्हा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तीस हजारी कोर्टाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. खासदार स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणामध्ये विभव कुमारला दिल्ली पोलिसांनी अटके केली होती.

 • 24 May 2024 03:50 PM (IST)

  डोंबिवली स्फोटप्रकरणात मुख्य आरोपी ताब्यात

  डोंबिवली कंपनी स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी मालती मेहता हिला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं.नाशिकच्या मेहेर धाम परिसरातून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

 • 24 May 2024 03:40 PM (IST)

  माजी राज्यमंत्री सुबोध सावजींवर गुन्हा दाखल

  बुलढाणा जिल्ह्यातील माजी राज्यमंत्री सुबोध सावजींवर डोणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सावजी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त यांना पत्र लिहून धमकी दिली होती. ई वी एम मशीन मध्ये घोटाळा केला तर खून करण्याची धमकी त्यांनी दिली होती

 • 24 May 2024 03:30 PM (IST)

  सायन पनवेल महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा

  एका अपघातामुळे सायन पनवेल महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. जवळपास तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. बेलापूर खिंडीत अपघात झाल्याने वाहतूक खोळंबली आहे.अपघातात एका बाईक स्वराचा मृत्यू झाला आहे.

 • 24 May 2024 03:20 PM (IST)

  पुन्हा कंपनीत ब्लास्टची भीती

  डोंबिवली ब्लास्ट प्रकरणी एक अपडेट समोर येत आहे. कंपनीत केमिकल असल्याने पुन्हा स्फोट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिसांनी कंपनीच्या आजूबाजूला जाणाऱ्या सर्वच मार्ग बंद केले आहे.कंपनीकडे येणाऱ्या रस्त्यावर पोलिसांचा पहारा आहे.

 • 24 May 2024 03:10 PM (IST)

  अजय भोसले यांचा अग्रवाल कुटुंबावर गंभीर आरोप

  जमिनीच्या वादातून अगरवाल परिवाराने गोव्यातील हॅरीस सिक्वेरा यांचा पुण्यात खून केला असा गंभीर आरोप अजय भोसले यांनी केला आहे. त्याला पुण्यात आणण्यात आला,आणि नंतर त्याचा पुण्यात संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करावी, कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये याबबत गुन्हा दाखल आहे. गोव्यातील एकूण 232 एकरचा हा वाद असल्याचे ते म्हणाले.

 • 24 May 2024 03:00 PM (IST)

  पुण्यातील अपघात प्रकरणात उबाठा आक्रमक

  पुणे शहर पोलीस आयुक्तांची तातडीने बदली करावी अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे. पुण्यातील पोर्श अपघात प्रकरणात पुणे पोलिसांची प्रतिमा मलीन झाल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. याकरीता तातडीने पुणे शहर पोलीस आयुक्तांची बदली करण्याची गरज असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणं आहे.

 • 24 May 2024 01:51 PM (IST)

  हिट अँड रन प्रकरणात खळबळजनक माहिती समोर

  अपघात झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक यांनी वरिष्ठांना कळवली नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी माहिती नियंत्रण कक्षला दिली नाही. त्या दिवशी नाईट राऊंडल असलेले संदीप गिल यांची माहिती.

 • 24 May 2024 01:24 PM (IST)

  रवींद्र धंगेकरांचा पुन्हा पुणे पोलिसांवर निशाणा

  पोलीस कर्मचाऱ्याचा पब मधला फोटो ट्विट करत रवींद्र धंगेकर यांचा गृहमंत्री फडणवीस यांना सवाल. ट्विट करत रवींद्र धंगेकर यांनी केला पोलीस कर्मचाऱ्यांचा ग्राउंड रिपोर्ट

 • 24 May 2024 01:08 PM (IST)

  अग्रवाल फॅमिलीचे पाय आणखी खोलात

  गोव्यातील एका व्यक्तीचे अपहरण करून खून केल्याच्या आरोप. जमिनीच्या वादातून पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये खून केल्याचा आरोप. शिवसेना नेत्याची पोलीस आयुक्तांकडे तक्रार.

