India vs Australia Score and Highlights 1st ODI : ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय, टीम इंडियावर 7 विकेट्सने मात
India vs Australia Score Updates and Highlights In Marathi 1st ODI : ऑस्ट्रेलियाने पर्थमध्ये टीम इंडियावर 7 विके्टसने मात करत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली. कांगारुंचा हा या मैदानातील पहिलावहिला एकदिवसीय विजय ठरला.

यजमान ऑस्ट्रेलियाने रविवारी 19 ऑक्टोबरला पर्थमध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला 7 विकेट्सने पराभूत करत 3 सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी दिली. पावसामुळे हा सामना 26 षटकांचा करण्यात आला. भारताने या सामन्यात 9 विकेट्स गमावून 136 धावांपर्यंत मजल मारली. मात्र डीएलएसनुसार ऑस्ट्रेलियाला 131 धावांचं आव्हान मिळालं. ऑस्ट्रेलियाने या विजयी धावा 3 विकेट्स गमावून सहज पूर्ण केल्या. या विजयात कर्णधार मिचेल मार्श याने प्रमुख भूमिका बजावली. मार्शने सर्वाधिक आणि नाबाद 46 धावा केल्या. तर जोश फिलीप याने 37 धावांचं योगदान दिलं. तसेच इतरांनीही आपलं योगदान दिलं आणि ऑस्ट्रेलियाला विजयी केलं. आता उभयसंघातील दुसरा सामना हा गुरुवारी 23 ऑक्टोबरला एडलेड ओव्हलमध्ये होणार आहे.
LIVE Cricket Score & Updates
-
India vs Australia 1st Odi Live Score : ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय, टीम इंडियावर 7 विकेट्सने मात
ऑस्ट्रेलियाने क्रिकेट टीमने मिचेल मार्श याच्या नेतृत्वात टीम इंडियावर 7 विकेट्सने मात करत करत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी मिळालेलं 131 धावांचं आव्हान हे 21.1 ओव्हरमध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केल. ऑस्ट्रेलियासाठी कॅप्टन मार्श याने सर्वाधिक 46 धावा केल्या. तर जोश फिलीप याने 37 धावांचं योगदान दिलं. तर मॅट रेनशॉ याने 21 धावांचं योगदान दिलं. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने मालिकेत विजयी सुरुवात केली.
-
India vs Australia 1st Odi Live Score : मार्श-जोश फिलपी जोडी जमली, टीम इंडिया तिसऱ्या विकेटच्या शोधात
मिचेल मार्श आणि जोश फीलपी ही जोडी जमली आहे. त्यामुळे टीम इंडिया तिसऱ्या विकेटच्या शोधात आहे. ऑस्ट्लेलियाने 15 ओव्हरमध्ये 2 विके्टस गमावून 94 धावा केल्या आहेत. मार्श आणि फिलपी हे दोघे प्रत्येकी 37 धावांवर नाबाद खेळत आहेत. ऑस्ट्रेलियालि विजयासाठी आता 66 बॉलमध्ये 37 धावांची गरज आहे.
-
-
India vs Australia 1st Odi Live Score : ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका, मॅथ्यू शॉर्ट आऊट, अक्षरला पहिली विकेट
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका दिला आहे. टीम इंडियाने ट्रेव्हिस हेड याच्यानंतर मॅथ्यू शॉर्ट याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. अक्षर पटेल याने मॅथ्यू शॉर्ट याला रोहित शर्मा याच्या काही कॅच आऊट केलं.
-
India vs Australia 1st Odi Live Score : मिचेल मार्शची फटकेबाजी, ऑस्ट्रेलियाच्या 6 ओव्हरनंतर 1 आऊट 38 रन्स
ऑस्ट्रेलियाने 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 38 रन्स केरल्या आहेत. ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत कॅप्टन मिचेल मार्श 22 आणि मॅथ्यू शॉर्ट 7 रन्सवर नॉट आऊट खेळत आहे. तर ट्रेव्हिस हेड याच्या रुपात ऑस्ट्रेलियाने एकमेव विकेट गमावली.
-
India vs Australia 1st Odi Live Score : अर्शदीपची कडक सुरुवात, ट्रेव्हिस हेड आऊट, ऑस्ट्रेलियाला पहिला झटका
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याने ऑस्ट्रेलियाला डावातील दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिला आणि मोठा झटका दिला आहे. अर्शदीपने ट्रेव्हिस हेड याला हर्षित राणा याच्या हाती कॅच आऊट केलं. हेडने 5 बॉलमध्ये 8 रन्स केल्या.
-
-
India vs Australia 1st Odi Live Score : ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगला सुरुवात, विजयासाठी 131 धावांचं आव्हान
ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 26 ओव्हरमध्ये 131 धावांचं (DLS) आव्हान पूर्ण करायच्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेड आणि कॅप्टन मिचेल मार्श ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
-
India vs Australia 1st Odi Live Score : नितीश कुमार रेड्डीचा फिनिशिंग टच, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 136 धावा, कांगारुंना विजयासाठी 131 धावांचं आव्हान
टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 26 ओव्हरमध्ये 136 रन्स केल्या आहे. पावसाच्या व्यत्ययामुुळे हा सामना 26 षटकां करण्यात आला. टीम इंडियासाठी या सामन्यात अक्षर पटेल आणि केएल राहुल या दोघांनी प्रत्येकी 30 पेक्षा अधिक धावांचं योगदान दिलं. केएलने 38 आणि अक्षरने 31 धावा केल्या. तर नितीाश कुमार रेड्डी याने अखेरच्या क्षणी 19 धावा जोडल्या. त्यामुळे टीम इंडियाला 136 रन्सपर्यंत मजल मारता आली. तर ऑस्ट्रेलियाला डीएलएसनुसार 131 रन्सचं टार्गेट मिळालं आहे.
-
India vs Australia 1st Odi Live Score : टीम इंडियाच्या 25 ओव्हरनंतर 8 आऊट 123 रन्स
टीम इंडियाने 25 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 123 रन्स केल्या आहेत. टीम इंडियाने सातवी आणि आठवी विकेट्स झटपट गमावली. केएल राहुल याच्यानंतर हर्षित राणा आऊट झाला.
-
India vs Australia 1st Odi Live Score : टीम इंडियाला सहावा झटका, वॉशिंग्टन सुंदर बोल्ड
टीम इंडियाने सहावी विकेट गमावली आहे. वॉशिंग्टन सुंदर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात क्लिन बोल्ड झाला. सुंदरने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 10 बॉलमध्ये 10 रन्स केल्या.
-
India vs Australia 1st Odi Live Score : टीम इंडियाला पाचवा झटका, अक्षर पटेल आऊट, 20 ओव्हरनंतर 84 धावा
टीम इंडियाने पाचवी विकेट गमावली आहे. अक्षर पटेल 38 बॉलमध्ये 31 रन्स करुन आऊट झाला आहे. तसेच टीम इंडियाने 20 ओव्हरनंततर 84 धावा केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडिया उर्वरित 6 ओव्हरमध्ये आणखी किती धावा जोडणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
-
India vs Australia 1st Odi Live Score : खेळाला सुरुवात, आता 26 ओव्हरचा गेम होणार
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याला पावसाच्या खोलंब्यानंतर पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. पावसाने पाचव्यांदा खोडा घातल्यानंतर आता फक्त 26 ओव्हरचा खेळ होणार आहे. त्यामुळे टीम इंडिया आता या 26 ओव्हरमध्ये किती धावा करणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
-
India vs Australia 1st Odi Live Score : खेळाला 2 वाजता सुरुवात होणार, आता 26 ओव्हरचा गेम
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या एकदिवसीय सामन्यात पावसाने पाचव्यांदा खोडा घातला. त्यानंतर पाऊस थांबलाय. त्यामुळे आता खेळाला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. तर आता फक्त 26 ओव्हरचा खेळ होणार आहे.
किती ओव्हरचा खेळ होणार?
