AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानने कसोटीत भारताचा विक्रम काढला मोडीत, झालं असं की…

पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना पाकिस्तानने 127 धावांनी खिशात घातला. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने एक दुर्मिळ विक्रम आपल्या नावावर केला आहे.

| Updated on: Jan 20, 2025 | 3:13 PM
Share
पहिल्या कसोटीत पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने पहिल्या डावात 230 धावा केल्या आणि वेस्ट इंडिजला 137 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर पाकिस्तानचा दुसरा डावा 157 धावांवर आटोपला आणि विजयासाठी 251 धावांचं आव्हान दिलं. वेस्ट इंडिजला सर्वबाद 123 धावा करता आल्या आणि 127 पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

1 / 6
पहिल्या कसोटी सामन्यातील विशेष बाब अशी की, सर्वच्या सर्व 20 विकेट पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी घेतल्या. पहिल्या डावात साजिद खान (4), नोमान अली (5) आणि अबरार अहमद (1) या फिरकीपटूंनी मिळून 10 बळी घेतले. दुसऱ्या डावात साजिद खान (5), अबरार अहमद (4) आणि नोमान अली (1) यांनी मिळून 10 बळी घेतले.

2 / 6
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकाच सामन्यात फिरकीपटूंनी सर्वाधिक बळी घेण्याचा विश्वविक्रम पाकिस्तान संघाच्या नावावर झाला आहे. यापूर्वी हा सर्वात मोठा विक्रम भारतीय संघाच्या नावावर होता. पण आता पाकिस्तानने त्यावर कब्जा मिळवला आहे.

3 / 6
1973 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी पहिल्यांदा 20 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर 1976 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध अशीच कामगिरी केली. 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत टीम इंडियाच्या फिरकीपटूंनी 20 विकेट घेतल्या होत्या. यानंतर 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 20 विकेट घेत भारतीय फिरकीपटू चांगली कामगिरी केली होती. टीम इंडियाच्या फिरकीपटूंनी कसोटी क्रिकेटमध्ये 4 वेळा 20 बळी घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केली  आहे.

4 / 6
आता हा विक्रम मोडण्यात पाकिस्तान संघाला यश आले आहे. 1980 मध्ये पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्यांदा 20 विकेट घेतल्या होत्या. यानंतर त्याने 1987 मध्ये इंग्लंडविरुद्ध, 2024 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये 40 विकेट घेतल्या होत्या. आता 2025 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धही पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी अशी कामगिरी केली आहे.

5 / 6
पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 5 वेळा 20 विकेट घेत एक नवा विक्रम रचला आहे. पाकिस्तानमध्ये खेळल्या गेलेल्या गेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये एकाही वेगवान गोलंदाजाने एकही बळी घेतलेला नाही. हा देखील एक विक्रमच आहे.

6 / 6
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.