 • 24 May 2024 01:01 PM (IST)

  गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

  कल्याणी नगर अपघात प्रकरणी रवींद्र धंगेकर यांच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र. कल्याणी नगर अपघाताची चौकशी निवृत्त न्यायाधीशामार्फत करण्याची रवींद्र धंगेकर यांची मागणी.

 • 24 May 2024 12:50 PM (IST)

  पुणे अपघातप्रकरणी पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषद

  पुण्यातील कल्याणीनगर भागातील अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का, याचा तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. पालकांनी अल्पवयीन मुलाला गाडी चालवण्यास दिली, याबाबतही तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

 • 24 May 2024 12:40 PM (IST)

  पुणे- खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतली पुणे पोलीस आयुक्तांची भेट

  पुणे- खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. कल्याणीनगर अपघातप्रकरणी मेधा कुलकर्णी हे आयुक्तांच्या भेटीला पोहोचल्या आहेत.

 • 24 May 2024 12:30 PM (IST)

  घोडबंदर घाट रस्ता दोन आठवडे बंद

  घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटातील ७०० मीटर लांब रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण केले जाणार आहे. त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना ६ जूनपर्यंत बंदी घातली आहे. अवजड वाहनांना बंदी असली तरी हलक्या वाहनांची वाहतूक मार्गावरून सुरू राहील.

 • 24 May 2024 12:20 PM (IST)

  पश्चिम रेल्वेवर ब्लॉक

  पश्चिम रेल्वेवरील विरार- वैतरणादरम्यान पायाभूत कामासाठी २४ मे रोजी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेच्या विरार- डहाणू रोड आणि डहाणू रोड- विरार लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

  २५ मे रोजी पहाटे ४.४० वाजताची डहाणू रोड- चर्चगेट लोकल, सकाळी ६.०५ वाजताची डहाणू रोड- चर्चगेट लोकल आणि पहाटे ५.२५ वाजताची डहाणू रोड - पनवेल लोकल ५० मिनिटे उशिराने पोहोचतील.

 • 24 May 2024 12:10 PM (IST)

  दादर, घाटकोपर, भांडुप, मुलुंडमध्ये आज पाणी बंद

  महापालिकेतर्फे गोरेगाव - मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत मुलुंड परिसरातील फोर्टीस रुग्णालय ते उद्योग क्षेत्रालगत असलेली १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी वळविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कारणास्तव आज शुक्रवारी सकाळी ११.३० ते शनिवार सकाळी ११.३० या वेळेत घाटकोपर, भांडुप आणि मुलुंडच्या काही भागात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

 • 24 May 2024 11:50 AM (IST)

  Live Update : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान उद्या

  लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान उद्या... राजधानी दिल्लीसह 58 जागांवर उद्या मतदानाची प्रक्रिया... ईव्हीएम मशीन मतदान केंद्रांकडे रवाना... संपूर्ण दिल्ली शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

 • 24 May 2024 11:35 AM (IST)

  Live Update : वाशी तालुक्यातील तेरखेडा फटाखा कारखान्यात स्फोट

  वाशी तालुक्यातील तेरखेडा फटाखा कारखान्यात स्फोट, एका जणाचा मृत्यू तर 1 गंभीर जखमी... गावकऱ्यांनी एकत्रीत प्रयत्न करीत मिळवला आगीवर ताबा, मोठा अनर्थ टळला... तेरखेडा येथेल संतोष फायर वर्क्स या फटाखा निर्मीतीच्या कारखान्यात सकाळी झाला स्फोट...

 • 24 May 2024 11:18 AM (IST)

  Live Update : पुणे अपघातानंतर शहरातील बार मालक,चालक आणि कर्मचाऱ्यांचे आंदोलन

  पुणे अपघातानंतर शहरातील बार मालक,चालक आणि कर्मचाऱ्यांचे आंदोलन... बार कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ... राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईच्या विरोधात आंदोलन...

