लेकीच्या हातावर मेहंदी खुलली, हळदी समारंभातही सप्तरंगाची उधळण, राऊतांच्या कन्येचं उद्या लगीन

29 तारखेला लग्न होणार असल्यामुळे पूर्वीशी राऊत यांची लगबग सुरु आहे. हातावर मेहंदी काढण्यात त्या व्यस्त आहेत. त्यांच्या दोन्ही हातांवर अतिशय आकर्षक अशी मेहंदी काढण्यात आलीय.

1/7
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत सध्या आपली मुलगी पूर्वशी राऊतच्या लग्नसोहळ्यात व्यस्त आहेत. पूर्वशी राऊत यांचे लग्न राज्यात चर्चेचा विषय ठरलाय. पूर्वशी राऊत उद्या (29 नोव्हेंबर) विवाहबंधनात अडकणार आहेत.

2/7
या पार्श्वभूमीवर राऊत परिवार संगीत सोहळा, हळदी समारंभ अशा वेगवेगळ्या कार्यक्रमात दंग आहे. या लग्नसोहळ्याआधीचा संगीत सोहळा, मेहंदी कार्यक्रम तसेच हळदी समारंभाचे काही फोटो सध्या समोर आले आहेत.

3/7
ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी राऊत यांची कन्या पूर्वशी यांचा विवाह होणार आहे. या लग्नसोहळ्यानिमित वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. आज (28 नोव्हेंबर) हरहुन्नरी शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

4/7
या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक मान्यवर हजर होते. यावेळी संजय राऊत यांनी सुप्रिया सुळे यांच्यासोबत डान्सदेखील केला.

5/7
राहुल देशपांडे यांच्या गायन कार्य्रमात नियोजित वधू आणि वराची ही जोडी मोठ्या उत्साहात बसली होती. पूर्वशी राऊत आणि मल्हार नार्वेकर यांनी उंची कपडे परिधान करून शास्त्रीय संगीताचा आनंद लुटला.

6/7
पूर्वशी राऊत आणि मल्हार नार्वेकर ही जोडी अगदीच आनंदात दिसत आहे. हळदी समारंभादरम्यान त्यांच्या चेहऱ्यावरील हसू स्पष्टपणे दिसत आहे.

7/7
29 तारखेला लग्न होणार असल्यामुळे पूर्वीशी राऊत यांची लगबग सुरु आहे. हातावर मेहंदी काढण्यात त्या व्यस्त आहेत. त्यांच्या दोन्ही हातांवर अतिशय आकर्षक अशी मेहंदी काढण्यात आलीय.
29 तारखेला लग्न होणार असल्यामुळे पूर्वीशी राऊत यांची लगबग सुरु आहे. हातावर मेहंदी काढण्यात त्या व्यस्त आहेत. त्यांच्या दोन्ही हातांवर अतिशय आकर्षक अशी मेहंदी काढण्यात आलीय.

Published On - 5:25 pm, Sun, 28 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI