AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : ‘सगळ्यात जास्त जेतेपद ते गोलमास्टर…’ वाचा यूरो कपचा 60 वर्षाचा रेकॉर्ड आणि इतिहास

युरोपियन फुटबॉलच्या सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धाला आज सुरुवात होत आहे. इटली विरुद्ध तुर्की या मॅचने युरो चषकाला आजपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच 11 देशांतील 11 शहरांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. (UEFA Euro 2020 most titles Goals And record)

| Edited By: | Updated on: Jun 11, 2021 | 11:23 AM
Share
युरोपियन फुटबॉलच्या सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धाला आज सुरुवात होत आहे. इटली विरुद्ध तुर्की या मॅचने युरो चषकाला आजपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच 11 देशांतील 11 शहरांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दर चार वर्षांनी आयोजित केली जाणारी ही स्पर्धा फ्रान्समध्ये प्रथम 1960 मध्ये आयोजित केली गेली होती. सोव्हिएत युनियनने पहिलं जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर आतापर्यंत 15 वेळा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं. आता 16 व्या मोसमापूर्वी स्पर्धेचा इतिहास आणि मोठ्या विक्रमांबद्दल आपण जाणून घेऊया...

1 / 5
युरो चषकात आतापर्यंत 10 वेगवेगळ्या संघांनी विजेतेपद जिंकले आहे, परंतु आतापर्यंत सर्वांत जास्त वेळा जर्मनी आणि स्पेनने करंडक आपल्या नावे केलाय. आतापर्यंत 3-3 वेळा दोन्ही संघ चॅम्पियन बनले आहेत. 1972, 1980 आणि 1996 मध्ये जर्मनीने विजेतेपद जिंकले. दुसरीकडे स्पेनने 1964, 2008 आणि 2012 मध्ये विजेतेपद मिळविलं.

2 / 5
स्पेन हा युरोपमधील एकमेव देश आहे, ज्याने सलग दोन वेळा विजेतेपद पटकावलं .2008 मध्ये चॅम्पियन बनल्यानंतर स्पेन संघाने 2012 मध्ये दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकून इतिहास रचला. परंतु 2016 साली स्पेनला हॅटट्रिक करता आली नाही.

3 / 5
या दोन संघांव्यतिरिक्त फ्रान्सने दोन वेळा जेतेपद जिंकलं आहे. तर सोव्हिएत युनियन, इटली, चेकोस्लोवाकिया, नेदरलँड्स, डेन्मार्क, ग्रीस आणि पोर्तुगाल यांनी प्रत्येकी एकदा विजेतेपद जिंकले आहे. युरो कपची गतविजेती टीम पोर्तुगाल आहे, ज्या संघाने 2016 मध्ये जेतेपद जिंकलं होतं.

4 / 5
स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम दोन महान खेळाडूंच्या नावावर आहे. फ्रान्सचा महान अॅटॅकर मिशेल प्लॅटिनी आणि पोर्तुगालचा दिग्गज कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनी 9-9 गोल नोंदवले आहेत. प्लॅटिनीने तर 1984 मध्ये सर्व 9 गोल केले, जो एक विक्रम आहे.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.