 • 24 May 2024 11:06 AM (IST)

  Live Update : डोंबिवलीतील ब्लास्ट प्रकरणा, 25 वर्षीय तरूणीचा मृत्यू

  डोंबिवलीतील ब्लास्ट प्रकरणात रोहिणी कदम हिचा मृत्यू झाला आहे. तिचं वय 25 वर्ष होतं. रोहिणीच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. रोहिणीचं पुढच्या वर्षी आई वडील लग्न करणार होते. रोहिणी अंबर केमिकल कंपनीमध्ये काम करत होती.

 • 24 May 2024 10:57 AM (IST)

  Maharashtra News : नाशिकमध्ये प्लास्टिकच्या कंपनीला आग

  नाशिकच्या गवळने गावात प्लास्टिकच्या कंपनीला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत कंपनीचे कोट्यवधींचे साहित्य जळून खाक झाले. तब्बल 5 तासाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही.

 • 24 May 2024 10:45 AM (IST)

  Maharashtra News : अहमदनगर दुर्घटना अपडेट, सहावा मृतदेह मिळाला

  अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगाव येथे SDRF च्या 3 जवानांसह 3 तरूणांचा मृत्यू झाला. त्यातील पाच जणांचे मृतदेह गुरुवारी मिळाले होते. आता सहावा मृतदेहही सापडला आहे. बंधाऱ्यापासून एक किमी अंतरावर हा मृतदेह मिळाला.

 • 24 May 2024 10:27 AM (IST)

  Maharashtra News : नागपूर पोलीस आयुक्तांचे आदेश

  नागपूर पोलीस आयुक्तांनी नागपुरातील बार, पब आणि रेस्टॉरंट यांना कडक सूचना दिलेल्या आहेत. 25 वर्षाखालील तरुणांना दारू देता येत नाही. दारू देण्यापूर्वी त्यांचे वय विचारावे, असे आयुक्तांनी म्हटले आहे.

 • 24 May 2024 10:15 AM (IST)

  Maharashtra News : डोंबिवली स्फोट इतर कंपन्यांचे नुकसान

  डोंबिवलीमधील अमुदान कंपनी ब्लास्टमध्ये आजू बाजूच्या तीन ते चार कंपन्याचे नुकसान झाले आहे.  आता आम्ही घेतलेले कर्ज फेडायचे कसे? असा सवाल करत डोळ्यात अश्रू घेऊन कंपनीच्या मालकाने केला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना हा सवाल केला.

 • 24 May 2024 10:08 AM (IST)

  Maharashtra News : शिवना नदीचे पात्र कोरडे

  छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी पडली कोरडी ठाक पडली आहे. शिवना नदीचं जिल्ह्यातील 100 किलोमीटरचं पात्र पडलं कोरडं ठाक पडले आहे. कन्नडच्या डोंगरांगात उगम पावणारी शिवना नदी जायकवाडी धरणात मिळते.  सर्वात मोठ्या लांबीची नदी कोरडी ठाक पडली आहे.

 • 24 May 2024 09:56 AM (IST)

  Maharashtra News : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी कोरडी ठाक

  छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी पडली कोरडी ठाक. शिवना नदीचं जिल्ह्यातील 100 किलोमीटरचं पात्र पडलं कोरडं ठाक. कन्नडच्या डोंगरांगात उगम पावणारी शिवना नदी जायकवाडी धरणाला मिळते. सर्वात मोठ्या लांबीची नदी पडली कोरडी ठाक. शिवना नदी काठचे शेतशीवरही होरपळले.

 • 24 May 2024 09:31 AM (IST)

  Maharashtra News : अकोले तालुक्यातील सुगाव येथील बोट दुर्घटना अपडेट

  गणेश देशमुख या तरूणाचा मृतदेह सापडला. बंधा-यापासून काही अंतरावर सापडला मृतदेह. SDRF जवानांसोबत बुडालेल्या तरूणाचा मृतदेह सापडला. धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यानंतर सापडला मृतदेह. 22 तारखेला बुडालेल्या तरूणाचा मृतदेह अजूनही सापडला नाही. अर्जून जेडगुले या 18 वर्षीय तरूणाचा शोध सुरु.