Play will recommence at 4:30pm local, 2:00 pm IST
The total revised overs to be completed are 26 overs per side.
The Innings Break will be 15 minutes.
Powerplay Breakdowns: PP1: Overs 1 – 5 PP2: Overs 6 – 21 PP3: Overs 22 – 26#AUSvIND | #TeamIndia
— BCCI (@BCCI) October 19, 2025
-
India vs Australia 1st Odi Live Score : काय चाललंय पावसाचं? पुन्हा खेळ थांबवला
पावसाने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याची पार मजा घालवली आहे. पावसाने सामन्यात पाचव्यांदा खोडा घातला आहे. त्यामुळे नाईलाजाने खेळ थांबवावा लागला आहे. आधीच पावसामुळे 32 ओव्हरचा करण्यात आला. त्यात पुन्हा खेळ थांबवावा लागलाय. त्यामुळे हा सामना निकाली निघणार की रद्द करावा लागणार? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
-
India vs Australia 1st Odi Live Score : खेळाला पुन्हा सुरुवात, 32 ओव्हरचा गेम होणार
पावसाच्या खोड्यानंतर आता पुन्हा एकदा सामन्याला 12 वाजून 55 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. पावसामुळे थोडा वेळ वाया गेल्याने आता 35 ऐवजी 32 ओव्हरचा खेळ होणार आहे. टीम इंडियाने 4 विकेट्स गमावून 14.2 ओव्हरमध्ये 46 रन्स केल्या आहेत.
-
India vs Australia 1st Odi Live Score : चाललंय काय? पावसामुळे सलग तिसऱ्यांदा खेळ थांबवला
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात पावसाने सलग तिसऱ्यांदा एन्ट्री घेतलीय. त्यामुळे खेळ थांबवावा लागला आहे. पावसामुळे आधीच 15 ओव्हरचा खेळ कमी करण्यात आलाय. त्यात पुन्हा पावसाने खोडा घातलाय. त्यामुळे आता किती वेळानंतर पुन्हा सुरुवात होणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
-
India vs Australia 1st Odi Live Score : टीम इंडियाला चौथा झटका, उपकर्णधार श्रेयस अय्यर आऊट
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला चौथा झटका दिला आहे. जोश हेझलवूड याने भारतीय उपकर्णधार श्रेयस अय्यर याला विकेटकीपर जोश फिलपीच्या हाती कॅच आऊट केलं. श्रेयसने 11 धावा केल्या आणि मैदानाबाहेरचा रस्ता धरला.
-
India vs Australia 1st Odi Live Score : भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याला पुन्हा सुरुवात, 35 ओव्हरचा गेम होणार
पावसाच्या खोलंब्यानंतर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या एकदिवसीय सामन्यातील खेळाला 12 वाजून 20 मिनिटांनी पुन्हा सुरुवात झाली आहे. पावसामुळे जवळपास 2 तास 10 मिनिटांचा खेळ वाया गेला. त्यामुळे आता 49 ऐवजी 35 ओव्हरचा सामना होणार आहे. त्यामुळे प्रत्येक गोलंदाजाला 7 ओव्हरच टाकता येणार आहेत. भारताने 11.5 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 37 रन्स केल्या आहेत. अक्षर 7 आणि श्रेयस 6 रन्सवर नॉट आऊट आहेत.
-
India vs Australia 1st Odi Live Score : ऑस्ट्रेलिया-भारत सामन्याबाबत मोठी अपडेट, किती वाजता सुरुवात होणार?
पर्थमध्ये 2 तास वाया घालवल्यानंतर अखेर पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यानंतर आता उभयसंघातील खेळाला भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी खेळाला पुन्हा सुरुवात होणार आहे. खेळ वाया गेल्याने आता 49 ऐवजी 35 ओव्हरचा खेळ होणार आहे. टीम इंडियाने 11.5 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 37 धावा केल्या आहेत.
