PHOTO : वजन कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी ‘हे’ 4 खास पेय प्या आणि वजन कमी करा

वजन कमी करण्यासाठी नियमित आहार आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. वजन न वाढण्याकरिता, लोक कार्बचे सेवन मर्यादित ठेवतात. आज आम्ही तुम्हाला काही खास पेय सांगणार आहोत.

1/5
Weight Loss 1
वाढलेले वजन
2/5
Weight Loss 2
आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी दालचिनी अत्यंत फायदेशीर आहे. त्यात अँटिऑक्सिडेंट आणि दाहक गुणधर्म आहेत. हे आपले चयापचय वाढविण्यात मदत करते. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत मिळते. दालचिनीचे पाणी जर आपण दररोज पिले तर शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत होते.
3/5
Weight Loss
वजन कमी करण्यासाठी मेथीचा चहा खूप फायदेशीर आहे. मेथीचा चहा घरी तयार करण्यासाठी आपल्याला आठ ते दहा मेथी घ्याव्या लागतील. त्यानंतर एक ग्लास पाण्यात मेथी उकळून घ्या आणि हे पाणी गाळून घेऊन प्या. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते.
4/5
Weight loss drinks
वजन कमी करण्यासाठी काकडी आणि ओव्याचे पाणी पिणे फायदेशीर आहे. हे आपला चयापचय वाढविण्यात मदत करते. जर नियमितपणे रात्री झोपण्याच्या अगोदर आपण काकडी आणि ओव्याचे पाणी पिले तर चरबी कमी होते. काकडीत खूप कमी कॅलरी असतात. यात व्हिटॅमिन ए, बी आणि केसारखे पोषक घटक असतात.
5/5
tea 1
जवस खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहे. दररोज जवसाचा आहारात समावेश केला तर आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. एक चमचा जवस, एक चमचा लिंबाचा रस मिक्स करा आणि कढईत एक ग्लास पाणी मिक्स करून उकळायला ठेवा आणि गरम प्या.