AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia cup 2025 IND vs SL Super 4 Score and Updates : टीम इंडियाचा सुपर ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर विजय, श्रीलंका पराभूत

| Updated on: Sep 27, 2025 | 2:47 AM
Share

Asia cup 2025 India vs Sri Lanka Super 4 Super Over Match Score and Highlights and Updates in Marathi: आशिया कप 2025 स्पर्धेत टीम इंडियाने विजयी षटकार मारला आहे. सुपर 4 फेरीतील शेवटचा सामना टीम इंडियाने सुपर ओव्हरमध्ये जिंकला. आता अंतिम फेरीत पाकिस्तानशी सामना होणार आहे.

Asia cup 2025 IND vs SL Super 4 Score and Updates : टीम इंडियाचा सुपर ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर विजय, श्रीलंका पराभूत
Super Over CricketImage Credit source: Icc X account

भारताने आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीतील शेवटच्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला. पण टीम इंडियाला हा विजय मिळवण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागला. टीम इंडियाने विजयासाठी 203 धावांचं मोठं आव्हान दिलं होतं. पण श्रीलंकेने हा सामना बरोबरीत सोडवला. त्यामुळे या सामन्याच्या निकालासाठी सुपर ओव्हर करावी लागली. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेचे काही चाललं नाही. आतापर्यंत सुपर ओव्हरचा भारताचा रेकॉर्ड पाहता एकही सामना गमावलेला नाही. त्यात श्रीलंकेने फक्त 2 धावा केल्या आणि विजयासाठी 3 धावांचं आव्हान दिलं. भारताने हे आव्हान पहिल्याच चेंडूवर पूर्ण केलं. टीम इंडियाने यासह या स्पर्धेतील विजयी झंझावाता कायम ठेवला. भारताने यासह सलग सहावा विजय साकारला. आता टीम इंडिया रविवारी 28 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध अंतिम सामन्यात भिडणार आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 27 Sep 2025 02:45 AM (IST)

    IND vs SL Super 4 Live Updates : पाथुम निसांका मॅन ऑफ द मॅच

    टीम इंडियाने सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला. मात्र मॅन ऑफ द मॅच पुरस्कार श्रीलंकेच्या खेळाडूला देण्यात आला. या सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या ओपनर पाथुम निसांका याचा सामनावीर पुरस्काराने गौरव करण्यात आला. पाथुमने 107 धावा केल्या. पाथुमचं हे त्याच्या टी 20i कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक ठरलं.  तसेच पाथुम टी 20i आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात शतक करणारा श्रीलंकेचा पहिला तर एकूण तिसरा फलंदाज ठरला.

  • 27 Sep 2025 12:33 AM (IST)

    IND vs SL Super 4 Live Updates : सुपर ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर टीम इंडियाचा विजय

    टीम इंडियाने सुपर ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर तीन धावा काढल्या आणि विजय मिळवला. यासह भारताने विजयी षटकार मारला आहे. एकही सामना न गमावता टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली आहे. भारताने 20 षटकात 5 गडी गमवून 202 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाटी 203 धावांचं आव्हान दिलं होतं. श्रीलंकेने 20 षटकात 5 गडी गमवून 202 धावा केल्या. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. ् श्रीलंकेची पहिल्याच चेंडूवर विकेट गेली.  त्यानंतर दुसरा चेंडूवर एक धावा आली. तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडू वाईड, पुन्हा निर्धाव चेंडू आणि पाचव्या चेंडूवर विकेट आली. श्रीलंकने दोन धावा काढत विजयासाठी 3 धावा दिल्या. भारताने हे आव्हान पहिल्याच चेंडूवर पूर्ण केलं.

