IPL 2021 : 4 संघ, 8 गुण आणि 1 स्थान… कोणता संघ मारणार बाजी, कोणाला मिळणार प्लेऑफचं तिकीट? वाचा सविस्तर एका क्लिकवर

आयपीएल 2021 स्पर्धा प्रत्येक सामन्यासह रोमांचक होत आहे. स्पर्धेतील अनेक संघांची प्लेऑफसाठीची शर्यत प्रत्येक सामन्यासह अधिक कठीण होत आहे.

1/6
आयपीएल 2021 स्पर्धा प्रत्येक सामन्यासह रोमांचक होत आहे. स्पर्धेतील अनेक संघांची प्लेऑफसाठीची शर्यत प्रत्येक सामन्यासह अधिक कठीण होत आहे. प्लेऑफ हे एक कोडे बनले आहे. प्लेऑफच्या शर्यतीत पहिल्या 3 संघांचे स्थान निश्चितपणे दिसून येते. अशा स्थितीत खरी लढत फक्त एकाच जागेची असते. कारण त्या एका जागेसाठी चार संघांमध्ये चुरस आहे. आयपीएलमध्ये चार संघ सध्या 8 गुणांसह चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. या चौघांपैकी केवळ एकालाच प्लेऑफचं तिकीट मिळू शकतं, किंवा बँगळुरुचा संघ पुढचे सामने पराभूत झाला तर या चारपैकी दोन संघांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवता येईल.

2/6
चेन्नई सुपर किंग्ज : धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने यंदाच्या मौसमात चांगली कामगिरी केली आहे. या संघाने 10 पैकी 8 सामने जिंकत 16 गुण मिळवले आहेत. त्यामुळे त्यांचं प्लेऑफचं तिकीट जवळपास पक्कं झालं आहे. आयपीएलच्या इतिहासात असं कधीच घडलेलं नाही की, 16 गुण मिळवणाऱ्या संघाला प्लेऑफचं तिकीट मिळालेलं नाही. चेन्नईने उर्वरिीत चारपैकी एक सामना जिंकला तरी त्यांना प्ले ऑफ गाठता येईल.

3/6
दिल्ली कॅपिटल्स : हा संघ आयपीएल 2021 च्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईप्रमाणे या संघानेदेखील 10 सामन्यांपैकी 8 विजयानंतर 16 गुण मिळवले आहेत. त्यामुळे त्यांचंदेखील प्लेऑफचं तिकीट जवळपास पक्कं झालं आहे. उर्वरित चारपैकी एक सामना जिंकला तर त्यावर शिक्कामोर्तब होईल.

4/6
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : 10 सामने खेळल्यानंतर यापैकी 6 सामन्यांमधील विजयासह बंगळुरु संघाच्या खात्यात 12 गुण आहेत. अशा परिस्थितीत, हा संघ प्लेऑफसाठी दावेदार आहे. तथापि, त्यांना त्यासाठी उर्वरित 4 सामन्यांपैकी किमान 2-3 सामने जिंकणे आवश्यक आहे.

5/6
KKR, PBKS, RR आणि MI : या चार संघांचे 10 सामन्यांनंतर समान 8 गुण आहेत. म्हणजेच, प्लेऑफ खेळण्याची शक्यता अद्याप अबाधित आहे. या सगळ्यात केकेआरला एक फायदा होऊ शकतो, तो म्हणजे त्यांचा रन रेट पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच, जर पुढे दोन-तीन संघांचे गुण समान राहिले तर, नेट रनरेटवर त्यांचा संघ प्लेऑफसाठी क्वालिफाय होऊ शकतो.

6/6
सनरायझर्स हैदराबाद : आयपीएलच्या इतिहासात 10 सामने खेळल्यानंतर फक्त एक जिंकणारा हा पहिला संघ आहे. यामुळेच ऑरेंज आर्मी आता प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI