Photo : तुझ्या डोळ्यांवर फिदा होतो पण आता…., सुसाईड नोट समोर; वाचा काय म्हटलंय आयेशाने!

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:51 PM, 6 Mar 2021
1/7
Ayesha Suicide note
अहमदाबादमधील 23 वर्षीय आयशाबद्दल बरेच नवीन खुलासे झाले आहेत. अशातच, आयशा आत्महत्या प्रकरणात आयशाच्या वडिलांनी आणि त्याच्या वकिलांनी आत्महत्येपूर्वी आयशाने आपल्या पतीच्या नावे चिठ्ठी लिहिली होती, ती चिठ्ठी न्यायालयात सादर केली आहे. आयशाने यामध्ये तिच्यावर ओढावलेलं संपूर्ण संकट कथन केलं आहे.
2/7
Ayesha Suicide note
अहमदाबादच्या साबरमती नदीत उडी मारुन आत्महत्या केलेल्या आयशाच्या व्हिडिओनंतर देशभर तिच्याविषयी चर्चा सुरू झाली. लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आयशाला न्यायाची मागणी करण्यास सुरवात केली. यानंतर पोलिस कारवाईत पुढे सरसावले. पोलिसांनी याप्रकरणी फिर्याद नोंदविली आणि आयशाचा पती आरिफ याला राजस्थानच्या पाली येथून अटक केली.
3/7
Ayesha Suicide note
दरम्यान, शनिवारी आरिफच्या आत्महत्येप्रकरणी रिमांड संपल्यानंतर आरिफला हजर केले असता, आयशाच्या वडिलांचे वकील जफर पठाण यांनी आयशाने लिहिलेले पत्र न्यायालयात सादर केले. ज्यात तिने लिहिलं होतं की तुझ्या नाकाम कर्तृत्वाला लपवण्यासाठी तू माझं नाव आसिफशी जोडलं. आसिफ माझा खूप चांगला मित्र आहे. आणि भाऊ देखील आहे.
4/7
Ayesha Suicide note
आयशाने लिहिले की तू मला 4 दिवस खोलीत बंद केले होते, ना मला अन्न नव्हते, पाणी नव्हते आणि त्यावेळी मी गरोदर होते. तरीही तू मला मदत करायला आला नाहीस आणि मी आला तेव्हा मला खूप मारहाण केली ज्यामुळे माझा छोटा आरु आसिफ मरण पावला, आता मी त्याच्याकडे जात आहे.
5/7
Ayesha Suicide note
या पत्रात आयशा पुढे असेही लिहिली आहे की मी तुला कधी फसवले नाही, तू हसत खेळत दोन जीवांचा नाश केलास. आय लव्ह यू कूकू... मी चुकीचे नव्हते... तुझा स्वभाव चुकला... मी तुझ्या डोळ्यांवर फिदा होते.. पण मी हे पुढच्या जन्मात सांगू शकेल? असं म्हणत ती पुढे म्हणते लव्ह यू.. तुझी बायको आयशा आरिफ...
6/7
Ayesha Suicide note
इकडे आरिफचा तीन दिवसांचा रिमांड संपल्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. पोलिसांनी कोर्टात सांगितले की, त्यांच्याकडे आता आरिफविरूद्ध पुरावे आहेत, यामुळे त्यांना आरिफची पोलिस कोठडी नको आहे आणि कोर्टाने आरिफला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
7/7
Ayesha Suicide note
यासह या आत्महत्येप्रकरणी चौकशी करणाऱ्या रिव्हर फ्रंट पोलिसांना आयशा आणि आरिफ दोघांचे मोबाईल मिळाले आहेत. आता पोलिसांना हे पत्र देखील प्राप्त झाले आहे, न्यायालयीन तपासणीनंतर दोषारोपपत्र दाखल केले जाईल.