-
India vs Australia 1st Odi Live Score : पावसाची रिपरिप सुरुच, 2 तासांचा खेळ वाया
पावसामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना थांबवावा लागला आहे. पर्थमध्ये गेल्या 2 तासांपासून पावसाचा लंपडाव सुरुच आहे. त्यामुळे स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांचा पदरी घोर निराशा पडली आहे. तर दुसऱ्या बाजूला ग्राउंड स्टाफ खेळपट्टी कोरडी करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.
-
India vs Australia 1st Odi Live Score : पाऊस थांबला, लवकरच खेळाला पुन्हा सुरुवात, जाणून घ्या
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या सामन्यात पावसाने दुसऱ्यांदा एन्ट्री घेतली. त्यामुळे जवळपास 70 मिनिटांचा खेळ वाया गेलाय. जोरदार पाऊस बरसला. त्यानंतर आता पावसाने विश्रांती घेतल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे थोड्याच वेळात पुन्हा खेळाला सुरुवात होणार आहे.
-
India vs Australia 1st Odi Live Score : भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात पावसाची बॅटिंग, खेळ थांबवला, पुन्हा किती वाजता सुरुवात?
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाच्या बॅटिंगदरम्यान पावसाने एन्ट्री घेतली. पावसाने 10-20 मिनिटं वाया घालवली. त्यानंतर खेळाला सुरुवात झाली. सामना त्यामुळे 49 ओव्हरचा करण्यात आला. त्यानंतर पुन्हा एकदा पावसाने खोडा घातला. आता पावासमुळे खेळ थांबून जवळवास 40-50 मिनिटांचा खेळ वाया गेला आहे. त्यामुळे सामन्याला आणखी 1 तास लागू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
India vs Australia 1st Odi Live Score : पावसाची पुन्हा एन्ट्री, चाहत्यांची निराशा, पुन्हा खेळाला किती वाजता सुरुवात होणार?
भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात पुन्हा पावसाने एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे खेळ थांबवावा लागला आहे. त्यामुळे पीच कव्हरने झाकलं आहे. पावसाच्या एन्ट्रीमुळे चाहत्यांची निराशा झाली आहे. आता पुन्हा खेळाला केव्हा सुरुवात होणार? याची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना लागून आहे.
-
India vs Australia 1st Odi Live Score : पावसाच्या खोलंब्यानंतर खेळाला पुन्हा सुरुवात, श्रेयस-अक्षर मैदानात
पावसामुळे काही वेळ खेळ थांबवावा लागला होता. त्यामुळे काही मिनिटांचा खेळ वाया गेला. त्यानंतर आता पुन्हा खेळाला सुरुवात झाली आहे. मात्र आता 1 ओव्हर कमी करण्यात आली आहे. त्यामुळे उभयसंघात 49 ओव्हरचा सामना होणार आहे.
-
India vs Australia 1st Odi Live Score : पावसाची एन्ट्री, खेळ थांबवला
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात पावसाने एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे खेळ थांबवावा लागला आहे. टीम इंडियाने 8.5 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 25 धावा केल्या आहेत. तर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल ही जोडी नाबाद मैदानाबाहेर परतली आहे.
-
India vs Australia 1st Odi Live Score : टीम इंडियाला तिसरा झटका, कॅप्टन शुबमन गिल आऊट
टीम इंडियाला तिसरा आणि मोठा झटका लागला आहे. भारताने कॅप्टन शुबमन गिल याची विकेट गमावली आहे. शुबमन गिल 18 बॉलमध्ये 10 रन्स करुन आऊट झाला आहे. भारताने यासह आपली तिसरी विकेट गमावली.
-
India vs Australia 1st Odi Live Score : विराटकडून घोर निराशा, कोहली झिरोवर आऊट
टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया विरुद्ध निराशाजनक सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा 8 धावांवर कॅच आऊट झाल्यानंतर विराट कोहली मैदानात आला. विराटने काही बॉल खेळून काढले. मात्र त्यानंतर विराट झिरोवर कॅच आऊट झाला आणि मैदानाबाहेर परतला.