  • 27 Sep 2025 12:21 AM (IST)

    IND vs SL Super 4 Live Updates : सुपर ओव्हरमध्ये अवघ्या 2 धावांवर श्रीलंकेचा खेळ संपला

    सुपर ओव्हरमध्ये अवघ्या 2 धावांवर श्रीलंकेचा खेळ संपला. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी 3 धावांचं आव्हान आहे. चौथ्या चेंडूवर विकेटसाटी अपील केलं गेलं आणि पंचांनी बाद दिलं होतं. पण रिव्ह्यूत नाबाद झाला. पण पाचव्या चेंडूवर पुन्हा विकेट गेली.

  • 27 Sep 2025 12:17 AM (IST)

    IND vs SL Super 4 Live Updates : सुपर ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर विकेट

    सुपर ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर विकेट मिळाली. कुसल परेरा हा खातं न खोलताच बाद झाला. त्यामुळे आता श्रीलंकेकडे एकच विकेट शिल्लक राहिली आहे.

  • 27 Sep 2025 12:16 AM (IST)

    IND vs SL Super 4 Live Updates : सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेची प्रथम फलंदाजी

    सुपर ओव्हरमध्ये सामन्याचा निकाल लागणार आहे. प्रथम श्रीलंका फलंदाजी करणार आहे. तर भारतीय संघ धावांचा पाठलाग करणार आहे. अर्शदीप सिंगकडे षटक सोपवलं आहे.

  • 27 Sep 2025 12:11 AM (IST)

    IND vs SL Super 4 Live Updates : सामना बरोबरीत सुटला

    भारताने 202 धावा केल्या आणि विजयासाठी 203 धावा दिल्या होत्या. धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने 202 धावा केल्या आणि सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे आता फैसला सुपर ओव्हरमध्ये लागणार आहे.

  • 27 Sep 2025 12:05 AM (IST)

    IND vs SL Super 4 Live Updates : श्रीलंकेला पाचवा धक्का, पाथुम निस्संका बाद

    हर्षित राणाचा चेंडूवर निस्संका बाद झाला. वरुण चक्रवर्तीने त्याचा झेल घेतला. 58 चेंडूत 107 धावा करून बाद झाला.

  • 26 Sep 2025 11:53 PM (IST)

    IND vs SL Super 4 Live Updates : पाथुम निस्संकाची शतकी खेळी

    पाथुम निस्संकाने भारतीय गोलंदाजांची पिसं काढली. 203 धावांचा पाठलाग करताना शतकी खेळी केली. 52 चेंडूत 7 चौकार आणि 6 षटकार मारत शतक पूर्ण केलं.

  • 26 Sep 2025 11:52 PM (IST)

    IND vs SL Super 4 Live Updates : श्रीलंकेला चौथा झटका, कामिंदू तंबूत

    श्रीलंकेला कामिंदू मेंडिसच्या रुपाने चौथा धक्का बसला आहे. अवघ्या तीन धावा करून तंबूत परतला आहे. अर्शदीप सिंगने त्याची विकेट काढली.

  • 26 Sep 2025 11:42 PM (IST)

    IND vs SL Super 4 Live Updates : श्रीलंकेला तिसरा झटका, कॅप्टन चरिथ असलंका आऊट

    टीम इंडियाने श्रीलंकेला तिसरा झटका दिला आहे. कुलदीप यादव याने श्रीलंकेचा कॅप्टन चरिथ असलंका याला आऊट केलं आहे. चरिथने 5 धावा केल्या आणि मैदानाबाहेरचा रस्ता धरला.

  • 26 Sep 2025 11:41 PM (IST)

    IND vs SL Super 4 Live Updates : श्रीलंकेला विजयासाठी 30 बॉलमध्ये 46 रन्सची गरज, टीम इंडिया रोखणार?

    श्रीलंकेने 203 धावांचा पाठलाग करताना 15 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 157 धावा केल्या आहेत. त्यामुळे श्रीलंकेला विजयासाठी 30 बॉलमध्ये आणखी 46 रन्सची गरज आहे. पाथुम निसांका 93 तर कॅप्टन चरिथ असलंका 5 धावांवर नाबाद खेळत आहेत.

  • 26 Sep 2025 11:29 PM (IST)

    IND vs SL Super 4 Live Updates : वरुण चक्रवर्तीने पाथुम निसांका-कुसल परेरा सेट जोडी फोडली, श्रीलंकेला दुसरा झटका

    टीम इंडियाचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याने डोकेदुखी ठरत असलेली पाथुम निसांका-कुसल परेरा ही सेट जोडी फोडून श्रीलंकेला दुसरा झटका दिला आहे. विकेटकीपर संजू सॅमसन याने कुसल परेरा याला वरुणच्या बॉलिंगवर स्टंपिंग केलं. यासह कुसलच्या खेळीचा शेवट झाला. कुसलने 58 धावा केल्या.

  • 26 Sep 2025 11:14 PM (IST)

    IND vs SL Super 4 Live Updates : पाथुम निसांका आणि कुसल परेरा जोडीची दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी, श्रीलंका जिंकणार?

    पाथुम निसांका आणि कुसल परेरा या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेला 7 धावांवर पहिला झटका दिला. हार्दिकने कुसल परेरा याला झिरोवर आऊट केलं. त्यानंतर पाथुम निसांका आणि कुसल परेरा या जोडीने टीम इंडियाच्य़ा गोलंदाजांची धुलाई करत दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे. त्यामुळे आता श्रीलंका इथून जिंकणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

  • 26 Sep 2025 11:04 PM (IST)

    IND vs SL Super 4 Live Updates : पाथुम निसांका आणि कुसल परेरा जोडीची फटकेबाजी, टीम इंडिया बॅकफुटवर

    टीम इंडियाने श्रीलंकेला 7 धावांवर पहिला झटका देत चांगली सुरुवात केली. मात्र त्यानंतर पाथुम निसांका आणि कुसल परेरा या जोडीने टीम इंडियाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. या जोडीने 8 ओव्हरमध्ये 89  धावा केल्या आहेत. तसेच पाथुमने 25 बॉलमध्ये अर्धशतकही पूर्ण केलं. पाथुम यासह टी 20I क्रिकेटमध्ये श्रीलंकेसाठी सर्वात वेगवान अर्धशतक करणारा पहिला  फलंदाज ठरला. त्याुळे आता श्रीलंकेला विजयासाठी 72 बॉलमध्ये 114 धावांची गरज आहे.

  • 26 Sep 2025 10:45 PM (IST)

    IND vs SL Super 4 Live Updates : श्रीलंकेच्या 4 ओव्हरनंतर 1 आऊट 45 धावा, टीम इंडिया दुसऱ्या विकेटच्या शोधात

    श्रीलंकेने 203 धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया विरुद्ध पावर प्लेच्या पहिल्या 4 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 45 धावा केल्या आहेत. पाथुम निसांका 30 आणि कुसल परेरा 14 धावांवर नाबाद खेळत आहेत. तसेच कुसल मेंडीस याला भोपळाही फोडता आला नाही. हार्दिक पंड्या याने कुसलला गोल्डन डक केलं.

  • 26 Sep 2025 10:24 PM (IST)

    IND vs SL Super 4 Live Updates : श्रीलंकेला पहिला धक्का, कुसल मेंडिस बाद

    श्रीलंकेला कुसल मेडिसच्या रुपाने पहिला धक्का बसला आहे. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर शुबमनने झेल पकडला.

  • 26 Sep 2025 10:22 PM (IST)

    IND vs SL Super 4 Live Updates : पाथुम निस्संका आणि कुसल मेंडिस जोडी मैदानात

    भारताने विजयासाठी दिलेल्या 203 धावांचं आव्हान गाठण्यासाठी पाथुम निस्संका आणि कुसल मेंडिस जोडी मैदानात आली आहे.हार्दिक पांड्याच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारत सुरुवात केली आहे.

  • 26 Sep 2025 10:00 PM (IST)

    IND vs SL Super 4 Live Updates : तिलक वर्माचं अर्धशतक हुकलं

    तिलक वर्माने आक्रमक खेळी करत मधल्या फेरीत डाव सावरला. संजू सॅमसनसोबत मधल्या फळीत चांगली कामगिरी केली. पण त्याचं अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकलं. त्याला संधी होती पण संधीचं सोन करू शकला नाही. त्याने 34 चेंडूत 4 चौकार आणि एक षटकार मारत नाबाद 49 धावा केल्या.

  • 26 Sep 2025 09:59 PM (IST)

    IND vs SL Super 4 Live Updates : टीम इंडियाचं श्रीलंकेसमोर 203 धावांचं आव्हान

    टीम इंडियाने सुपर 4 फेरीतील शेवटच्या सामन्यात श्रीलंकेसमोर धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाने 20 षटकात 5 गडी गमवून 202 धावा केल्या. तसेच विजयासाठी 203 धावांचं आव्हान दिलं. यासह टीम इंडिया आता श्रीलंकेला रोखणार का? आणि एकही सामना न गमवता अंतिम फेरी गाठणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

  • 26 Sep 2025 09:47 PM (IST)

    IND vs SL Super 4 Live : टीम इंडियाच्या 18 ओव्हरनंतर 179 धावा, 200 पार पोहचणार?

    टीम इंडियाने 18 ओव्हरनंतर श्रीलंकेविरुद्ध 5 विकेट्स गमावून 179 धावा केल्या आहेत. तिलक वर्मा आणि अक्षर पटेल ही जोडी मैदानात खेळत आहे. त्यामुळे आता टीम इंडिया 200 धावा पूर्ण करणार की नाही? हे 12 बॉलनंतर स्पष्ट होईल.

  • 26 Sep 2025 09:38 PM (IST)

    IND vs SL Super 4 Live : भारताला पाचवा झटका, हार्दिक पंड्या आऊट

    श्रीलंकेने टीम इंडियाला पाचवा झटका दिला आहे. हार्दिक पंड्या आऊट झाला आहे. पंड्याने 3 बॉलमध्ये 2 रन्स केल्या. पंड्या आऊट झाल्यानंतर आता मैदानात ऑलराऊंडर अक्षर पटेल मैदानात आला आहे.

  • 26 Sep 2025 09:33 PM (IST)

    IND vs SL Super 4 Live : टीम इंडियाला चौथा झटका, संजू सॅमसन आऊट, हार्दिक पंड्या मैदानात

    श्रीलंकेने टीम इंडियाला चौथा झटका दिला आहे. श्रीलंकेने सेट संजू सॅमसन याला आऊट केलं आहे. दासून शनाका याने संजू सॅमसन याला 39 धावांवर कॅप्टन चरिथ असलंका याच्या हाती कॅच आऊट केलं आहे.

  • 26 Sep 2025 09:28 PM (IST)

    IND vs SL Super 4 Live : टीम इंडियाच्या 15 ओव्हरनंतर 150 धावा पूर्ण, संजू-तिलक सेट

    टीम इंडियाने 10 च्या रनरेटने धावा करत 15 ओव्हरमध्ये 150 धावा पूर्ण केल्या आहेत. तिलक वर्मा आणि संजू सॅमसन या जोडीने चौथ्या विकेटसाठी 55 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली आहे. संजू आणि तिलक दोघेही 33 धावांवर नाबाद खेळत आहेत.

  • 26 Sep 2025 09:18 PM (IST)

    IND vs SL Super 4 Live : संजू सॅमसन आणि तिलक वर्मा जोडी जमली, टीम इंडिया चांगल्या स्थितीत

    शुबमन, सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा यांच्या रुपात टीम इंडियाने 3 विकेट्स गमावल्या. त्यानंतर तिलक वर्मा आणि संजू सॅमसन या जोडीने टीम इंडियाचा डाव सावरला आहे. टीम इंडियाने 13 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 133 धावा केल्या आहेत. तसेच तिलक आणि संजू या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 26 बॉलमध्ये नॉट आऊट 41 रन्सची पार्टनरशीप केली आहे.

