AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Breaking News LIVE : दापोलीत अंगणंवाडी सेविकांना मंत्री उदय सामंत यांचा शब्द

| Edited By: | Updated on: Jul 22, 2024 | 9:36 PM
Share

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 22 जुलै 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : दापोलीत अंगणंवाडी सेविकांना मंत्री उदय सामंत यांचा शब्द

मुंबईसह कोकणात गेल्या आठवड्याभरापासून सतत पाऊस कोसळत आहे. या तुफान पडत असलेल्या पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाने जोर धरला असून खेडमधील जगबुडी, राजापूरमधील अर्जुना, कोदवली नदीचे पाणी शहरातील चौकात शिरले आहे. तसेच भंडारा, गोंदिया, चंद्रपूरमध्ये पूरस्थिती पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 22 Jul 2024 07:30 PM (IST)

    मध्य रेल्वेची लोकल सेवा 20 ते 25 मिनिटे उशिराने

    मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिराने सुरु आहे. मुंबईहून कर्जत, खोपोली, कसाराकडे जाणारी लोकल सेवा 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरु आहे. तर मुंबईकडे जाणारी लोकल तीस ते वीस मिनिटे उशिराने आहे. त्यामुळे घरी परतताना चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहेत. तर लांब पल्ल्याच्या गाड्या तब्बल 40 मिनिटे उशिराने धावत आहेत.

  • 22 Jul 2024 07:27 PM (IST)

    गडचिरोलीत रेल्वे लाईनच्या पुलाखाली पाणी शिरल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम

    गडचिरोली देसाईगंज येथील रेल्वे लाईनच्या पुलाखाली पाणी शिरल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम पडलाय. दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागात पाणी शिरून देसाईगंज शहरातील रेल्वे पुलाखालून प्रवास धोकादायक झालाय.

  • 22 Jul 2024 06:57 PM (IST)

    मुसळधार पावसाचा कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाला फटका

    मुसळधार पावसामुळे शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. 23 आणि 24 जुलै रोजी होणाऱ्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. विद्यापीठ परिक्षेत्रामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागातील रस्ते बंद झाल्याने शिवाजी विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. स्थगित केलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करणार आहे.

  • 22 Jul 2024 06:45 PM (IST)

    विक्रोळीत पुनर्विकासाचे काम चालू असताना पायलिंग क्रेन कोसळली

    विक्रोळीत कन्नमवार नगरमधील इमारत क्र २३३ इमारतीचे पुनर्विकासाचे काम चालू असताना पायलिंग क्रेन कोसळण्याची घटना घडली. सुदैवाने रस्त्यावर असलेले एक झाड थ्री व्हीलर टेम्पोवर येऊन क्रेनचा भाग अडकला. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल पोलीस दाखल झाले आहेत. या क्रेनला साइडला करण्याचे काम सुरू आहे.

  • 22 Jul 2024 06:37 PM (IST)

    जुनी पेंशन योजनेबाबत सरकार निष्क्रिय – खासदार प्रणिती शिंदे

    जुनी पेंशन योजनेसाठी संघर्ष सुरू आहे. केंद्र सरकार यावर सिरियस नाही. उत्तरात त्यांनी नकार दिला आहे की ही लागू करता येणार नाही. अनेक राज्यांनी लागू केली आहे मग केंद्राला काय अडचण आहे. सरकारच्या या गोष्टीचा निषेध करतो. सगळ्या राज्यात ही योजना लागू झाली पाहिजे. सरकार याबाबत निष्क्रिय आहे असा आरोप खा. प्रणिती शिंदे यांनी केला आहे.

  • 22 Jul 2024 06:30 PM (IST)

    आरक्षणाच्या मुद्द्यावरील शरद पवारांची भूमिका संशयास्पद – धीरज घाटे

    अमित शहांनी केलेल्या आरोपाचे पुरावे घेऊन भाजपचे कार्यकर्ते आगामी काळात शहरातील प्रत्येक प्रभागात जागर करणार आहेत. दूध भुकटी आयात, साखर कारखान्यांच्या आयकराचा प्रश्न शरद पवारांमुळेच टांगणीवर राहिला. शिवाय आरक्षणाच्या मुद्द्यावरील शरद पवारांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केला.

  • 22 Jul 2024 06:30 PM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

    शरद पवार यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. सह्याद्री अतिथी गृहावरील बैठक संपताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सागर बंगल्यावर जावून देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. राजकीय दृष्ट्या ही भेट फार महत्वाची मानली जाते.

