पाकिस्तान सध्या आर्थिक संकटात आहे. कंगाल हालतमध्ये असलेल्या पाकिस्तानच्या मदतीसाठी एका देशाने आपला खजिना उघडला आहे. मिळणार इतकी मदत.
किंग सलमान मानवी सहायता आणि मदत केंद्राने पाकिस्तानच्या वेगवेगळ्या संस्थांसोबत 4 अब्ज डॉलरच्या सार्वजनिक सुविधा प्रकल्पांवर स्वाक्षरी केलीय.
पाकिस्तानला पुन्हा एकदा सौदी अरेबियाकडून मदत मिळणार आहे. पाकिस्तानला दरवर्षी सौदी अरेबियाकडून अब्जावधी डॉलर्सची मदत मिळते.
नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या समुदायाच्या पुनर्निर्माणासाठी KS रिलीफकडून हा पैसा देण्यात येईल. सौदी अरेबियाने याआधी सुद्धा पाकिस्तानला अशा प्रकारची मदत केलीय.
सौदीच KS रिलीफ ही जगातील सर्वात मोठी सामाजिक कार्यासाठी मदत करणारी संघटना आहे. ही मदत घेणारा पाकिस्तान पाचवा मोठा लाभार्थी देश आहे. मागच्या काही वर्षात पाकिस्तानने भीषण पूर संकटांचा सामना केलाय. आर्थिक संकटात अडकलेल्या पाकिस्तानला यातून बाहेर येणं शक्य नाहीय. त्यामुळे त्यांना सौदी अरेबियाच्या मदतीची आवश्यकता आहे.