  • 26 Sep 2025 09:00 PM (IST)

    IND vs SL Super 4 Live : अभिषेक शर्मा बाद, भारताला तिसरा झटका, पुन्हा शतक संधी गमावली

    टीम इंडियाने तिसरी विकेट गमावली आहे. शुबमन गिल, कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्यानंतर अभिषेक शर्मा आऊट झाला आहे. अभिषेकने 31 बॉलमध्ये 61 रन्स केल्या. अभिषेकने यासह सलग तिसऱ्यांदा शतक करण्याची संधी गमावली. अभिषेकने गेल्या 2 सामन्यांमध्ये अनुक्रमे 74 आणि 75 धावा केल्या होत्या.

  • 26 Sep 2025 08:53 PM (IST)

    IND vs SL Super 4 Live : कॅप्टन सूर्यकुमार यादव आऊट, भारताला दुसरा धक्का

    श्रीलंकेने टीम इंडियाला दुसरा आणि मोठा झटका दिला आहे. वानिंदू हसरंगा याने भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याला सातव्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर एलबीडब्ल्यू आऊट केलं आहे. सूर्याने 13 बॉलमध्ये 12 रन्स केल्या.

  • 26 Sep 2025 08:40 PM (IST)

    IND vs SL Super 4 Live : अभिषेक शर्माचा झंझावात सुरुच, श्रीलंकेविरुद्ध तडाखेदार अर्धशतक

    टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्मा याने श्रीलंकेविरुद्ध अर्धशतक पूर्ण केलं आहे. अभिषेकने अवघ्या 22 बॉलमध्ये चौकारासह अर्धशतक पूर्ण केलं. अभिषेकचं हे या स्पर्धेतील सलग तिसरं अर्धशतक ठरलं.

  • 26 Sep 2025 08:34 PM (IST)

    IND vs SL Super 4 Live : टीम इंडियाच्या 50 धावा पूर्ण, पावर प्लेमध्ये किती स्कोअर करणार?

    टीम इंडियाने पाचव्या ओव्हरआधीच 50 धावा पूर्ण केल्या आहेत. टीम इंडियाने 5 ओव्हरनंतर 1 विकेट गमावून 59 धावा केल्या आहेत. अभिषेक शर्मा 41 आणि सूर्या 10 धावांवर नाबाद खेळत आहे.

  • 26 Sep 2025 08:27 PM (IST)

    IND vs SL Super 4 Live : टीम इंडियाच्या 4 ओव्हरनंतर 44 धावा, सूर्या-अभिषेक जोडी मैदानात

    टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध पावरप्लेच्या पहिल्या 4 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 44 धावा केल्या आहेत. अभिषेक शर्मा आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव ही जोडी मैदानात खेळत आहे. सूर्या 9 तर अभिषेक शर्मा 27 धावांवर नाबाद आहे. तर शुबमन गिल 4 धावा करुन आऊट झाला.

  • 26 Sep 2025 08:14 PM (IST)

    IND vs SL Super 4 Live : टीम इंडियाला दुसऱ्याच ओव्हरमध्ये पहिला झटका, शुबमन गिल आऊट

    महीश तीक्षना याने आपल्या कोट्यातील पहिल्या तर सामन्यातील दुसऱ्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर टीम इंडियाला पहिला झटका दिला आहे. तीक्षणा याने आपल्याच बॉलिंगवर भारताचा उपकर्णधार शुबमन गिल याला कॅच आऊट केलं आहे. शुबमनने 3 बॉलमध्ये 4 धावा केल्या.

  • 26 Sep 2025 08:05 PM (IST)

    IND vs SL Super 4 Live : सामन्याला सुरुवात, टीम इंडियाची बॅटिंग

    भारत विरुद्ध श्रीलंका सामन्याला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाकडून अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल ही सलामी जोडी मैदानात आली आहे. श्रीलंकेने टीम इंडियाला टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.  हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे.

  • 26 Sep 2025 07:36 PM (IST)

    IND vs SL Super 4 Live : टीम इंडियाची प्लेइंग 11

    भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.