  • 22 Jul 2024 06:18 PM (IST)

    संत तुकाराम महाराज संस्थानाने घेतला मोठा निर्णय…

    यंदा परतीच्या प्रवासात उरुळी कांचन येथे पालखीचा मुक्काम होणार नाही असा निर्णय संत तुकाराम महाराज संस्थानाने घेतला आहे. लोणी काळभोर मधील कदमवाक वस्ती येथे पालखीतळावर तात्पुरत्या स्वरूपात परतीचा मुक्काम होणार आहे. उरुळी कांचन गावातून पालखी सोहळा विसाव्यासाठी थांबला नाही म्हणून ग्रामस्थांनी पालखी सोहळा अडवला होता. त्यामुळे देहू संस्थांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • 22 Jul 2024 06:07 PM (IST)

    विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीराजे आणि आंबेडकर सोबत येणार

    छत्रपती संभाजीराजे यांनी डॉ. राजरत्न आंबेडकर यांना राजकारणात सक्रिय होण्याचे जाहीर आवाहन केले आहे. छत्रपती संभाजीराजे आणि आंबेडकर आगामी विधानसभा निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जाऊ शकतात, याचे स्पष्ट संकेत छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या भाषणातून दिले. मुंबईमध्ये बहिष्कृत हितकारिणी सभेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

  • 22 Jul 2024 05:45 PM (IST)

    महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस, वेण्णा लेक भरला

    महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाणी महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे येथील वेण्णा लेक देखील भरुन वाहत आहे.

  • 22 Jul 2024 05:32 PM (IST)

    ओढ्यावरील फरशी पूल पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहून गेला

    सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात आणि तालुक्यात गेली 7 दिवस पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. मणदुर गावातील सम्राट अशोक नगर ओढ्यावरील फरशी पूल पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे नागरिकांसाठी पुलावरील वाहतुक बंद करण्यात आलीये.

  • 22 Jul 2024 04:52 PM (IST)

    आसामचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

    आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

  • 22 Jul 2024 04:37 PM (IST)

    सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर सपा प्रमुख अखिलेश यादव यांचा भाजपाला चिमटा

    कावड मार्गावरील भोजनालयांच्या मालकाचे नाव प्रदर्शित करण्याच्या उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारच्या निर्देशांवर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यावर सपा प्रमुख अखिलेश यादव म्हणाले, “ज्या क्षणी मला माहिती मिळाली, मी सांगितले होते की सुप्रीम कोर्टाने याची दखल घेऊन अशा कारवाया थांबवाव्यात. ज्याप्रमाणे दिवा विझण्याआधी फडफडतो, त्यामुळेच असे निर्णय घेतले जात आहेत. जातीय राजकारण संपत चालले आहे, याचे भाजपला दु:ख आहे.”

  • 22 Jul 2024 04:25 PM (IST)

    केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अर्थसंकल्पाबाबत व्यक्त केलं मत, म्हणाले..

    केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, “उद्या लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला जाईल. या अर्थसंकल्पात विकासासाठी भरघोस निधी देण्याची घोषणा केली जाईल. प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे, असे पंतप्रधान मोदींचे मत आहे. अतिशय प्रशंसनीय अर्थसंकल्प देशाचा आर्थिक आणि सामाजिक न्याय देणारा अर्थसंकल्प असेल.”

  • 22 Jul 2024 04:10 PM (IST)

    राजौरीमध्ये दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत एक जवान जखमी

    जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे सुरक्षा दलाच्या दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईत भारतीय लष्कराचा एक जवान जखमी झाला आहे. या कारवाईत एक नागरिकही जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

  • 22 Jul 2024 02:42 PM (IST)

    मोबाईल नाही मिळाला तर मी स्वतः देईन : उदय सामंत

    मंत्री उदय सामंत यांनी दापोलीत अंगणंवाडी सेविकांना शब्द दिल आहे. अंगणवाडी सेविकांना 1 महिन्यात मोबाईल मिळेल, असा शब्द सामंत यांनी दिला. तसेच मोबाईल नाही मिळाला तर मी स्वतः देईन, असं उद्य सामंत म्हणाले.

  • 22 Jul 2024 02:41 PM (IST)

    वर्षा गायकवाड यांची संसदेत मागणी

    खासदार वर्षा गायकवाड यांनी गेल्या अनेक वर्षांच्या मागणीचा उल्लेख संसदेत केला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी खासदार गायकवाड यांनी संसदेत केली.

  • 22 Jul 2024 01:35 PM (IST)

    अमरावतीत वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या विरोधात प्रहारचे आंदोलन

    पूजा खेडकर यांनी अपंगांचे खोटं प्रमाणपत्र बनवल्याचा प्रहारचा आरोप. पूजा खेडकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी.

  • 22 Jul 2024 01:14 PM (IST)

    भाजप आमदाराचा शरद पवार यांचा गंभीर आरोप

    मनोज जरांगे पाटील यांच्यामागे शरद पवार असल्याचे मोठे विधान भाजपा आमदाराने केले आहे.

  • 22 Jul 2024 01:03 PM (IST)

    अमित शहा यांच्यावर जोरदार टीका

    अमित शहा विसरले आहेत की केंद्र स्तरावरचा पद्मविभुषण पुरस्कार त्यांच्याच सरकाराने शरद पवारांना दिला आहे. अमित शहा भ्रष्टाचाराबाबत ज्यांच्या बद्दल बोलत होते ते आता त्यांच्या समवेतच आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

  • 22 Jul 2024 12:59 PM (IST)

    उत्तरप्रदेशमधील कावड यात्रा नाम फलक प्रकरणी सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं

    नवी दिल्ली- उत्तरप्रदेशमधील कावड यात्रा नाम फलक प्रकरणी सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं आहे. उत्तरप्रदेश सरकारने हा निर्णय कायदा आणि सुव्यवस्थेसाठी घेतला आहे. याचिकाकर्त्यानी त्याचा वेगळा अर्थ काढला, असं कोर्टाने म्हटलंय.

  • 22 Jul 2024 12:50 PM (IST)

    समुद्राला मोठी भरती, 4.59 मीटर उंचीच्या लाटा उसळणार

    मुंबई- समुद्राला मोठी भरती आली असून 4.59 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी 4.59 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.

  • 22 Jul 2024 12:43 PM (IST)

    का ओ फडणवीस दंगली घडवायच्यात का? – संभाजी ब्रिगेड

    पुणे- “माझ्या आदेशाची वाट पाहू नका? डायरेक्ट ठोकून काढा? ही देवेंद्र फडणवीस यांची भाषा गृहमंत्री पदाला शोभणारी नाही. कदाचित राज्याच्या गृहमंत्र्याला महाराष्ट्रात भाजपची सत्ता आणायची आहे. त्यासाठी दंगली घडविल्याशिवाय पर्याय नाही किंवा वाद घातल्याशिवाय पर्याय नाही असंच या वक्तव्यावरून कळतं. म्हणजे जे जे सरकारवर किंवा फडणवीसांवर टीका करतात त्यांना कदाचित फोडून काढण्याची भाषा देवेंद्र फडणवीस यांची असेल. हे अत्यंत दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना हे मान्य आहे का?,” असं संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता संतोष शिंदे म्हणाले.

  • 22 Jul 2024 12:40 PM (IST)

    वैद्यकीय पथकाकडून जरांगे पाटील यांच्या आरोग्याची तपासणी

    जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यांची प्रकृती हळूहळू खालावत आहे. सध्या उपोषणस्थळी वैद्यकीय पथक दाखल झालं असून या पथकाकडून जरांगे पाटील यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

  • 22 Jul 2024 12:30 PM (IST)

    माकपचे नेते नरसय्या आडम उद्धव ठाकरेंच्या भेटीला

    माकपचे नेते नरसय्या आडम उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचले आहेत. माळशिरसचे शरद पवार गटाचे उत्तम जानकरही ठाकरेंच्या भेटीला पोहोचले आहेत. दोन्ही नेते भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

  • 22 Jul 2024 12:20 PM (IST)

    उत्तर प्रदेशमधील कावड यात्रा नाम फलक प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू

    नवी दिल्ली- उत्तर प्रदेशमधील कावड यात्रा नाम फलक प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. तृणमूल खासदार मवुआ मोईत्रा यांच्यासह एका एनजीओकडून याचिका दाखल करण्यात आली. जस्टिस ऋषिकेश रॉय आणि जस्टीस एस वी एन भट्टी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे.

  • 22 Jul 2024 12:10 PM (IST)

    लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांची माझ्यावर टीका- अजित पवार

    “लाडकी बहीण योजनेवरून विरोधक माझ्यावर टीका करत आहेत. हा चुनावी जुमला असं ते म्हणतायत, पण हा जुमला नाही. शक्य तेवढं देण्याचा प्रयत्न करणार,” असं आश्वासन अजित पवारांनी दिलं.

  • 22 Jul 2024 12:01 PM (IST)

    Maharashtra News : लाडकी बहिण योजनेचे पैसे कधी मिळणार?

    “19 ऑगस्टलाच दोन महिन्याचे पैसे देण्याचा विचार. रक्षा बंधनाला जुलै-ऑगस्ट महिन्याचे पैसे देण्याचा प्रयत्न” असं अजित पवार म्हणाले. ते अहमदनगरमध्ये बोलत आहेत. “गॅस-सिलिंडर महाग झाले म्हणून दरवर्षी 3 गॅस सिलिंडरचे पैसे त्या महिलेच्या अकाऊंटवर देणार आहोत. फुलना फुलाची पाकळी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हा चुनावी जुमला नाही. मी १० वर्ष अर्थसंकल्प सादर करतोय, विचारपूर्वक प्रयत्न केला. त्याला यश मिळणार. परमेश्वर आशिर्वाद देतोय” असं अजित पवार म्हणाले.

  • 22 Jul 2024 11:55 AM (IST)

    Maharashtra News : लाडकी बहिण योजनेबद्दल अजित पवार काय म्हणाले?

    “लाडकी बहिण योजनेचे पैसे दर महिन्याला अकाऊंटमध्ये येतील. लाडकी बहिण योजनेवरुन विरोधकांनी माझ्यावर टीका केली. ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला तरी जुलैचे पैसे मिळतील. ग्रामीण, शहरी भागाच उत्पन्न वाढायलाही मदत होणार” असं अजित पवार म्हणाले.

  • 22 Jul 2024 11:40 AM (IST)

    Maharashtra News : एकनाथ शिंदे-शरद पवार भेट

    शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज 2 वाजता भेट होणार आहे. दुपारी 2 वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी शरद पवारांनीच मागितली होती भेटीची वेळ. गुंजवणी पाणी प्रश्नासाठी शरद पवार यांच्याकडून मुख्यमंत्र्यांची वेळ मागण्यात आली होती. मात्र, या बैठकीत राज्यातील विविध विषयांवर चर्चा होणार आहे. यामधील सर्वात महत्वाचा मुद्दा मराठा आरक्षण असणार आहे.

  • 22 Jul 2024 11:39 AM (IST)

    Maharashtra News : मुलुंड मध्ये हिट अँड रन

    मुलुंड मध्ये हिट अँड रन. ऑडी गाडीने दोन ऑटो रिक्षाला दिली धडक. दोन ऑटो चालक आणि दोन प्रवासी जखमी. एका ऑटो चालकाची प्रकृती गंभीर. ऑटो रिक्षाच मोठ्या प्रमाणात नुकसान. ऑडी चालक फरार. मुलुंड पोलिसांकडून गाडी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू.

  • 22 Jul 2024 10:55 AM (IST)

    Maharashtra News: सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु

    सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु… सांगलीत कृष्णा, वारणा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ… नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

  • 22 Jul 2024 10:36 AM (IST)

    Maharashtra News: पक्षासाठी नाही तर देशासाठी लढूया, सर्वपक्षीय खासदारांना आवाहन

    आता देशासाठी लढायचं हे सर्व खासदारांनी लक्षात ठेवा… भारत देश सर्वात वेगाने पुढे जाणार… आता सर्वांनी मिळून देशासाठी काम करायचंय… नव्या खासदारांना आपले विचार मांडण्याची संधी द्या… असं वक्तव्य देखील संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

  • 22 Jul 2024 10:31 AM (IST)

    Maharashtra News: संसदेचं सत्र सकारात्मक व्हावं – पंतप्रधान नरेंद्र मोदी

    आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन… संसदेचं सत्र सकारात्मक व्हावं… यंदाचं बजेट 5 वर्षांच्या कार्यकाळाची दिशा ठरवेल… 60 वर्षांनंतर पहिल्यांदाच सलग तिसऱ्यांदा सरकार…. भारत देश सर्वात वेगाने पुढे जाणार… असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

  • 22 Jul 2024 10:24 AM (IST)

    Maharashtra News: उद्धव ठाकरे – शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय हेटलाईन होत नाही – सुप्रिया सुळे

    उद्धव ठाकरे – शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय महाराष्ट्रात हेटलाईन होत नाहीत… विरोधकांना टीका करण्याचा अधिकार. विरोधक टीकाच करणार… अमित शहांची टीका हास्यास्पद…. असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

  • 22 Jul 2024 10:20 AM (IST)

    Maharashtra News: मुंबईत अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त डिजिटल बॅनरबाजी

    मुंबईत अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त डिजिटल बॅनरबाजी… दादांचं नेतृत्व हीच काळाची गरज अशा आशयाचे सर्व राज्यांत बॅनर.. दादांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून जाहिरातींवर कोट्यवधींचा खर्च…

  • 22 Jul 2024 10:06 AM (IST)

    Maharashtra News: ठाणे शहरात खड्ड्यांच साम्राज्य

    ठाणे शहरात खड्ड्यांच साम्राज्य… ऐरोली टोलनाक्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे… खड्ड्यांचा परिणाम वाहतुकीवर… खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त… खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकांना खड्डे मुक्त करण्यासाठी दिले होते आदेश…

  • 22 Jul 2024 09:59 AM (IST)

    काँग्रेस आमदार जितेश अंतापुरकर भाजपच्या गोटात?