 • 24 May 2024 09:30 AM (IST)

  Maharashtra News : पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची पब वर धडक कारवाई

  पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची तीन दिवसात 32 पब, बार, हॉटेलवर धडक कारवाई. धडक मोहिमेत सर्व आस्थापना केल्या सील. पुण्यात हिट अँड रन प्रकरण घडल्यानंतर प्रशासन सतर्क. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.

 • 24 May 2024 09:14 AM (IST)

  Maharashtra News : जंगलातील नेचर प्राईड आणि वॉटर पार्क वर धाड

  अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर मध्यप्रदेशात एका रिसॉर्टवर सुरू असलेल्या ओल्या पार्टीवर मध्यरात्री पोलिसांची धाड. नागपुरच्या महिलांना अश्लील नृत्य करताना पकडलं. मध्यप्रदेशच्या मूलताई पोलिसांची वॉटरपार्क मध्ये कारवाई. 34 पुरुष आणि 11 महिलांना अटक. अमरावतीच्या वरुडपासून काही अंतरावर मध्यप्रदेशच्या जंगलातील नेचर प्राईड आणि वॉटर पार्क वर धाड. पोलिसांनी अटक केल्या आरोपींमध्ये अमरावती जिल्ह्यातील वरुडमधील दोन आरोपी.

 • 24 May 2024 09:02 AM (IST)

  Dombivli MIDC Blast : विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे घटनास्थळी ठिकाणी दाखल

  विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे डोंबिवलीतील दुर्घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांच्यासोबत कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर ही उपस्थित आहेत. ब्लास्ट झालेल्या कंपनीची पाहणी करत दानवे हे पोलिसांकडून माहिती घेत आहेत.

 • 24 May 2024 08:56 AM (IST)

  बिबटयाच्या हल्ल्यात तीन वर्षीय बालिकेचा मृत्यू

  राहुरी / अहमदनगर - बिबटयाच्या हल्ल्यात तीन वर्षीय बालिका ठार झाली आहे.  राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील दुर्दैवी घटना. चिमुकली घराच्या अंगणात खेळत असताना रात्री ८ च्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला.  रुग्णालयात उपचारांदरम्यान चिमुकलीचा झाला मृत्यू.

 • 24 May 2024 08:54 AM (IST)

  अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीने मॉरिस नोरोन्हाच्या रक्षकाच्या जामीनाला दर्शवला विरोध

  शिवसेना (यूबीटी) नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करून हत्या करण्यात आली , याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा यांच्या जामीन अर्जाला तेजस्वी घोसाळकर यांनी विरोध दर्शवला आहे. स्वत:च्या सुरक्षेची चिंता व्यक्त करत त्यांनी जामीनाला विरोध केला आहे.

 • 24 May 2024 08:24 AM (IST)

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये सभा

  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज निवडणूक प्रचारात व्यस्त असतील. ते आज पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये सभा घेणार आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये त्यांची सकाळी सभा होणार असून कंगान रनौतसाठी ते मंडीमध्ये रॅली घेतील.त्यानंतर ते पंजाबमध्येही त्यांच्या सभा होणार आहेत.

 • 24 May 2024 08:13 AM (IST)

  डोंबिवली MIDC दुर्घटनाप्रकरणी कंपनीच्या मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

  डोंबिवली MIDC दुर्घटनेप्रकरणी कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालती प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published On - May 24,2024 8:12 AM

Follow us
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल.
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?.
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले.
हा रस्ता की नदी... पूर आल्यानं चिमुरड्यांसह वृद्धांचा जीवघेणा प्रवास
हा रस्ता की नदी... पूर आल्यानं चिमुरड्यांसह वृद्धांचा जीवघेणा प्रवास.