  • 26 Sep 2025 07:35 PM (IST)

    IND vs SL Super 4 Live : श्रीलंकेची प्लेइंग 11

    श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, चारिथ असालंका (कर्णधार), कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, जेनिथ लियानागे, दुष्मंथा चमीरा, महेश थेकशाना, नुवान थुशारा.

  • 26 Sep 2025 07:35 PM (IST)

    IND vs SL Super 4 Live : काय म्हणाला कर्णधार सूर्यकुमार यादव?

    सूर्यकुमार यादव म्हणाला की, आम्ही जे करत आहोत ते करत राहू. आम्ही प्रत्यक्षात प्रथम फलंदाजी करण्याचा विचार करत होतो. चांगले वातावरण, चांगला खेळ आणि आम्ही त्याची वाट पाहत आहोत. झेल सुटणे हा खेळाचा एक भाग आहे. आमच्याकडे दोन बदल आहेत – बुमराह आणि दुबे बाहेर आहेत. तर अर्शदीप आणि हर्षित आले आहेत.

  • 26 Sep 2025 07:33 PM (IST)

    IND vs SL Super 4 Live : काय म्हणाला श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंका?

    चारिथ असलंका म्हणाला की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. आम्हाला माहित आहे की आम्ही अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकत नाही पण तरीही हा आमच्यासाठी एक महत्त्वाचा सामना आहे. ही चांगली खेळपट्टी आहे आणि आम्ही त्यांना 170-175 पर्यंत रोखू इच्छितो. ते खरोखरच चांगले करत आहेत, विशेषतः आमचे सलामीवीर. आमच्याकडे एक बदल आहे – चमिकाच्या जागी लियांगेचा समावेश आहे.’

  • 26 Sep 2025 07:32 PM (IST)

    IND vs SL Super 4 Live : नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने, गोलंदाजीला प्राधान्य

    सुपर 4 फेरीतील शेवटचा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा श्रीलंकेच्या बाजूने लागला. त्यांनी  प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरणार आहे.

  • 26 Sep 2025 07:14 PM (IST)

    IND vs SL Super 4 Live : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना, थोड्याच वेळात टॉस

    टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका हा सामना केवळ औपचारिकता आहे. मात्र त्यानंतरही क्रिकेट चाहत्यांना सामना केव्हा सुरु होणार याची प्रतिक्षा आहे. सामन्याला सुरुवात होण्यासाठी आता काही मिनिटं बाकी आहेत. तर त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

  • 26 Sep 2025 06:56 PM (IST)

    IND vs SL Super 4 Live : टीम इंडिया-श्रीलंका सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

    टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सामन्याचं आयोजन हे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.  सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. हा सामना टीव्ही आणि मोबाईलवर पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा आणि जाणून घ्या.

  • 26 Sep 2025 06:50 PM (IST)

    IND vs SL Super 4 Live : आशिया कप 2025 स्पर्धेसाठी श्रीलंका टीम

    पथुम निसांका, कुसल मेंडीस(विकेटकीपर), कुसल परेरा, चरिथ असलंका(कर्णधार), कामिंदू मेंडीस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, महेश तीक्षना, नुवान तुषारा, दुनिथ वेल्लागे, कामिल मिश्रा, नुवानिडू फर्नांडो, बिनुरा फर्नांडो आणि जेनिथ लियानागे.

  • 26 Sep 2025 06:48 PM (IST)

    IND vs SL Super 4 Live : आशिया कप 2025 स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ

    टीम इंडिया : अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, हर्षित राणा, रिंकू सिंह आणि जितेश शर्मा.

  • 26 Sep 2025 06:46 PM (IST)

    IND vs SL Super 4 Live : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका आमनेसामने

    टी 20i आशिया कप 2025 स्पर्धेत सुपर 4 फेरीतील अंतिम सामन्यात श्रीलंकेसमोर टीम इंडियाचं आव्हान आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. दोन्ही संघांचा हा सुपर 4 फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना आहे.

Published On - Sep 26,2025 6:45 PM

Follow us
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.