    काँग्रेसचे आमदार जितेश अंतापुरकर भाजपच्या गोटात येणार आहे. भाजप नेते उपाध्याय यांच्या भेटीनंतर आ. अंतापुरकर यांनी भाजप खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली. त्यानंतर ते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या नांदेड जिल्ह्यात चर्चा आहे.

  • 22 Jul 2024 09:42 AM (IST)

    शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

    शरद पवार आज दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात ते चर्चा करणार आहेत.

  • 22 Jul 2024 09:21 AM (IST)

    अजित पवार यांना कार्यकर्त्याचा अनोख्या शुभेच्छा

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्याकडून अनोख्या शुभेच्छा.

    सोलापुरातील मकरंद शिवशेट्टी या कार्यकर्त्याने हातावर कायमस्वरूपी टॅटू गोंदवत अजित पवारांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

    या कार्यकर्त्याने अजित पवारांची प्रतिमा हातावर कायमस्वरूपी गोंदवली.

  • 22 Jul 2024 09:09 AM (IST)

    पवना धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ

    लोणावळ्यातील मुसळधार पावसाने घाटमाथ्यावर  असलेल्या पवना धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. आठवड्यापासून मावळ तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे. पवना धरण परिसरात ही समाधानकारक पाऊस पडला आहे.

  • 22 Jul 2024 08:17 AM (IST)

    Maharashtra News Live : कल्याण डोंबिवलीत मुसळधार, सखल भागात साचले पाणी

    Maharashtra News Live : कल्याण डोंबिवलीत मुसळधार पावसाला सुरुवात

    पहाटेपासून पावसाचा जोर वाढल्याने सखल भागात आणि रस्त्याच्या कडेला पाणी साचण्यास सुरवात

    तर कामाला जाणारे चाकरमान्यांसह शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ

    पावसाचा जोर कायम राहिला तर सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता

  • 22 Jul 2024 08:15 AM (IST)

    Maharashtra News Live : ठाण्यात मुसळधार पाऊस, नागरिकांची उडाली तारांबळ

    Maharashtra News Live : ठाण्यात मध्यरात्रीपासून रिमझिम पावसाला सुरुवात

    मात्र सकाळच्या सुमारास ढगाळ वातावरणात दमदार पावसाची हजेरी

    नागरिकांची उडाली तारांबळ

  • 22 Jul 2024 08:14 AM (IST)

    Maharashtra News Live : अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते जिजाई बंगल्यावर

    Maharashtra News Live : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस

    अजित पवार यांच्या जिजाई या निवासस्थानी कार्यकर्ते यायला सुरूवात

    अजित पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक कार्यकर्ते जिजाई बंगल्यावर पोहोचले आहेत

  • 22 Jul 2024 08:12 AM (IST)

    Maharashtra News Live : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सुनावणी लांबणीवरच

    नवी दिल्ली : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सुनावणी लांबणीवरच

    जानेवारी महिन्यापासून सुप्रीम कोर्टात सुनावणी नाही

    राज्य सरकारच्या वकिलांकडून प्रकरण मेन्शन करण्यास टाळाटाळ होत असल्याचा सीमा भागातील नागरिकांचा आरोप

    गेल्या वीस वर्षांपासून सीमा प्रश्न सुप्रीम कोर्टात प्रलंबित

  • 22 Jul 2024 08:11 AM (IST)

    Maharashtra News Live : आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

    Maharashtra News Live : नवी दिल्लीत आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या देशाचा अर्थसंकल्प मांडणार

    आज पहिल्या दिवशी लोकसभेत आणि राज्यसभेत खडा जंगी होण्याची शक्यता

    उत्तर प्रदेश मधील दुकानांवरील नावांच्या पाट्या, नीट परीक्षेचा मुद्दा घेऊन विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता

    कामकाजापूर्वी आज एनडीए आणि इंडिया आघाडीची बैठक होणार

Published On - Jul 22,2024 8:09 AM

Follow us
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.