शिवरायांच्या सन्मानासाठी सुट्टीच्या दिवशी मुंबईकर रस्त्यावर, मुंबईत भगवं वादळ; जयघोषाने गेटवे परिसर दुमदुमला

यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे महाविकासआघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते.

| Updated on: Sep 01, 2024 | 3:20 PM
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यांत कोसळल्यानंतर महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकासआघाडीचे नेते आज रस्त्यावर उतरले.

1 / 8
महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून रविवारी 1 सप्टेंबर रोजी 'जोडे मारा' आंदोलनाची हाक देण्यात आली होती. यावेळी मुंबईतील हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत महाविकासाआघाडीकडून मोर्चा काढण्यात आला.

2 / 8
त्यानंतर गेट वे ऑफ इंडिया परिसरात मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करत 'जोडे मारा' आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे महाविकासआघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते.

3 / 8
या आंदोलनसाठी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा स्वाभिमान… त्यांचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही, असं म्हणत महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

4 / 8
यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष केला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत हुतात्मा चौकापासून शेकडो कार्यकर्ते गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झाले.

5 / 8
या पार्श्वभूमीवर आज हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुंबईत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांकडून  बॅरिकेटींग करण्यात आली.

6 / 8
तसेच मोठ्या प्रमाणात फौजफाटाही तैनात करण्यात आला. तसेच हुतात्मा चौकापासून गेट ऑफ इंडियापर्यंतचा परिसर नो पार्किंग झोन करण्यात आला होता. त्यासोबतच पर्यटकांसाठी गेट वे ऑफ इंडिया बंद करण्यात आले होते.

7 / 8
यावेळी शिवरायांच्या सन्मासाठी सुट्टीच्या दिवशी मुंबईकर रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे मुंबईत भगवं वादळ पाहायला मिळालं. यावेळी जय जय, जय जय, जय शिवाजीच्या अशा घोषणाही करण्यात आला. त्यामुळे गेटवे परिसर दुमदुमला.

8 / 8
Follow us
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.