-
India vs Australia 1st Odi Live Updates : टीम इंडियाला पहिला झटका, रोहित शर्मा स्वस्तात आऊट
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पहिला झटका दिला आहे. टीम इंडियाने पहिलीच आणि मोठी विकेट गमावली आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा 8 धावा करुन कॅच आऊट झाला आहे. रोहित आऊट झाल्यानंतर विराट कोहली मैदानात आला आहे.
-
India vs Australia 1st Odi Live Updates : टीम इंडियाची सलामी जोडी मैदानात
टीम इंडियाकडून रोहित शर्मा आणि कर्णधार शुबमन गिल ही सलामी जोडी मैदानात आली आहे. या जोडीकडून टीम इंडियाला चांगल्या आणि मोठ्या भागीदारीची अपेक्षा आहे. तसेच रोहितच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
-
India vs Australia 1st Odi Live Updates : ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश फिलिप (विकेटकीपर), मॅट रेनशॉ, कूपर कॉनोली, मिचेल ओवेन, मिचेल स्टार्क, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन आणि जोश हेझलवुड
-
India vs Australia 1st Odi Live Updates : टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग
-
India vs Australia 1st Odi Live Updates : ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, टीम इंडिया विरुद्ध बॉलिंग
ऑस्ट्रेलियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात टॉस जिंकला आहे. कॅप्टन मिचेल मार्श याने फिल्डिंगचा निर्णय घेत टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडियाकडून नितीश कुमार रेड्डी याचं एकदिवसीय पदार्पण झालं आहे.
-
India vs Australia 1st Odi Live Updates : रोहित-विराटचं कमबॅक!
रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांच्या कमबॅकची क्रिकेट चाहत्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतिक्षा होती. ही प्रतिक्षा अखेर संपली आहे. हे दोघे आयसीसी वनडे चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होते. त्यानंतर आता हे दोघे संधी मिळाल्यास कमबॅक करतील.
-
India vs Australia 1st Odi Live Updates : भारतीय संघाची ऑस्ट्रेलियातील वनडे क्रिकेटमधील कामगिरी
भारताने ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 54 वनडे मॅचेस खेळल्या आहेत. भारताने या 54 पैकी 14 सामन्यात कांगारुंचा धुव्वा उडवला आहे. तर ऑस्ट्रेलियाने पाहुण्या भारताला 38 वेळा पराभवाचं पाणी पाजलं आहे. तर 2 सामन्यांचा निकाल लागला नाही.
-
India vs Australia 1st Odi Live Updates : हेड टु हेड रेकॉर्ड्स
एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत दोन्ही संघ एकूण 152 वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियाने या 152 पैकी सर्वाधिक सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाने 84 सामने जिंकलेत. तर भारताला 58 सामन्यांमध्ये पलटवार करता आला आहे.
-
India vs Australia 1st Odi Live Updates : सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता सुरुवात होणार आहे. तर 8 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह मॅचचा थरार अनुभवता येईल.
-
India vs Australia 1st Odi Live Updates : एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया टीम
ऑस्ट्रेलिया टीम: मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशॅने, मॅथ्यू शॉर्ट, मॅट रेनशॉ, मिचेल ओवेन, जोश फिलिप (विकेटकीपर), कूपर कोनोली, मिचेल स्टार्क, झेवियर बार्टलेट, जोश हेझलवूड, बेन ड्वार्शुईस, नॅथन एलिस आणि मॅथ्यून कुपन.
-
India vs Australia 1st Odi Live Updates : वनडे सीरिजसाठी टीम इंडिया
टीम इंडिया : शुबमन गिल (कॅप्टन), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, ध्रुव जुरेल आणि प्रसिध्द कृष्णा.
-
India vs Australia 1st Odi Live Updates : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया नव्या कॅप्टनच्या नेतृत्वात ही मालिका खेळणार आहे. शुबमन गिल याचं या मालिकेतून एकदिवसीय कर्णधार म्हणून पदार्पण होणार आहे. तसेच रोहित शर्मा आणि विराट कोहली या रो-को जोडीचंही संघात पुनरागमन होत आहे.
Published On - Oct 19,2025 7:38 AM
