कार्तिक आर्यन याचा शहजादा हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आज रिलीज झालाय. या चित्रपटामुळे कार्तिक गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत होता. शहजादा हा चित्रपट जबरदस्त असल्याचे सांगितले जातंय.
1 / 5
चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून कार्तिक आर्यन याच्या शहजादा या चित्रपटाची वाट पाहात होते. पठाण चित्रपट देखील सध्या बाॅक्स आॅफिसवर धमाका करतोय.
2 / 5
शहजादा चित्रपट रिलीज झाल्यानंतर कार्तिक आर्यन हा आज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात पोहचला. यावेळीचे काही फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
3 / 5
शहजादा चित्रपट बघितल्यानंतर कार्तिक आर्यन याचे काैतुक अर्जुन कपूर याने केले आणि हा चित्रपट फुल पैसा वसूल असल्याचे देखील अर्जुन कपूर याने म्हटले आहे.
4 / 5
कार्तिक आर्यन याला शहजादा या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा आहेत. मात्र, सध्या पठाण चित्रपटाची जादू बाॅक्स आॅफिसवर दिसत आहे. याचा काय फटका कार्तिक आर्यन याच्या चित्रपटाला बसतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.